Posts

Showing posts from September, 2022

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती, महान सेनानी, श्रीमंत राजश्री खंडेराव दाभाडे सरकार यांना विनम्र अभिवादन......🙏🙏🙏🚩

Image
मराठा साम्राज्याचे सरसेनापती , शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या अधिपत्याखाली 1707 सालापासून स्वराज्याचे साम्राज्यात रुपातंर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे गुजरात प्रांत स्वराज्याला जोडणारे, स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतराचा महत्वाचा क्षण , घटना  म्हणजे 1719साली सरसेनापती दाभाडे यांच्या नेतृत्वात महाराणी येसुबाईसाहेब यांच्या 37 वर्षाच्या कैदेतून मुक्तात करत दिल्लीवर भगवा फडकवून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अखंड भारत भुमी एका भगव्या खाली आणण्याचे स्वप्न पुर्ण करत मुघल बादशहाचा त्याच्याच भरदरबारात खुन करवत ,स्वतःच्या पित्याचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेत पुर्ण करण्याच्या या महत्वपुर्ण कामगीरीतील अत्यंत विश्वासू  , पराक्रमी , व्यक्ती म्हणून ज्यांचा आदराने नामउल्लेख होतो  अशा  हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती, महान सेनानी, श्रीमंत राजश्री खंडेराव दाभाडे सरकार यांना विनम्र अभिवादन......🙏🙏🙏🚩 छत्रपती शाहू महाराज चरणी समर्पित🚩🚩🚩

#श्री_नारायणेश्वर_मंदिर

Image
#श्री_नारायणेश्वर_मंदिर पुण्यातून साताऱ्याकडे जाताना पुरंदर आणि वज्रगड या किल्यांच्या पायथ्याशी नारायणपूर या नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात एक सुंदर यादवकालीन आणि पंचक्रोशीमध्ये #श्री_नारायणेश्वर_मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले मंदिर आहे. सदर पश्चिमाभिमुख मंदिर हे किमान ८०० / ८५० वर्ष जुने आहे. मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. पाठीमागचा पुरंदर किल्ला आणि संत  चांगदेवांचे वास्तव्य या साठी हे ठिकाण पूर्वी प्रसिद्ध होत. सध्या मात्र नारायणपूर गावात अलीकडेच नव्याने उभारलेले एकमुखी दत्तमंदिर अधिक प्रसिद्ध आहे.  नारायणेश्वर मंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिराभोवती अंदाजे ५ ते ६ फूट उंचीची तटबंदी आहे. या मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत प्रशस्त असून आवारात असलेल्या एका पारामध्ये एक मोठा दगडी रांजण पुरून ठेवलेला आहे. तो रांजण नाणेघाट किंवा शिरवळ इथे असलेल्या रांजणांशी मिळताजुळता आहे. मंदिराच्या आवारात डाव्या बाजूला काळ्या पाषाणाची ६/६.५ फुटाची मारुतीची मूर्ती आहे.  यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शि

आश्विन शुद्ध ५ पुन्हा सिव्हासनारोहण !!*छत्रपती शिवाजी महाराज यांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्याकरवी ललिता पंचमी दिवशी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला..*🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻

Image
आश्विन शुद्ध ५ पुन्हा सिव्हासनारोहण !! *छत्रपती शिवाजी महाराज यांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्याकरवी ललिता पंचमी दिवशी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला..* 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻 निश्चलपुरी म्हणतो " मी मंत्र म्हणणारे ब्राह्मण निवडले. ते लाल आसनांवर, लाल वस्त्रें परिधान करून मंत्रपठण करू लागले. शुभ दिवस पाहून हे कार्य सुरू झाले. आश्विन शु॥ ५ स मी त्यास राज्याभिषेक केला. राजाने त्या दिवशी सकाळी कूंभपूजा केली. सिंहासनापाशी समंत्रक भूमि शुद्ध केली. नवे सिंहासन मांडले. सिंहासनाच्या सिंहांची पूजा केली. राजा हातांत तरवार घेऊन सिंहासनापाशी गेला. अनेक देवतांची शांति केली. सिंहासनाच्या सिंहांस बळी दिले. पूर्वेकडील सिंहास प्रथम बली दिला. आग्नेयेकडील हर्यक्ष या सिंहास, दक्षिणेकडील पंचास्य या सिंहास, नैर्ऋत्येकडील केसरी नावाच्या सिंहास, पश्चिमेकडील मृगेंन्द्र या सिंहास, मग वायव्येकडील शार्दूल नावाच्या सिंहास, नंतर उत्तरेकडील गजेंद्र या सिंहास, ईशान्येकडील हरि या सिंहास राजाने बली दिले. या आठ सिंहाच्या पाठीवर राजाचें राज्याभिषेकाचें आसन होतें. आसनावर निश्चलने यंत्र ठेवि

