जगातला सर्वात श्रीमंत माणुस...!!!*
*जगातला सर्वात श्रीमंत माणुस...!!!*
*जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं," ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का...?*
*बिल् गेट्स म्हणाले, " हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.*
*समोरच्या व्यक्तीनं विचारलं," कोण...!!!*
*बिल् गेट्स म्हणाले,*
*" एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला तर खिशात एकही डाॅलर नसल्याचं जाणवलं सबब मी तो खरेदी करण्याचा विचार सोडुन दिला...!*
*व माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं.*
*समोरच्या त्या पेपर विकणा-या मुलानं माझ्याकडं बघुन तो न्युजपेपर फुकट देण्याचं ठरवलं...!!!*
*तीन महिन्यानंतर योगायोगानं मी त्याच एअरपोर्टवर उतरलो असता मला पुन्हा न्युजपेपर घेण्याचा मोह झाला परंतु त्याही वेळी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मोह आवरला.*
*पण यावेळीही त्याच मुलानं परत मला न्युजपेपर ऑफर केला...!*
*पण मी नम्रपणे नकार दिला, व सांगितलं मी नाही घेऊ शकत...!!!*
*यावर त्या मुलानं सांगितलं की तुम्ही हा न्यूज पेपर घ्या कारण हा मी तुम्हाला माझ्या फायद्याच्या पैश्यातुन देत आहे, त्यानंतर मी तो घेतला...!!!*
*१९ वर्षानंतर मी जेव्हा जगातला श्रीमंत माणुस झाल्यानंतर मला त्या पेपर विकणा-या मुलाची आठवण झाली...*
*मी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, तब्बल दीड महिन्याच्या तपासांती मला तो सापडला..!*
*मी त्याला विचारले," तु मला ओळखतोस का ?*
*तो म्हणाला," हो तुम्ही बिल् गेट्स आहात...!*
*मी म्हटलं, तुला आठवतंय का कि कधीकाळी तु मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस...!*
*तो म्हणाला, "* *हो...दोनदा...!"*
*मी म्हणालो, " मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग...!*
*मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो...!!!*
*यावर तो नम्रपणे म्हणाला, " सर पण तुम्हाला असं वाटत नाही का कि तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही...!"*
*मी विचारले," का...???*
*तो मुलगा म्हणाला, " मी जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा मी गरीब होतो आणि आणि तुम्हाला माझ्या होणा-या फायद्यातुन करत होतो तर तुम्ही मला मदत अशावेळी करत आहात जेव्हा तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात...! म्हणुन तुम्ही तुमच्या मदतीची तुलना माझ्या मदतीबरोबर करु शकत नाही...!!!*
*बिल गेट्सच्या नजरेत तो मुलगा जगातला सर्वात श्रीमंत माणसाहुन श्रीमंत आहे कारण कोणाची मदत करण्यासाठी त्यानं स्वतः श्रीमंत होण्याची वाट नव्हती बघितली...!!!*
*श्रीमंती पैश्यांची नसते तर मनाची असते कारण कोणाची मदत करण्यासाठी श्रीमंत मन असणं देखील आवश्यक आहे...!!!*
Comments
Post a Comment