आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १६६०*
स्वराज्यावर चालून आलेला मुघल सरदार शाहीस्तेखान सासवडहून राजेवाडीला आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १६६५*
पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात. पुरंदरचा बालेकिल्ला दिलेरखानाशी व मिर्झाराजांशी झुंजू लागला. वज्रगड व माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एल्गार सुरू झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १६७०*
छत्रपती शिवरायांनी लोहगड जिंकला. तसेच मराठा फौजांनी करमाळा नजीक परांडा, नगर, जुन्नर आणि इतर ५१ मुघल महाल व ठाण्यांवर हल्ले केले

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे सन १६७१*
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पत्रांचा कालावधी हा सन १६७१ मधील एप्रिल ते सप्टेंबर असा सहा महिन्यांचा आहे. अवघ्या सहा महिन्यात शिवाजी माहाराजांच्या संबधी धुर्त इंग्रजांची तीन वेगवेगळी मते बदललेली दिसतात. 

दिनांक ८ एप्रिल सन १६७१ रोजीच्या पहिल्या पत्रात इंग्रज शिवाजी विरुद्ध मोठे मोगल सैन्य येत असल्यामुळे आनंदात आहेत.

दिनांक १ मे सन १६७१ रोजीच्या दुसर्‍या पत्रात इंग्रज शिवाजीचा "दरोडेखोर  शिवाजी" असा उल्लेख करत आहेत.

दिनांक २५ सप्टेंबर सन १६७१ रोजीच्या तीसर्‍या पत्रात इंग्रज शिवाजीचा " पूर्वेकडीलअत्यंत धोरणी राजा शिवाजी"  असा उल्लेख करत आहेत.

अवघ्या चार महिन्यापूर्वी दरोडेखोर म्हणणार्‍या इंग्रजांना शिवाजी माहाराज "अत्यंत धोरणी राजा" भासू लागले. यातच दडले आहे शिवछत्रपतींच्या कुटनिती, राजनिती, शौर्य, धैर्य, पराक्रम, राज्यव्यवस्था, न्याय आणि दूरदृष्टीचे सार.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १६८३*
पोर्तुगीज सेना फोंड्याच्या परिसरात दाखल झाली. फोंड्याचा किल्लेदार येसाजी कंक आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक यांनी केवळ ६०० सैनिकांच्या मदतीने किल्ल्याचा बचाव सुरु केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १७०७*
औरंगजेबाच्या पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र जिंकायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराणी ताराबाई साहेबांनी याच महाराष्ट्रात बांधले. २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला व मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाई साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले. 
मात्र हार पत्करतील ते मुघल कसले ! औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने मराठ्यांमध्ये दुफळी माजावी या हेतूने दि. १ मे १७०७ रोजी शंभुपुत्र शाहू महाराजांना कैदमुक्त केले. यावेळी कित्येक बडे सरदार शाहूराजांना सामिल झाले. सन १७०८ साली शाहू महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेऊन साताऱ्यास राजधानी घोषित केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १७३९*
नादीर शाह ने १७३९ ला दिल्ली लुटली. १ मे ला शाह ने दिल्ली सोडली. 
शाह ने दिल्ली सोडल्याचं नक्की कारण काय होतं ? 
१. बाजीरावाची उत्तरेकडील कूच ( बुऱ्हाणपूर जवळ ) त्यांचा त्या काळातला उत्तरेतील दबदबा, या भीतीस्तव ? (कारण तो साताऱ्याच्या गादीला पत्र लिहितो, "हिंदुस्थानचा कारभार चालवण्यास हिंदुपती शाहूच योग्य व्यक्ती आहेत, मोहम्मद शाह याला पुन्हा बादशाह नेमले आहे त्यांचे साथीने कारभार चालवावा " ) 
२. त्याचं लुटीच उद्दिष्ट पूर्ण झालं होतं ? (सम्पूर्ण इराणचा कर ३ वर्ष नंतर त्याने माफ केला होता ) 
३. की त्याला मराठ्यांशी लढायचेच नव्हते तो त्यांना शत्रूच मानत नव्हता.
इतिहासात जर तर चा प्रश्न विचारायचा नसतो पण समजा बाजीराव आणि शाह समोरासमोर आले असते तर पुढे जे घडलं ते पानिपत घडलंच नसत ? 
शाह बाजीरावांकडून हरला असता ? (कारण यावेळेस नजीब, शूजा असं कुठलं गटबंधन नव्हतं याउलट बाजीरावाचे राजपूतनाशी चांगले सम्बन्ध तयार झाले होते (त्यांनी बाजीरावाला आपल्या बरोबरीच्या सुवर्ण आसनांवर बसवले होते ) बुंदेलखंड वर तर त्याचे उपकार होतेच ) 
(नादिरशहा देखील कसलेला सेनापती होता. कर्नाल युदधात त्याने सहापट मुघल सैन्याला धूळ चारली होती (हे युद्ध सामरिक युद्धरणनीतीचा उत्तम नमुना मानलं गेलंय.))