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२२ सप्टेंबर १४२२*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ सप्टेंबर १४२२* यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात औसा किल्ल्याला महत्व आले. बहामनी घराण्याचा ९ वा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. महमुदशहा बहामनीने इ.स.१४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले. इ.स.१५२६ मध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन ५ शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर हि राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परीघात आदिलशाही विरुध्द अनेक लढाया झाल्या. मोगल बादशहा शहाजहानने सप्टेंबर १६३६ मध्ये औसा किल्ला जिंकून घेतला व त्याने मुबारक खानाची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ सप्टेंबर १६६०* १७ ऑगस्ट १६६० ला आदिलशाह स्वतःच पन्हाळगड घेण्यासाठी विजापुराहून निघाला. शिवरायांना जेव्हा हे कळले तेव्हा त्याने लगेच एका वक

सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे अनुयायी, परखड विचारवंत, व्रतस्थ शिक्षणमहर्षी, मानवतेचा वटवृक्ष व पुरोगामी विचारांचे प्रणेते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Image
सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे अनुयायी, परखड विचारवंत, व्रतस्थ शिक्षणमहर्षी, मानवतेचा वटवृक्ष व पुरोगामी विचारांचे प्रणेते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!  शिक्षणातून समाजाचे प्रबोधन होऊ शकते, त्यासाठी शिक्षणाचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा विचार घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवली. कमवा आणि शिका हा स्वावलंबी जीवनाचा मूलमंत्र दिला. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीच्या इतिहासात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल. #कर्मवीर #भाऊराव_पाटील  #karmveerbhauraopatil

स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी, 3 शंकराचार्यांपैकी एक, हिंदू धर्माचे सर्वोच्च पीठाधीश्‍वर यांच निधन झाले त्यांच्या दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली, ईश्वर त्यांना त्यांच्या चरणी स्थान देवो

Image
स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी, 3 शंकराचार्यांपैकी एक, हिंदू धर्माचे सर्वोच्च पीठाधीश्‍वर यांच निधन झाले त्यांच्या दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली, ईश्वर त्यांना त्यांच्या चरणी स्थान देवो. 💐💐🙏🙏 #स्वरूपानंद_सरस्वती_जी

छत्रपति शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरमध्ये प्रचंड विकसित झालेले शिकारीचे एक प्रभावी तंत्र म्हणजे 'चित्ता शिकार' होय

Image
#चित्ता_शिकार / Cheetah Hunting छत्रपति शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरमध्ये प्रचंड विकसित झालेले शिकारीचे एक प्रभावी तंत्र म्हणजे 'चित्ता शिकार' होय. चित्ता शिकार अथवा ज्याला Cheetah Hunting या नावाने ओळखले जायचे ती म्हणजे चित्त्याची शिकार नसून चित्त्याकडून केली जाणारी काळवीटाची शिकार होय. शाहू महाराज एक निष्णात शिकारी होते. चित्ता हंटींग, हाउंडस् हंटींग, कोळसुंदा हंटींग असे नानाविध शिकार तंत्र स्वतः महाराजांनी विकसित केले होते. तूर्त आपण चित्ता हंटींग बद्दल माहिती घेऊ.... 'चित्त्याचा पळण्याचा वेग असामान्य असतो आणि त्यात एक शास्त्रोक्तपणाही असतो. नजरेने टिपता येणार नाही इतका त्याचा वेग असतो. निसर्गातील अति वेगवान प्राणी हरिण जर पूर्ण शक्ती एकवटून पळायला लागला तरी त्याला पकडण्यासाठी चित्त्याला फारसे प्रयास पडत नाहीत.' चित्त्याचे हेच वैशिष्ट्य हेरुन काळवीटांच्या शिकारीसाठी महाराजांनी चित्त्यांचा खुबीने उपयोग केला. महाराजांकडे शक्यतो आफ्रिकन चित्ते असायचे. पूर्वी चित्त्यांना शिकारीसाठी बैलगाडीतून नेले जाई. पण हि पद्धत सोयीस्कर नव्हती. त्यामुळे महाराजांनी खास चित्त्यांसा

महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी अशा मानाच्या बैलगाडा स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळणारा काटे-पाटलांचा ‘बनश्या’ गुरुवारी देवाघरी गेला. प्राणीमात्रांवर दया करा…प्रेम करा ’’ असा केवळ संदेश दिलाच पण , प्रत्यक्ष आयुष्य जगणारी पिपळे सौदागर अश्या काटे-पाटलांसारखी अनेक कुटुंब आहेत.

