आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष १४ एप्रिल
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १६६४*
जसवंतसिंह राठोड याने सिंहगडावर सुलतानढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १६६५*
“इ.स. १६६५ एप्रिल १४. कॉन्सल लॅनॉय आलेपो-अर्ल ऑफ विंचिलझिया
सुरतेच्या प्रेसिडेंटचे पत्र आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरत सुरक्षित आहे. परंतू मोगलांच्या मुलुखांत ते स्वैर संचार करुन कित्येक शहरे लुटीत आहेत. बादशहाचे बडें सैन्य त्यांच्यावर आले आसतांहि वाटेंत शत्रुविरुद्ध नाकेबंदी करीत करीत ते थेट गोव्या पर्यंत किनार्याने जाऊन आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १६६७*
रांगणा किल्ल्याला आदिलशाहीचा वेढा
१४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १६७२*
पानिपत युद्ध जिंकूनही मराठ्यांचा धसका घेतलेला अहमदशहा अब्दालीचा मृत्यू
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १६७५*
छत्रपती महाराणी ताराबाई जयंती
महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली तळबीड येथे झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १७३६*
चिमाजीअप्पांनी मोघल बादशहाचा हस्तक जंजिरा येथील सिद्दीसाताचा पराभव करुन मराठी सत्तेचा दरारा बसविला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १८१८*
बाकाबाईसाहेब (दुसऱ्या रघुजीराज्यांच्या तिसऱ्या पत्नी होय) यांचा पुत्र परसोजी सिहासनावर बसवले
दुसऱ्या राघोजीराजांच्या मृत्यूनंतर (२२ मार्च १८१६) त्यांचा मुलगा परसोजी यांच्या अपंगत्वामुळे भोसले दरबारात वाद निर्माण झाला. कार्यकारी शासक (रिजंट) कोण असावा म्हणून बाकाबाईसाहेब व दुसऱ्या रघुजीराजांचा पुतण्या आप्पासाहेब यांच्यात स्पर्धा सुरू झाली. परंतु परसोजी यांना १४ एप्रिल १८१८ रोजी समारंभपूर्वक सिहासनावर बसवण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १८९१*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १९४४*
वाळवा तालुक्यात क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन केले होते. नागनाथअण्णा त्यांचे सहकारी होते. नागनाथअण्णा यांनी १४ एप्रिल १९४४ रोजी धुळ्याजवळील चिमठाणा येथे सरकारी खजिना घेऊन जाणारी गाडी लुटली. अटक झाल्यावर सातारा जेल सहजपणे फोडून पलायन केले. इंग्रज सरकारबरोबर युद्ध करणारे क्रांतिकारक होते. इंग्रजांच्या विरुध्द लढण्यासाठी पोलीस ठाण्यातून बंदुका पळवल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ एप्रिल १९६२*
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या स्मृतिदिन
अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांचा आज स्मृतिदिन !
त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतीय 'अभियंता दिन' म्हणून पाळण्यात येतो. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. पुण्याची भुयारी गटार योजना, खडकवासला धरण, भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे, म्हैसूरचे कृष्णराजसागर धरण या कामांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय सह्याद्री, जय गडकोट"* 🚩
Comments
Post a Comment