आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१२ सप्टेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ सप्टेंबर १३९८*
मोगल आक्रमक तैमूरलंगाने ९३,००० मुस्लिम सैन्यानिशी सिंधू नदी पार केली आणि तो निघाला लाहोरच्या दिशेने. हीच सुरुवात होती तैमूरलंगाच्या दिल्लीवरील आक्रमणाची.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ सप्टेंबर १६६२*
छत्रपती शिवरायांनी मोरेपंतांना पेशवेपदी नेमले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ सप्टेंबर १६६६*
"अखेर सह्याद्रीचा वाघ औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दाखल झाला.
आग्र्याहून सुटका झाल्यावर छत्रपती शिवरायांचे आज गुंजन मावळ मधील राजधानी "किल्ले राजगड" वर आगमन झाले.
प्रमुख सहकारी "निराजी रावजी" तसेच इतर सवंगड्यांसमवेत संन्यासी च्या वेशात हे सर्व जण राजगडी पोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ सप्टेंबर १६८६*
विजापूर अखेर मुघलांनी जिंकले. सहा महिन्याच्या अथक परिश्रमा नंतर विजापूर राज्याचा पाडाव झाला आणि अजून एक दक्षिणेतली शाही मुघलांनी गिळंकृत केली. शेवटचा सुलतान सिकंदरशाह आदिलशाह याने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आणि रसूलपूर येथील औरंगजेबाच्या छावणीत जाण्यास तो विजापूरच्या रस्त्यातून निघाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ सप्टेंबर १६८९*
छत्रपती राजाराम महाराजांनी नागोजीराव पाटणकर, चंदाजीराव पाटणकर यांस (स्वराज्याचे सरदार - पिता - पुत्र) पत्र पाठवले...
हे मऱ्हाठे राज्य. तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता न करिता मऱ्हाठे धर्माची दुरे धरून स्वामीकार्य करावे.
संदर्भ - ताराबाई कालीन कागतपत्रे - खंड १, शिवचरित्र साहित्य - खंड १०

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ सप्टेंबर १७००*
सन१७०० च्या एप्रिल महिन्यात सातारा किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेब मिरजेकडे येण्यास निघाला. तो भूषणगड, कलेढोण, झरे, आटपाडी मार्गे १२सप्टेंबर रोजी खवासपूरला पोहचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ सप्टेंबर १७९१*
सन १७९० च्या आरंभीं डी बॉइनेच्या हाताखाली सात सातशें शिपायांची एक पलटण अशा आठ पलटणींचें एक ब्रिगेड होतें. त्यांत महादजीनें हळू हळू भर घालून शेवटीं त्या तीन ब्रिगेड केल्या. त्याचा तोफखानाहि वाढतां वाढतां शेवटीं एकंदर दोनशेंवर तोफा झाल्या होत्या. यांतील ६० तोफा सँग्स्टरनें आपल्या कारखान्यांतच ओंतून तयार केल्या होत्या. डी बॉइनेच्या प्रत्येक पलटणीबरोबर सहा पौंड वजनाचा गोळा फेंकणार्‍या दोन, तीन पौंड वजनाचा गोळा फेंकणार्‍या दोन व एक हॉविट्झर एवढा सरंजाम असून प्रत्येक ब्रिगेडला ५०० घोडस्वारांचें एक एक पथक जोडलेलें होतें. डी बॉइनेचा पगार शेवटी दरमहा १०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यांत आला होता. याशिवाय त्याच्या पायदळाच्या व तोफखान्याच्या खर्चाकरितां कांहीं जमिनी लावून दिल्या असून त्यांच्या ऐन वसुलावर शेंकडा दोन टक्के नफा घेण्याची परवानगी देण्यांत आली होती. खड्या सैन्याशिवाय डी बॉइनेजवळ कांही निवडक हंगामी पायदळहि असें. यांतील शिपायांजवळ तोड्याच्या बंदुका असत; पण डी बॉइनेनें त्यांनां संगीनी लावण्याची युक्ति काढून या पायदळाची उपयुक्तता बरींच वाढविली होती. इस्मायलबेगशीं झालेल्या पाटणच्या लढाईंत (२० जून १७९०) महादजी शिंद्याचा जो विजय झाला तो मुख्यत: डी बॉइनच्या पलटणीमुळेंच (१२ सप्टेंबर १७९१). डी बॉईननें जोधपूरच्या राज्यांत मेरट येथें रजपुतांच्या लष्करावर अचानक छापा घालून जोधपूरकराचा पराभव केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ सप्टेंबर १८१६*
एल्फिन्स्टन ने शास्त्रीबुवांचा खून करण्यात बाजीरावचा विश्वासू त्रिबंकजी डेंगळे चा हत असल्याचा आरोप करून त्यास आपल्या ताब्यात देण्याचा बाजीरावच्या मागे लकडा लावला. त्रिबंकजी निर्दोष असल्याची खात्री असूनही इंग्रजांच्या लष्करी दडपणाखाली बाजीरावाने त्रिबंकजीस इंग्रजांच्या स्वाधीन केले. १९ सप्टेंबर १८१५ ला इंग्रजांनी त्याला कडक पहाऱ्यात ठाण्याच्या तुरुंगात रवाना केले. त्रिंबकजी १२ सप्टेंबर १८१६ च्या रात्री मुसळधार पाऊस, वादळात मजुराच्या वेशात किल्ल्याबाहेर पडला व मराठा प्रदेशात येताच आपल्या सहकाऱ्यांसह संगमनेरच्या दिशेने निघून गेला.पेशव्याच्या मदतीने त्याने शिंगणापूर, पंढरपूर, नातेपुते भागातून लष्कर उभारावायास सुरुवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ सप्टेंबर १९४८*
भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन ’पोलिस अ‍ॅक्शन’ असे केले जाते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४