Image
पिपळे सौदागर ची शान बनश्या गुरुवारी काळाच्या पडद्या आड गेला.नगर, पुणे जिल्ह्यात शेकडो बैलगाडा अनेक शर्यती गजवलेल्या काटे पाटील याच्या बनश्याने पिपंरी चिंचवड उदयोग नागरी च नाव दूरवर नेले.पिपंरी चिंचवड शहराने  अतिशय खेडे गावे ते आधुनिक शहर  असा प्रवास पिपळे सौदागरचा अलीकडच्या 27वर्षात बनश्या बैलाने पहिला होता. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी अशा मानाच्या बैलगाडा स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळणारा काटे-पाटलांचा ‘बनश्या’ गुरुवारी देवाघरी गेला. आणि वाऱ्या सारखी बातमी पिपंरी चिंचवड तसेच संपूर्ण जिल्हात पसरली आहे. गोठ्यातला बैलांशी जिव्हाळा निर्माण करणारी आपली भारतीय संस्कृती आहे.महाराष्ट्रात पोटच्या मुलांसारखं बैल जपणारी लोक अखंड महाराष्ट्रात आज हीं जुन्या पिढीतील आहेत. जनु हीच शिकवण आलेली तरुण पुढी शहरातील दिमाखता पुढे घेउं जात आहे.तळहातावरील फोडाप्रमाणे बैलांचं संगोपण होत असायच. हया बनाश्याच. ‘बनश्या’ला अखेरचा निरोप देताना काटे- पाटील कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू पाहिल्यानंतर गहिवरुन आले होते. त्याचे व्हिडीओ सोशल मीडिया वर हजारो लोकांनी पहिले आहेत. ‘‘प्राणीमात्रांवर दया

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ (वय 103 वर्षे) यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले.त्याना भावपूर्ण विनम्र अभिवादन

Image
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ (वय 103 वर्षे) यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले.     क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील, बर्डे गुरुजी यांच्या सोबत सांगली जिल्ह्यात क्रांतिकारकांची फौज उभी राहिली. त्या  तुफान सेनेतील एक क्रांतिकारक म्हणजे बाबू हसन नदाफ. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील जन्माला आलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ हे गांधीजी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. भूमिगत होऊन तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वे रूळ उखडणे, रेल्वे लुटणे अशा धाडसी पणाने  इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र  चळवळीत मोठा सहभाग घेतला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर अटक वॉरंट काढले. ते सापडत नाहीत म्हटल्यावर पकडून किंवा पत्ता सांगणाऱ्यास बक्षीस ही ठेवले.   पुढे शेनोळी येथे रेल्वे लुटणे होत असताना गोळीबार झाला त्

श्री मोरया गोसावी समाधी मंदिर शिलालेख ●

Image
● श्री मोरया गोसावी समाधी मंदिर शिलालेख ● शके १५८० विळंब संवत्सरे  कार्तिक श्रुध १२ ते दिवसि  देवाळयास आरंभ वि  कारि संवत्सरे आषाढ श्रुध  ४ सोमवारि संपुर्ण   शके १५८० विलंबी संवत्सर कार्तिक शुद्ध १२ म्हणजे २७ नोव्हेंबर १६५८ वार बुधवार या दिवशी देवालयाच्या बांधकामास आरंभ आणि (शके १५८१) विकारी संवत्सर आषाढ शुद्ध ४ सोमवार म्हणजे १३ जून १६५९ या दिवशी देवालयाचे बांधकाम संपूर्ण. श्री क्षेत्र चिंचवड येथे पवनेच्या काठी श्री मोरया गोसावी यांची संजीवन समाधी आहे. समाधीवर श्रीगणपतीची मूर्ती स्थापन करून हे देवालय बांधले तेव्हा तेथे हा शिलालेख देवनागरीत कोरलेला आहे. समाधीसमोर तोंड करून उभे राहिले असता गाभाऱ्याच्या बाहेरील दगडी मंडपात उजव्या बाजूस एक मोठे शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर म्हणजेच गाभाऱ्याच्या उजव्या भिंतीत या लेखाची सुमारे दोन फूट लांबी रुंदीची शिला मध्यावर बसविलेली आहे. शिलालेख पाच ओळींचा आहे. हा शिलालेख सुस्थितीत आहे. या शिलालेखामुळे श्री मोरया गोसावींचे हे संजीवन समाधी मंदिर २७ नोव्हेंबर १६५८ ते १३ जून १६५९ या काळात बांधलेले आहे हे समजते.  संकलन :- सिध्देश दादासो पवार  @g

