पाडळीच्या श्री ज्योतिबा सासन काठी निशाणाचा इतिहास आणि नियोजन
पाडळी सातारा जिल्हातील एक सांस्कृतिक सामाजिक ऐतिहासिक अध्यात्मिक वारसा लाभलेलं छोटसं खेडगाव. या गावाचं आराध्य दैवत श्री ज्योतिबा मंदिर. आणि श्री जोतिबा देवाची यात्रा म्हटले की जिव्हाळ्याचा विषय. त्यात काठी म्हणजे पाडळी गावचा श्वास. कारण या पाडळी गावाला दख्खनचा राजा ज्योतिबा वाडी रत्नागिरी कोल्हापूर. या मूळ स्थानी प्रथम क्रमांकाचं पहिला मान पाडळीच्या श्री जोतिबाच्या सासन काठीला आहे.
चैत्र हस्त नक्षत्रावर पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख आराध्य दैवत, कुलदैवत म्हणून लोकांचा राजा श्री जोतिबा यात्रा पार पडत असते. साधारण दहा ते बारा लाख पब्लिक यार यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात. परंतु या यात्रेमधील प्रथम मानाचा सासनकाठी ही सातारा जिल्ह्यातील पाडळी गावच्या शासन कटीला आहे.
महाराष्ट्र मधील ठराविक मोठया यात्रेमध्ये सातारा जिल्ह्यातील पाडळी या गावच्या यात्रेमध्ये उल्लेख केला जातो. नुकताच काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ती शेत्र पाडळी या गावाला क दर्जा देऊन सन्मानित करण्यात आला आहे.
या गावातील ज्येष्ठ व तरुण गट आणि तट बाजूला सारून एकत्र येत असतात. जोतिबा डोंगरावरची व गावातली पाडळी ची यात्रा पार पडणे म्हणजे खूप जोखमीचं काम. परंतु संपूर्ण गाव एकत्र येऊन अतिशय उत्साह मध्ये आणि रांगडेपणाने ही यात्रा पार पाडत असतात. यात्रेमध्ये गावातील 18 बगड जातीमधील सर्व लोक एकत्र येऊन यात्रा पार पाडत असतात.
पाडळीची सासनकाठी ला तिचे स्वतःचे असे 24 सेवक आहेत. यामध्ये कारखानदार, भालादार,ईटेकरी, हलगी वाले,गडशी,चौगुला, शिंपी, कोळी, माळी, कुंभार, हरदास, तेली, दिवटी, नाथाडवरी,रुमाल परीट, छत्री, अब्दागिरी, गुरव, रखवालदार,असे सेवेकरी आहेत. हे सर्व जण आपापली सेवा चूक बजावत असतात. यामध्ये मानाच्या तीन तक्षिमा आहेत. यावरून पाडळीच्या शासनकाठीची व्याप्ती सर्वांच्या लक्षात येईल.
चैत्राच्या महिन्यामध्ये संपूर्ण महिना संपूर्ण गाव मासाहार करत नाही.
पडळी गावाच्या प्राचीन उल्लेख हे करवीर महात्म ग्रंथामध्ये पाटली पतंन हे इंद्र देवाचे गाव म्हणून उल्लेख सापडतो.
दुसरा उल्लेख छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक दप्तरामध्ये मध्ये घोरपडे व जाधवराव यांच्या घराण्याच्या कैफियतित आणि पानिपत समकालीन ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये सापडतात.
ज्योतिबा डोंगरावरील यात्रेमध्ये चैत्र यात्रेमध्ये सामील होणाऱ्या 108 सासनकाट्यान मध्ये. पहिला मान हा पातळीच्या शासनकाठीचा आहे. या निशाणाची नोंद कोल्हापूर तहसील कार्यालयामध्ये आहे. व ऐतिहासिक ताम्रपटावरती स्पष्ट उल्लेख आहेत.
