पितृपक्ष🌸🍱🦅

🌸पितृपक्ष🌸

🍱🦅
वडीलांचं रूप घेऊन
कावळा घरी आला
ताटातील मेनू पाहून
बोलाव वाटलं त्याला
🍱🦅
बरं नव्हतं तेव्हा कधीच
आणली नाहीस गोळी, 
आज कशाला वाढतोस रे
ताटात पुरणाची पोळी! 
🍱🦅
विनाकारण भांडण होता
 दिसले खरे रूप, 
कशाला वाढतो मला
आता गावरान तूप! 
🍱🦅
चटणी वर तेलासाठी
 होत नव्हता राजी, 
कशाला वाढतो पात्रावर
वडे आणि भजी!! 
🍱🦅
प्रेम नाही,जिव्हाळा नव्हता
नाही दिलीस साथ,
आज कशाला वाढतो रे
पात्रावर वरण भात!!
🍱🦅
जबरदस्ती अंगठा घेऊन
केली घराची वाटणी,
कशाला वाढतो पात्रावर
आज लोणचं चटणी!! 
🍱🦅
हिस्सा वाटणीसाठी केली
 बहिणी संगे दूरी,
आता काय उपयोग वाढून
पात्रावरती पुरी!! 
🍱🦅
आयुष्याभर ठेवली रे
माझ्या बद्दल अढी, 
आता कोण पिणार ती
द्रोणामधली कढी!! 
🍱🦅
वेगळा राह्यलो तेव्हा नाही
दिलास मला धिर, 
आज कशाला वाढतो तू
पात्रावरती खिर!! 
🍱🦅
सणासुदीला आणलं नाही
मला नवं कापड, 
आता कशाला वाढतोय
कुरडई अन् पापड़!! 
🍱🦅
आजारी असताना तू
धुतली ना सतरंजी, 
आता कशाला वाढतो रे
पात्रावर करंजी!! 
🍱🦅
जिवंत असतांना पोरा
दिले असतेस लक्ष, 
तृप्त झाले असते पुर्वज
नसता  पितृपक्ष!! 
🍱🦅
पितरांचा मिळून तयार
होतो  पितृपक्ष, 
बऱ्याच घरात आज मात्र
झाला विरोधी पक्ष!! 
🍱🦅
सांगतोय तू रहा सदैव
जेष्ठांप्रती दक्ष, 
करावं तसं भरावं लागेल
इतिहास देईल साक्ष!!     जिवंतपणीच आई व वडील /  बापास दिल लावा मेल्यावर लोकांना खाऊ घालन्यात काय मजा
🍱🦅
🌸🌸 *मातृपितृ देवोभव्* 🌸🌸🙏🙏

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४