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१६ सप्टेंबर १६६८

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ सप्टेंबर १६६८* १६ सप्टेंबर १६६८ अदिलशहाने सोलापूर किल्ला व त्या खालील १८० लक्ष होनांचा मुलुख मोगलांना देऊन त्यांच्याशी तह केला. लवकरच विजापुरकरांनी महाराजांशी ही पुन्हा नव्याने तह केला. पश्चिम किनाऱ्याची सुभेदारी महाराजांना प्राप्त झाली. मोबदल्यात त्यांनी ६ सहा लक्ष रुपये खंडणी अदिलशहास द्यावी असे ठरले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ सप्टेंबर १६८१* औरंगजेबचा बंडखोर मुलगा अकबर आपल्या दुर्गादास नावाच्या सल्लागाराला घेऊन संभाजी राजांकडे  जून १६८१ मध्ये सुधागड पाली येथे आश्रयासाठी आला. संभाजी राजांनी अकबरच्या खिदमती साठी अण्णाजी दत्तो, बालाजी आवजी व हिरोजी फर्जंद ह्या ज्येष्ठ सहकार्यांना ठेवले होते. याचा गैरफायदा घेऊन ह्या मंडळींनी अकबरच्या मदतीने संभाजी राजांना पदच्युत करून पुन्हा राजाराम महाराजांना नियुक्त करण्याचा कट रचला. पण दुर्गादास ने अकबरला संभाजी राजे ह्या मंडळीन मार्फत आपली परीक्षा पाहत असावे, असे सांगितले व कटाची संपूर्ण बातमी त्यांनी संभाजी राजांना दिली. एकदा माफ करून पण कटातील सूत्रधार सुधारले नसल्याचे ध्यान

३५० वर्षापूर्वी अखंड मराठा साम्राज्याची राजधानी बांधणारे अभियंता सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांनी रायगड सारख्या भव्य दिव्य वास्तू उभारली जी आज चांगल्या चांगल्या इंजिनियरला लाजवेल अशा या स्वामिनिष्ठ सेवकास मुजरा🙌🏻

Image
सिमेंट मध्ये जान असून चालत नाही हो.बांधनाऱ्याच्या काळजात पण ईमान असायला हवंय.... कुठल्याही विद्यापीठाची पदवी न घेता ३५० वर्षापूर्वी अखंड मराठा साम्राज्याची राजधानी बांधणारे अभियंता सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांनी रायगड सारख्या भव्य दिव्य वास्तू उभारली जी आज चांगल्या चांगल्या इंजिनियरला लाजवेल अशा या स्वामिनिष्ठ सेवकास मुजरा🙌🏻🚩- #engineersday

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ सप्टेंबर १६७५

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ सप्टेंबर १६७५* खांदेरी व इतर ठिकाणी इंग्रजांच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन छत्रपती शिवराय व इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" यांची रायगडावर पुन्हा भेट. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ सप्टेंबर १६७८* छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना १५ सप्टेंबर १६७८ रोजी सनद लिहून दिली. ही सनद छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना १५ सप्टेंबर १६७८ रोजी अर्पण केल्याचा स्पष्ट उल्लेख सनदेत आहे, सनदेत आजुबाजुची काही गावे सुद्धा इनाम दिल्याचा उल्लेख आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ सप्टेंबर १६७९* मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून खांदेरी बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला व त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारी ‘रिवेंज’ नामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली. मिन्चीन पोचताच ह्युजेसने ताबा मिन्चीन कडे सोपवला व तो लाकुडफाटा व इतर सामान मिळवण्याकरिता काही काळ मुंबईला परतला. ह्या कालावधीत मिन्चीन गस्त सांभाळीत होता परंतु मराठ्यांच्या छोट्या होड्या मोठ्या जहाजास चकव

