आजचे दिनविशेष
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ एप्रिल १६६७*
महाराज आग्र्याहून अकस्मातपणे पळून गेल्यामुळे औरंजेबाची नाच्चकी झाली, संशयापोटी त्याने मिर्झा राजांना दक्षिणेतून परत बोलवण्याचा हुकुम सोडला आणि औरंगाबादेस शहजादा मुअज्जम याला सुभेदार म्हणून नियुक्त केले, याच संधीचा फायदा घायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले आणि नरमाईचे धोरण स्वीकारून मुअज्जम सोबत बोलणी सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबास २२ एप्रिल १६६७ रोजी एक पत्र लिहिले...
“हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकुम पाळण्यात मोठे भूषण मनात आहे हिंदुस्तानच्या बादशहाची फौज मजवर चालून येत आहे त्यास टक्कर देण्याचे सामर्थ्य कोणात तरी आहे काय ? म्हणून माझी विनंती आहे कि माझा मुलगा संभाजी यास ४ हजाराची मनसब मिळावी माझ्याकडे जे किल्ले होते ते मी अगोदरच बादशाहाला दिले आहेत आणि माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेस अर्पण आहे” (शि.प.सा.सं.ले – ११५८)
हे पत्र वाचून औरंगजेबाने महाराजांच्या वकिलास बोलावले आणि म्हणाला - “तुझ्या मालकास जाऊन त्यास कळव कि तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत, आणि तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलुख तू काबीज करशील तो तुला देऊ, स्वताच्या मुलखातच कायम रहावे, तुझ्याकडे असलेला प्रत्येक महाल शहजाद्याकडे रुजू कर” (ए.फा.सा.खं-६-ले-५०)
अश्या प्रकारे छत्रपती संभाजी राजे पुन्हा मुगली मनसबदार झाले. औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर छत्रपती संभाजी राजे कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ एप्रिल १७३४*
मल्हारराव होळकरांनी दलेलसिंग आणि संग्रामसिंग या राजपूत राजांना अस्मान दाखवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ एप्रिल १७३७*
मराठ्यांनी बेलापूरचा किल्ला जिंकला
पोर्तुगिजांनी किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ एप्रिल १८१८*
कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment