फेक अकाउंट कसे ओळखावे आणि धोका कसा टाळावा?
फेक अकाउंट कसे ओळखावे
आणि धोका कसा टाळावा ?
ⓒ धनंजय देशपांडे
-
अनेक मित्रांनाही विशेषतः मैत्रिणींनी विचारलेला हा प्रश्न ! त्यांना त्यांना तसे पर्सनलवर सांगत होतोच पण विचार केला की त्यांना जे सांगितलं तेच सर्वाना सांगावे, म्हणून हे सार्वजनिक करतोय. खरेतर माझ्या वॉल वर याविषयी डिटेल मध्ये पोस्ट असतात ! त्या जरा वेळ काढून पहा !
असो
तर फेक अकाउंट कसे ओळखायचे ते थोडक्यात सांगतो,
१) फेक अकाउंटची शंका आली असेल तर त्याच्या वॉलवर पाहायच. जरा स्क्रोल करून पोस्ट पाहायच्या. आणि त्याच्यावर पडलेल्या कॉमेंटपण वाचायच्या. कुठंतरी एखाद्या पोस्ट वर रिप्लाय देताना वाक्यात तो / ती अडकतो अन जेंडर ओळखू येते. कारण माणूस सवयीचा गुलाम असतो. कितीही नाटक (फेक) केलं तरी आतलं जेंडर नकळत बाहेर येतेच जे त्याच्याही नकळत घडते.
आणि मग अशा व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट ला "हूड" म्हणायच. आणि तुमच्या अनावधानाने अशी व्यक्ती ऑलरेडी लिस्ट मध्ये असेल तर त्याला सरळ "ब्लॉक" चा नारळ द्यायचा आणि जमलं तर report spam करायच.
२) आणखी एक टीप म्हणजे अशी संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्ट आलीय असं वाटत असेल तर तुमच्या व त्याच्यात कॉमन फ्रेंड कोण आहेत पाहायचे आणि त्यां कॉमन फ्रेंड्सला पाहिजे तर कॉल वर किंवा मेसेंजर वर आधी विचारायचे की या ला ओळखतो का तू ?
त्याने हो सांगितलं तर मग ती रिक्वेस्ट घ्यावी. आणि "फार नाही ओळखत, जस्ट एफ बी फ्रेंड आहोत" असं म्हटलं (९०% लोक हेच उत्तर देतील पाहा) तर मग अशावेळी आलेल्या रिक्वेस्टला वेटिंग रूम मध्ये बसवून ठेवावं. म्हणजे नुसतंच वेटिंगवर ठेवावं. तो / ती तुमच्या वॉल वर कॉमेंट मध्ये येत असेल तर त्या कॉमेन्टवर बारीक लक्ष ठेवावं. त्यात कधीतरी तो वाक्याची जेंडर गडबड करतोच. तिथं मग तुम्हाला ओळखता येते.
आणि जर असं महिनाभर लक्ष ठेवून मग संशय काही वाटला नाही तर मग लिस्टीत जागा द्यावी.
३) शक्यतो फ्रेंडलिस्ट वाढवण्यापेक्षा तुम्ही अशांना "फॉलो" करा असं म्हणू शकता. त्यांनी फॉलो केले तर मेसेंजरच्या माध्यमातून होणारे संभाव्य धोके टळतात. कारण फॉलोअरचे मेसेज थेट तुम्हाला न येता, स्पॅम फोल्डर मध्ये जाऊन पडतात, त्यामुळे तुम्ही सुरक्षित असता. वाटल्यास कधीतरी वेळ काढून मग स्पॅम फोल्डर उघडून ते सगळे मेसेज चेक करायचे. आणि वरील बाकी टिप्स वापरून ते अस्सल आहेत की फेक हे ओळखून मग त्यांना त्यानुसार वागवावे.
४) फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर सर्वात प्रथम प्रोफाइल फोटो बारकाईने पहा. तिथं एखाद्या हिरो / हिरोईन किंवा अन्य पाने फुले असा फोटो असेल तर बहुतेक वेळा हे प्रोफाइल फेक असतात. तसेच त्याच्या वॉल वर फक्त प्रोफाइल फ़ोटोच्याच पोस्ट दिसत असतील आणि बाकी काही नसेल तर हमखास ते प्रोफाइल ९०% फेक असते.
५) रिक्वेस्ट पाठवणाऱ्याची जन्म तारीख जरूर पहा. कारण बहुसंख्य फेक आय डी अकाउंटवर 1/1/2011, 10/10 2019 अशा प्रकारची तारीख असते. तशी दिसली तर सरळ "ब्लॉक" करून मोकळे व्हा
६) about विभागात जरूर जा. जिथं प्राथमिक माहिती लिहिलेली असणे अपेक्षित असते. उदा. work, education, contact, city इत्यादी. जर त्या ठिकाणी सगळं ब्लँक असेल तर ९९% वेळा ते प्रोफाइल फेकच असते. सावध व्हा अशावेळी !!
७) कोणतेही अकाउंट खरे की खोटे हे पाहताना सर्वात प्रथम त्याचे नाव पाहावे. फेक वाल्याचे नाव जरा विचित्र असतात. उदा. Angel Priya., मर्द मावळा, स्वप्न परी, मीच माझा बॉस इत्यादी. अशा केसेस मध्ये ९०% अकाउंट हे फेक असतात.
८) ऍक्टिव्हिटी : अमुक एक अकाउंट खरे आहे की फेक हे ओळखण्यासाठी त्याच्या वॉल वर जावे. त्याने / तिने इतर कोणते पेज लाईक केले आहेत ? कोणते ग्रुप जॉईन केले आहेत का ? ते पाहावे. आणि असे कोणतेही इतर पेज / ग्रुप जॉईन केलेले नसतील तर ९९% ते अकाउंट फेकच असते. कारण त्यांना इतर कोणत्या अशा गोष्टीत इंटरेस्ट नसतो. तर लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी ते अकाउंट असते.
९) मोबाईल नंबर : ज्या अकाउंटच्या इन्फो मध्ये मोबाईल नंबर टाकलेला असतो त्यापैकी बहुसंख्य अकाउंट फेक असतात. (चार दोन अपवाद असतील) पण सहसा प्रायव्हसी जपण्यासाठी म्हणून कोणीही सज्जन व्यक्ती आपला मोबाईल नंबर असा जाहीर करत नाही. फेक वाले मुद्दाम मोबाईल नंबर टाकतात जेणेकरून लोकांनी त्यांना थेट कॉल करावा आणि मग पुढे ते लोक बरोबर तुम्हाला घोळात घेऊन आर्थिक / शारीरिक फसवणूक करतात.
-
ढोबळ मानाने हे काही अंदाज मी दिलेलं आहेत ! असे अजून बरेच आहेत. पण सामान्यरित्या लोकांनी किमान इतकं जरी पाळलं तरी संभाव्य धोक्यापासून ते वाचू शकतात !
छान राहा, सुरक्षित राहा, बाकी काही अडलं नडलं तर मी आहेच !!
*
@ dd
(ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन अवॉर्ड विनर)
-
Comments
Post a Comment