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ सप्टेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ सप्टेंबर १६७८* "दक्षिण दिग्विजय मोहीम" कर्नाटक, तमिळनाडू येथे दीर्घकाळ चाललेली दक्षिण दिग्विजय मोहीम आटोपून परतीच्या प्रवासात छत्रपती शिवराय "नागापट्टण" येथे मुक्कामी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ सप्टेंबर १७६१* पानिपतच्या पराजयामुळे मराठ्यांच्या राज्यात चोहोकडे दंगेखोर संस्थानिक प्रबळ होऊन बखेडे करू लागले. त्यांत इंग्रजांनीही आपला भाग उचलला. सन १७६१ मध्ये निजामअल्ली पुण्यावर चालून येत आहे असे पाहून रघुनाथरावाने मुंबईकरांकडून दारूगोळा व सैनिक कुमक मागितली. मुंबईकर इंग्रजांनी ही चालून आलेली संधी न दवडता १४ सप्टेंबर १७६१ रोजी मराठ्यांशी एक व्यापारी करार केला. त्यात सहा कलमे असून व्यापाऱ्यास व जहाजास मराठ्यांच्या मुलखात त्रास होता कामा नये; जे मराठे अधिकारी इंग्रजी व्यापाऱ्यास त्रास देतील त्यांना शिक्षा व्हावी; मराठ्यांकडे जे युरोपियन सैनिक असतील त्यास त्यांनी इंग्रजांच्या स्वाधीन करावे; मराठे सैनिक फितूर होऊन इंग्रजांच्या आश्रयास गेले असतील त्यांना इंग्रजांनी मराठ्यांच्या स्वाधीन करावे; रामजीपंताने सिद्दीचा घ

पितृपक्ष🌸🍱🦅

🌸पितृपक्ष🌸 🍱🦅 वडीलांचं रूप घेऊन कावळा घरी आला ताटातील मेनू पाहून बोलाव वाटलं त्याला 🍱🦅 बरं नव्हतं तेव्हा कधीच आणली नाहीस गोळी,  आज कशाला वाढतोस रे ताटात पुरणाची पोळी!  🍱🦅 विनाकारण भांडण होता  दिसले खरे रूप,  कशाला वाढतो मला आता गावरान तूप!  🍱🦅 चटणी वर तेलासाठी  होत नव्हता राजी,  कशाला वाढतो पात्रावर वडे आणि भजी!!  🍱🦅 प्रेम नाही,जिव्हाळा नव्हता नाही दिलीस साथ, आज कशाला वाढतो रे पात्रावर वरण भात!! 🍱🦅 जबरदस्ती अंगठा घेऊन केली घराची वाटणी, कशाला वाढतो पात्रावर आज लोणचं चटणी!!  🍱🦅 हिस्सा वाटणीसाठी केली  बहिणी संगे दूरी, आता काय उपयोग वाढून पात्रावरती पुरी!!  🍱🦅 आयुष्याभर ठेवली रे माझ्या बद्दल अढी,  आता कोण पिणार ती द्रोणामधली कढी!!  🍱🦅 वेगळा राह्यलो तेव्हा नाही दिलास मला धिर,  आज कशाला वाढतो तू पात्रावरती खिर!!  🍱🦅 सणासुदीला आणलं नाही मला नवं कापड,  आता कशाला वाढतोय कुरडई अन् पापड़!!  🍱🦅 आजारी असताना तू धुतली ना सतरंजी,  आता कशाला वाढतो रे पात्रावर करंजी!!  🍱🦅 जिवंत असतांना पोरा दिले असतेस लक्ष,  तृप्त झाले असते पुर्वज नसता  पितृपक्ष!!  🍱🦅 पितरांचा मिळून तयार होत

जय शिवराय

हे माहीती आहे का ? 👉 जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने  स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला.... तो राजा म्हणजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏 👉 जगातील पहिलीच "जमीन सातबारा पद्धत" सुरु करणारे आणि त्यानुसार सारा (Tax) पध्दत याचे निर्माते - छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏 👉 जगातील पहिलीच सुवर्ण संकल्पना "पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा" म्हणजेच सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यात उतरवणारे - छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏 👉 जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच झाला तो राजा म्हणजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏 👉 जगाच्या इतिहासातील पहिलेच व्यक्तिमत्वं असे आहे की ज्या व्यक्तिमत्वासाठी ३५० वर्षे झाले तरी आजही १२०+ देशात अभ्यास चालु आहे असे एकच जिजाऊंचे पुत्र - छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏 👉 जगाच्या इतिहासातील पहिलेच स्वराज्य ज्या काळात एकही भिकारी कधी पहायला मिळत नव्हता त्या सुवर्णकाळाचे साक्षात् परमेश्वर - छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏 👉 जगातील "सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड" जो किल्ला पाहुन जगभरातील अभियंत्यानी राजगड ब

गुरुचरित्राचा अध्याय रोज का वाचावे ? वाचनाचे फायदे : पाळावयाचे नियम !