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १७३९*
मराठ्यांनी चिमाजीअप्पासह वसईवर हल्ला केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १७६५*
दुसरे संभाजीराजे (करवीर) व त्यांची पत्नी राणी 
जिजाबाईंचे राज्यकारभारात बारीक लक्ष असे. 
पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांचे प्राबल्य वाढत होते. त्यांनी काही तरी कुरापत काढून सिंधुदुर्ग दि. १ मे १७६५ रोजी घेतला. करवीर राज्याचा हा किनाऱ्यावरील प्रमुख किल्ला पडल्यानंतर इंग्रजांना पायबंद घलण्यासाठी जिजाबाईंनी आपल्या परीने अथक प्रयत्न केले. कोंकणातील अन्य किल्लेदारांना पत्रे लिहून सावधनतेचा इशारा दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १८१८*
प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला आणि तो नाणेघाटाच्या म्हणजेच जीवधनच्या दिशेने निघाला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १८१८*
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १८४९*
सातारा राज्य खालसा
धाकटे शाहूमहाराज इ.स.१८०८ मध्ये मृत्यू पावल्या नंतर त्यांचा वडील मुलगा प्रतापसिंह छत्रपती बनला. ते इंग्रजांनी पदच्युत करेपर्यंत म्हणजे सप्टेंबर १८३९ पर्यंत छत्रपतीपदी विराजमान राहिले. त्यांच्या नंतर अप्पासाहेब उर्फ शहाजी ह्यांना इंग्रजांनी नोव्हेंबर १८३९ ला सातारा गादीवर बसवले. अप्पासाहेब एप्रिल १८४८ रोजी मरण पावले. मृत्युपूर्वी त्यांनी अम्बुजी भोसले शेडगावकर यांच्या व्यंकोजी ह्या मुलास दत्तक घेतले होते. पण तत्कालीन इंग्रज गव्हर्नर जनरल डलहौसीने ह्या दत्तकास मंजुरी देण्यास नकार देऊन १ मे १८४९ रोजी सातारा राज्य खालसा केले.अशा प्रकारे शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा त्यांच्या मृत्यु ( ३ एप्रिल १६८० ) नंतर १६९ वर्षांनी अस्त झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १९३०*
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले आहे. या सर्वांमध्ये हुतात्मा भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे बलिदान कधीच विसरण्यासारखे नाही. २३ मार्च १९३१ रोजी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली.
या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. त्या बाजूवर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा अखेरचा शब्द नाही. ज्या बाबींकडे आजवर पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही, अशा काही बाबी ते नजरेस आणू इच्छिते. हा खटला म्हणजे एक फार्सच होता, या मुद्द्याची सखोल चिकित्सा आजवर झालेली नाही. कदाचित साँडर्सच्या हत्येत भगतसिंगचा निःसंशय सहभाग होता, म्हणून अशी चिकित्सा झाली नसेल. पण 'लाहोर कटा' च्या खटल्याचा तपशीलवार अभ्यास गरजेचा आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा  गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला. १ मे १९३० रोजी गव्हर्नर जनरलनी वटहुकयमाद्वारे हा खटला चालवण्यासाठी एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी - हाच या वटहुकमाचा हेतू होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ मे १९६०*
"महाराष्ट्र दिन"
अखंड संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...