पाडळीच्या यात्रेमध्ये स्वतंत्र असा ट्रस्ट असून त्या ट्रस्टीनच्या मार्फत. चोख नियोजन केलं जात.
जोतिबा सासनकाठी मध्ये शस्त्र असणारी ईटे ही एकमेव सासन काठी आहे.
यात्रेमध्ये सासनकाठी ची का परंपरा आहे.
सासनकाठी म्हणजे नाथ केदार याचा विजयी ध्वज.
याचबरोबर शिखरी काठी, नंदी ध्वज, तरंग अशी विविध नावे घेऊन हे परंपरा दखंन पठार, माणदेश,कोकणपट्टा,मावळ, मराठ वाडा,विदर्भ भागात सगळीकडे असते.
पाडळीची शासनकाठी ही कुलध्वज या प्रकारांमध्ये मोडत असते. याचं मूळ कालिका पुरणातील इंद्र महोत्सवाशी संबंधित आहे.
वर्षभर झालेल्या गोष्टी,पुढील नियोजन हे दख्खनचा रारा जोतिबाच्या चरणाशी सांगणे ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेले आहे. ती आज तागादी भक्तांच्या मार्फत चालू आहे. आजही हजारो सासनकाट्या जोतिबा डोगरा वर जातात.
पूर्वी सासनकाठीस शासनकाठी असं म्हटलं जाईल.?
शासनकाठी 40 45 फूट उंच जाड वेळू किंवा काळकाची असते. कळक व वेळू आणताना व निवडताना तोडताना विशिष्ट असा आशी पूजा केली जाते. निशान गर्द जांभळ्या रंगाचा फरारा म्हणजेच पतका असतो. त्यावर नारळाची तोरण. बांधली जातात. देवाचे टाक बाधले जातात. गुलाल खोबऱ्याची उधळण केले जाते.
शासनकाठीचे वैशिष्ट्य म्हणजे?
प्रत्येक शासनकाठीचे निशान हे वेगवेगळे असते.
उदा :-हिंमत बहादर चव्हाण घराण्याची 3व 4 हया काळ्या पांढऱ्या रागाचा.चालूक्य वंश साळूंखे यांची म्हजे नावजी नाथ यांची काठी ही भगवी आहे.मन पडळ व फाळके वाडीच्या काट्या या काळ्या रंगच्या आहेत.
शासनकाठी तीन तोरणे बांधलेले असतात. मुख्य निशाणावर यांची मुख्य आरास असते. शासनकट्टी खांद्यावर घेऊन चालणे. पूर्ण म्हणजेच चोर सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते.
साधारण पणे होळी च्या सणाला यात्रेच्या नियोजनास सुरवाती होते.गुढीपाढवा या दिवशी पारावर जत्रेच्या नियोजनासाठी संपूर्ण गाव जमत.. नियोजन पच मंडळी व गुरव यात्रेला डोगरावर येण्याचं निमंत्रण देतात. आणि संपूर्ण गाव नियम व अटी पळून यात्रा पार पडतात.
देवाच्या सेवकांना कारखानदाराना मान पान दिला जाऊन कारुका दिला जातो.याचं वेळी जोतिबा डोगराकडे 20ते 25 खिल्लार जातीच्या 20ते 25 बैल जोड्या या मनाच्या काठी सोबत जातात.
आजच्या आधुनिक गाड्याच्या काळात सुद्धा पारंपरिक बैल गाडीने यात्रेला जाण्याची परपरा आज ही कायम आहे.
महिना भर आधी चागल्या बैला ची निवड केली जाते.
बैल गाड्याची रंग रंगोटी, डाग डुजी केली जाते.पुढील आठ दिवस पुरेल येवडा पुरेसा चारा बैल गाडीस बांधला जातो.
सोबत शेकडो भक्त सुद्धा काठी सोबत पाई चालत निघतात.
पान पीठ म्हणजे?
पाडळी येथील लोक पाणी पिठाचा उपवास करतात.