गुरुचरित्राचे पारायण करताना काही नियम लक्षात घेऊनच तसे पारायण करावे. महिलांना येणारी मासिक पाळी या वेळेत गुरुचरित्राचे पठण करू नये. त्याचबरोबर जर तुमच्या घरात सुतक असेल तरीदेखील चरित्राचे पारायण करू नये. गुरुचरित्राचा 14 वा अध्याय रोज तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही सतत आजारी पडत असेल तर गुरुचरित्रातील 14 वा अध्याय याचे पठण केलाने गुरुमाऊलींचे कृपा तुमच्यावर राहून तुमचे आजार नक्कीच बरे होते. मित्रांनो, गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जर तुम्ही रोज पठण केले. तर तुमच्या ज्या काही इच्छा, आकांशा असतील त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर गुरुमाऊलींचे कृपा तुमच्यावर कायम राहील. गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. त्याच बरोबर कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची शक्ती ही गुरुकृपेने आपल्याला मिळते. तुमच्या घरात भरभराटी होऊन अन्नधान्यांना कधीही कमतरता भासणार नाही. तुमच्या घरावर कोणतेही संकट येणार नाही. कोणाची तरी वाईट दृष्टी असेल तर ती ही नष्ट होईल. गुरुचरित्र या ग्रंथामध्ये गुरुमाऊलींनी कशाप्रकारे संकट दूर केली आहे. त्याच बरोबर त्यांची अनुभव व त्यांचे लीला यामध्ये सांगितलं आहेत. त्य

साक्षात आदिशक्ती आदिमाया भवानी चे रूप🙏

Image
वणीच्या भगवतीच्या मूर्तीवर 2000kg शेंदूर निघाला आणि शेवटचा शेंदूर 1000 वर्षापूर्वीचा होता असा अंदाज लावला जात आहे. आज पायापर्यंत ची मूर्ती शेंदूर काढल्यामुळे  पुर्ण प्रकट झाली आहे. दोन फुट जाडीचा शेंदुर लेप काढल्यानंतर दिसणारे सप्तशृंगी मातेचे रुप पहा किती सुंदर दिसत आहे.  साक्षात आदिशक्ती आदिमाया भवानी चे रूप🙏

अंतराळ संशोधन प्रोजेक्टसाठी निवड झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन..!! 💐

Image
सातारची कन्या साक्षी पाटील (साताऱ्याची पाटलीनं) हिचे भारतातील एकमेव कॅंडिडेट म्हणुन नासा या अंतराळ संशोधन प्रोजेक्टसाठी निवड झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन..!! 💐 आजोबांच्या गावासाठी केलेल्या कार्याने धोंडेवाडी गावाला “आनंदगाव” (ता. कराड, जि. सातारा) संबोधले जाऊ लागले आहे. तर आता नातीने तिच्या कार्यातून देशा महाराष्ट्रा सह आपल्या साताऱ्याचे नाव उंच केले आहे..!! #सातारीकन्या #अंतराळवीर  #नासा #insta_satara  #satara  #maharashtra  #india

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१२ सप्टेंबर

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ सप्टेंबर १३९८* मोगल आक्रमक तैमूरलंगाने ९३,००० मुस्लिम सैन्यानिशी सिंधू नदी पार केली आणि तो निघाला लाहोरच्या दिशेने. हीच सुरुवात होती तैमूरलंगाच्या दिल्लीवरील आक्रमणाची. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ सप्टेंबर १६६२* छत्रपती शिवरायांनी मोरेपंतांना पेशवेपदी नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ सप्टेंबर १६६६* "अखेर सह्याद्रीचा वाघ औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दाखल झाला. आग्र्याहून सुटका झाल्यावर छत्रपती शिवरायांचे आज गुंजन मावळ मधील राजधानी "किल्ले राजगड" वर आगमन झाले. प्रमुख सहकारी "निराजी रावजी" तसेच इतर सवंगड्यांसमवेत संन्यासी च्या वेशात हे सर्व जण राजगडी पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ सप्टेंबर १६८६* विजापूर अखेर मुघलांनी जिंकले. सहा महिन्याच्या अथक परिश्रमा नंतर विजापूर राज्याचा पाडाव झाला आणि अजून एक दक्षिणेतली शाही मुघलांनी गिळंकृत केली. शेवटचा सुलतान सिकंदरशाह आदिलशाह याने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आणि रसूलपूर येथील औरंगजेबाच्या छावणीत जाण्यास तो विजापूरच

एकाने देश तर एकाने महाराष्ट्र घडविला.

