फिरंगोजी नरसाळा किल्ल्याचे रक्षण करत होते . त्याच्याकडे केवळ साडेतीनशे लोक होते.आणि शाहिस्तेखानचे 20हजार सैन्य . तरी सुद्धा ५६ दिवस वीस हजारांच्या मुघल सैन्याला दमवले सोडल

चाकणचे युद्ध..

चाकणला वेढा पडताच युद्धाला तोंड फुटले. मुघलांच्या आक्रमणाला किल्ल्यातून चोख प्रत्युतर मिळत होते. मुघलांचे सैन्य काही मीटर पुढे सरकले की किल्ल्यातून एक तोफेचा गोळा त्यांच्या दिशेने सुटायचा व घाईगडबडीने सगळे लोक मागे फिरायचे.

फिरंगोजी नरसाळा किल्ल्याचे रक्षण करत होता. त्याच्याकडे केवळ साडेतीनशे लोक होते. मुघलांना लक्षात आले की अशा उघड हल्ल्याने काही किल्ला बधणार नाही. मग त्यांनी सुरक्षा फळ्या तयार करुन आगेकूच करायचा प्रयत्न केला पण ते सगळे व्यर्थ जात होते. ह्यापुढे जाऊन मुघलांवर किल्ल्यातूनच रात्री बेरात्री हल्ले होत होते. रात्री किल्ल्यातून छोटी टोळी बाहेर पडायची व वेढ्याच्या एका भागावर हल्ला करायची. कधी दबक्या पावलाने जात त्यांच्या तोफांच्या बत्तीमधे पाचर ठोकून त्या निकामी केल्या जायच्या ह्यामुळे मुघलांचा संताप होत होता.

एक महिना गेला पण मुघलांना काहीच हाती लागत नव्हते. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी त्यांचे मोर्चे होते त्याच ठिकाणी ते एका महिन्यानंतरही उभे होते. जुलैच्या मध्यापर्यंत शिवाजी महाराजांच्या सुटकेची बातमी इथे येऊन थडकली. त्यामुळे लवकर गडावर ताबा मिळवला नाही तर गडबड होईल असे वाटून मुघलांनी निकराचा प्रयत्न करायचे ठरवले. त्यांच्या छावणीपासून ते किल्ल्याच्या बुरुजापर्यंत भुयार खणायचे ठरले. किल्ल्यातल्या सैन्याला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती.

मुघल सैन्याच्या अथक परिश्रमानंतर १४ ऑगस्ट १६६० ला किल्ल्याचा एक बुरुज त्याच्या खाली झालेल्या प्रचंड स्फोटाने हवेत उडाला. बुरुजावरील बरेच मावले त्याच्याबरोबर हवेत फेकले गेले. एकच गदारोळ माजला व मुघलांनी पटकन बुरुजावर मोठा हल्ला केला. भिंत पडूनही मराठ्यांनी मुघलांना आत शिरू दिले नाही. दिवस मावळला तरी मावळे भिंत लढवत उभे होते. रात्रभर लढाई चालू होती. दुसऱ्या दिवशी मुघलांना थोडे यश मिळाले व मराठ्यांना बालेकिल्ल्यात माघार घ्यावी लागली.

शाहिस्तेखानने राजा भावसिंहला मराठ्यांशी बोलून अभयदानाच्या बदल्यात किल्ला सोडायला सांगितले. मराठ्यांसाठी माणसे लाख मोलाची होती. फिरंगोजीने उरलेल्या मावळ्यांसोबत गड सोडला. शेवटच्या दोन दिवसात मराठ्यांचे बरेच लोक मारले गेले पण त्यांनी सहजासहजी गड सोडला नाही.

ह्या छोट्या किल्ल्याने ५६ दिवस वीस हजारांच्या मुघल सैन्याला दमवले. ते सुद्धा शिवाजी महाराज पन्हाळगडावर वेढ्यात सापडले आहेत हे माहित असताना - म्हणजे बाहेरुन काही मदत मिळण्याची अपेक्षाच करता येत नव्हती. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी फिरंगोजी राजगडावर गेला. मुघलांना इतके दिवस झुंजवून ठेवण्याच्या त्याच्या कमालीच्या पराक्रमाबद्दल त्याचा आदर सत्कार करण्यात आला..

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४