साताऱ्यातील शिवमूर्ती झाली आज ६१ वर्षांची.विजय असो, की अन्यायाविरोधात झगडणे, मिरवणूक निघावी की मोर्चा, सण साजरा करायचा असो, की निषेध ! पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साक्षीदार अन् प्रेरणास्थान

साताऱ्यातील शिवमूर्ती झाली आज ६१ वर्षांची.

विजय असो, की अन्यायाविरोधात झगडणे, 
मिरवणूक निघावी की मोर्चा, 
सण साजरा करायचा असो, की निषेध ! 

पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती 
साक्षीदार अन् प्रेरणास्थान असतेच आठ रस्त्यांना जोडणारा, दाही दिशाने सातारकरांना जिद्द देणारा शिवरायांच्या ह्या मूर्तीने आज ६२ व्या वर्षांत पदार्पण केले. 

याच दिवशी १९६२  मध्ये (कै.) बाळासाहेब देसाई 
यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले होते.शिवराजांचा इतिहास गर्भगळीत झालेल्यांसाठी संजीवनी देणारा आहे. 

संकटांपुढे हतबल झालेल्यांना शिवरायांच्या प्रेरणेने शेकडो हाथींचे बळ आल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे शहर असो की गाव, वाड्यापाड्यांवर शिवरायांची मूर्ती दिसतेच. विशेष म्हणजे गावच्या मध्यभागी, प्रवेशद्वाराजवळ  शिवमूर्तीचे दर्शन होते. स्वातंत्र्यानंतरही शिवरायांची प्रेरणा मिळण्यासाठी सर्वत्र शिव्स्मारके उभी राहिली 

साताऱ्यात शिवप्रेरणा ज्वलंत राहण्यासाठी पोवई नाका "आठ रस्त्यावर' शिवाजी महाराजांची मूर्ती उभी करण्याचा काहींनी मानस व्यक्त केला. 
त्यातून श्री शिवस्मारक समितीची स्थापना करण्यात आली. दि. मा. घोडके हे अध्यक्ष, तर वि. श्री. बाबर, 
भगवानराव बाबासो माने , य. ज. मोहिते, आ. रा. मोरे आदी सभासदांनी मूर्ती उभारणीचा निर्धार पूर्ण केला. 

मुख्य अधिकारी हिं. बा. मोहिते, इंजिनिअर या. रा. बोबडे यांनी चबुतऱ्याचे बांधकाम केले. पुणे येथील प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी हि मूर्ती तयार केली.

तत्कालीन शेतकी मंत्री (कै.) बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते २६ एप्रिल १९६२ रोजी या मूर्तीचे अनावरण झाले. 
जिल्हा लोकल बोर्डच्या जागेत या मूर्तीची उभारणी झाली. त्या वेळी जिल्हा लोकल बोर्डाचे दिनकरराव बोडके हे अध्यक्ष होते.

६१ वर्षे पूर्ण झालेली शिवाजी महाराजांची मूर्ती आजही लाखो जणांना ध्येय गाठण्याची, अन्यायाविरोधात लढण्याची, तर विजय मिळालेल्यांना रयतेसाठी सत्ता 
वापरण्याची प्रेरणा देत आहे. तोफेवर ठेवलेला डावा हात आणि उजव्या हातात धरलेली तलवार संघर्षाची दोन हात करण्याचे बळ देत आहे.

निरंतरपणे प्रेरणा देत ६१ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या 
शिवमुर्तीला सातारकरांचा मानाचा मुजरा.. !

●जय भवानी ● ●जय शिवराय 
🚩🚩छत्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩🚩🙏🙏

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४