Image
एकाने देश तर एकाने महाराष्ट्र घडविला.

श्री त्रिम्बकेश्वर महादेव चरणी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी अर्पण केलेला व वापरात असलेला रतनजडीत मुगुट अंदाजे सन १७५५

Image
श्री त्रिम्बकेश्वर महादेव चरणी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी अर्पण केलेला व वापरात असलेला रतनजडीत मुगुट अंदाजे सन १७५५

स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी, 3 शंकराचार्यांपैकी एक, हिंदू धर्माचे सर्वोच्च पीठाधीश्‍वर यांच निधन झाले त्यांच्या दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली, ईश्वर त्यांना त्यांच्या चरणी स्थान देवो

Image
स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी, 3 शंकराचार्यांपैकी एक, हिंदू धर्माचे सर्वोच्च पीठाधीश्‍वर यांच निधन झाले त्यांच्या दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली, ईश्वर त्यांना त्यांच्या चरणी स्थान देवो. 💐💐🙏🙏 #स्वरूपानंद_सरस्वती_जी

घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का* ?" हे आवश्य वाचा ****

*घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का* ?" हे आवश्य वाचा **** कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत  *ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे*. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. *आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया* व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही *प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे*. *वैशिष्ट्ये* : (१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे *रचयिता  वेगवेगळे* आहेत. (२) ही चारही कडवी *वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली* आहेत. (३) पहिले कडवे *मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत* भाषेत आहेत. (४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही *सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली* जाते. (५) यातील एकही कडवे *गणपतीला उद्देशून* नाही. (६) वेगवेगळ्या कवींची व *वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून* ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे *अर्थासह* पाहूया १) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |  प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |  भावे ओवाळीन म्हणे नामा | *वरील क

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*६ सप्टेंबर १६७५*छत्रपती शिवाजी महाराज

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *६ सप्टेंबर १६७५* छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" किल्ले रायगडवर हजर. राज्याभिषेक समारंभ आटोपताच डिसेंबर १६७४ मध्ये औरंगाबाद परिसरात आले आणि मुघली मुलखात लूट करण्याबरोबरच त्यांनी इंग्रजांच्या डूमगावच्या वखारीवर हल्ला केला आणि ती लुटून १० हजारांची लूट मिळवली. मुघल आणि आदिलशाही मुलखातील आपल्या वखारी सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्याने इंग्रजानी सॅम्युअल ऑस्टिन याला आपल्या वखारीना कौल मागण्यासाठी शिवाजी महाराजांच्याकडे पाठवायचे ठरवले. याप्रमाणे महाराजांसाठी ५०० रुपयांचा नजराणा घेऊन ऑस्टिन आपला सहकारी रॉबर्ट हार्बीनसह रायगडाकडे निघाला. या भेटीत त्याने महाराजाना भेट देण्यासाठी लहान पितळी तोफ, मोरोपांत व आण्णाजीपंत यांच्यासाठी स्कारलेट कापड, १ आरसा, १ तोळा कस्तुरी, चिटणीस व सेनापती ना देण्यासाठी ३ यार्ड कापड व इतर भेटवस्तू सोबत घेतल्या. ऑस्टिन २ सप्टेंबरला निजामपूर येथे पोहोचला. तिथे त्याची भेट मोरोपंत व अण्णाजीपंतांशी झाली. पण ते पुढे जुन्नरला जाणार असल्याने त्यांच्याकडून महाराजांसाठ