शाळू भाजून जात्यावर दळूनच पीठ तयार करतात त्यास पाणी पीठ म्हणतात.हे पीठ फक्त पाण्यासोबत भूक लागल्या नंतर भक्त खातात..असा उपवास करतात. त्यास पाणी पीठ असे बोलतात.जोतिबा डोगरावर सासन काठी पोहचत नाही तोपर्यत हाच पाणी पिठा चा उपवास भक्त करतात.संपूर्ण प्रवास हा चप्पल न घालात. अन वाणी पायाने करतात.ज्यांना डोगरावर जायला जमत नाही असे भाविक भक्त 3दिवस उपवास करतात.
पहाटे 6वाजता सासनास पोशाख व हराची आरास करून सजावतात.निशाण व जोतिबा देवाची आरती करतात.नारळ फोडून, सतका होऊन लोक गावातून पुढील प्रवासासाठी निघतात.
पंचक्रोशीतील अनेक भावकी भक्त दर्शनासा येतात. श्री ग्राम दैवत भैरवनाथ देऊळ निशाण व सासन काठी घेऊन प्रदर्शना मारतात. आणि मार्गस्थ होतात.
या नंतर निशाण पाडळी, इंदोली, उंब्रज, कराड,कासेगाव, येतवडे,बहिरवाडी,जाखले, खेकले,असा परंपरागत मार्ग आहे.तो पुर्ण करत जोतीबा यात्रेच्या आदल्या दिवशी पोहचतात.
पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान कमिटीचे अधिकारी, सर्व भक्त मानकरी, बारा बोलते दार असे अनेकांच्या उपस्थिती मध्ये निशाण पूजा होते. व सासन काठी डोगरावर मंदिर येथे प्रदर्शना करून शिखरी निशाण भेट होते.या नंतर मान पान होऊन मुक्काम ठिकाणी जाते.
मुख्य यात्रेला निशाण तयार करतात.सासनास पोशाख व हराची आरास करून सजावतात.निशाण व जोतिबा देवाची आरती करतात.नारळ फोडून, सतका होऊन जोतिबा मंदिर या ठिकाणी जातात.यां नंतर छबिना व सासन काठी मिरवणूक व मंदिरास प्रदर्शन होते .घालून दिलेल्या नियोजित ठिकाणी सर्वजण येतात.
जोतिबा मंदिर ते यामई मंदिर ते पुन्हा जोतीबा मंदिर असा छबीना असतो. श्री जोतिबा नाथांचा स्वतंत्र लवाजमा असतो.यामाई देवाच्या मंदिरा समोर आल्यावर देव पालखी सहित सदरेवर बसतात. यावेळी कट्टर रुपी जमदग्नी ऋषीं व यमाई देवीचा विवाह सोहळा असतो.तो सोहळा पार पाडून. वाजत गाजत सासन काठी मुख्य मंदिरा समोर येते.पुन्हा प्रदर्शना होऊन देव सादरेवर बसतात.डवरी गीत व नाथ भुजग कवणे होऊन आधी पूजा विधी होऊन तोफा उडूवूनझाल्यावर पालखी मादिरात जाते. निशानाला मनाचा विडा मिळतो.मुख्य यात्रेची सगता होते.
दुसऱ्या दिवशी निशाण तयार करतात.सासनास पोशाख व हराची आरास करून सजावतात.निशाण व जोतिबा देवाची आरती करतात.नारळ फोडून, सतका होऊन जोतिबा मंदिर या ठिकाणी जातात.सासन काठी मिरवणूक व मंदिरास प्रदर्शना होते.या वेळी जोतिबा डोगरा वरील गुरव समाज सासणकाठीस निरोप देण्यासाठी येतो.याचं दिवशी निशाण डोगर उतरून परतीचा मार्ग पकडते.. आणि मुक्कामी ठिकाणी पोहचते.
लेखन व माहिती संकलन
नितीन आप्पासो घाडगे
Comments
Post a Comment