श्री क्षेत्र खरसूंडी प्राचीन इतिहास आणि कुळदेव सिद्धनाथ मंदिर

Image
महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र आणि अजून भारत भर असणाऱ्या भविकांचे कुलदेव व श्रद्धा ठिकाण असणारे भक्त सिद्धनाथ देवाचं आहेत. माणदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे खरसुंडीचा सिद्धनाथ. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिध्दाचे सुमारे ११२५ वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे. आज आपण याच खरसूंडीचा राजा सिद्धनाथ याची माहिती पाहू. आजच्या भक्ती मय प्रवासाला सुरवात करूया. खरसूंडी हे सिद्धनाथ देवाचे शेवटचे ठाणे आहे. पूर्वीच्या काळी भारत वर्षा मध्ये प्रचडासुरु नावाचा राजा होऊन गेला.त्याने हाहाकार माजवला होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी.काळभैरव देव निघाले होते.घनघोर युद्धात प्रचंडासुरु व त्याच्या मुलाचा म्हजे सुवर्ण सुराचा वध केला.पुढे त्यानी दक्षिण भारतात जाऊन अनेका वटणीवर आणले.आणि पुढे ते मान देशातील म्हसवड येथे आले.त्याचा मोठा भक्त नयाबा नावाचा भक्त दूरहुन म्हसवड येथे येऊन  पूजा करत होता. त्याच्यावर प्रसन्न होऊन नयाबा ला सप्नात दृष्टांत  दिला.च्या एक देशी गायी कधीच वेली नव्हती. तिला अचानक कसेतून खरवजाच्या धरा वाहू लागल्या आणि थरावर थर साठून दोन शि

फेक अकाउंट कसे ओळखावे आणि धोका कसा टाळावा?

फेक अकाउंट कसे ओळखावे  आणि धोका कसा टाळावा ? ⓒ धनंजय देशपांडे  - अनेक मित्रांनाही विशेषतः मैत्रिणींनी विचारलेला हा प्रश्न ! त्यांना त्यांना तसे पर्सनलवर सांगत होतोच पण विचार केला की त्यांना जे सांगितलं तेच सर्वाना सांगावे, म्हणून हे सार्वजनिक करतोय. खरेतर माझ्या वॉल वर याविषयी डिटेल मध्ये पोस्ट असतात ! त्या जरा वेळ काढून पहा ! असो  तर फेक अकाउंट कसे ओळखायचे ते थोडक्यात सांगतो,  १) फेक अकाउंटची शंका आली असेल तर त्याच्या वॉलवर पाहायच. जरा स्क्रोल करून पोस्ट पाहायच्या. आणि त्याच्यावर पडलेल्या कॉमेंटपण वाचायच्या. कुठंतरी एखाद्या पोस्ट वर रिप्लाय देताना वाक्यात तो / ती अडकतो अन जेंडर ओळखू येते. कारण माणूस सवयीचा गुलाम असतो. कितीही नाटक (फेक) केलं तरी आतलं जेंडर नकळत बाहेर येतेच जे त्याच्याही नकळत घडते.  आणि मग अशा व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट ला "हूड" म्हणायच. आणि तुमच्या अनावधानाने अशी व्यक्ती ऑलरेडी लिस्ट मध्ये असेल तर त्याला सरळ "ब्लॉक" चा नारळ द्यायचा आणि जमलं तर report  spam करायच.  २) आणखी एक टीप म्हणजे अशी संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्ट आलीय असं वाटत असेल तर तुमच्या व

भारतीय नौदलाच्या नव्या चिन्हाची प्रेरणा महाराजांच्या राजमुद्रेतून घेण्यात आली त्याचा आज सार्थ अभिमान प्रत्येक मराठी माणसाला वाटायला हवा.

Image
मराठा साम्राज्याचे जनक आणि भारतीय आरमाराचे जनक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी मानवंदना. मराठा आरामारची मुहूर्तमेड 1657 साली कोकण जिंकण्यासाठी जहाज निर्मिती करून केली. 24 ऑक्टोंबर 1657 दिवशी छत्रपती महाराजांनी कल्याण भिवंडी पासून ते कर्नाटक येथील बासुर पर्यत असा सागरी पाट्यावरील मोहीम हाती घेतली. त्यामुळेच 24 ऑक्टोबरला मराठा आरामार दिवस साजरा केला जातो. जलदुर्ग बांधताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी शत्रू च जाहजे बुडवण्यासाठी किनार पट्टीवर मोठी भिंत बांधली जायची. भिंतीचा वापर असा केला जायचा. त्यावेळी पोर्तुगीजांनी इंग्रजांची जाहजे मोठी असत. त्यामानाने मराठ्यांची जहाजे लहान होती.त्यामुळे त्याना आवरण सोपं जायचं परंतु मोठी जाहजे सरळ विजय दुर्गा च्या मोठ्या भीतीवर आपटे आणि मोडकळीस येत.त्यामुळे युद्ध जिकायला मराठयानी सोपं होई. त्यामुळे च मराठा आरामारात मोठया पेक्षा लहान जाहजे वापरली जायची. मादागास्करचा राजा मराठ्यांचा मंडलिक होता.  मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या या किनारपट्टीवर दहशती खूप मोठे होत्या.  त्यांच्या एका शब्दावरती  मांडलिक असण