श्री मोरया गोसावी समाधी मंदिर शिलालेख ●
● श्री मोरया गोसावी समाधी मंदिर शिलालेख ●
शके १५८० विळंब संवत्सरे
कार्तिक श्रुध १२ ते दिवसि
देवाळयास आरंभ वि
कारि संवत्सरे आषाढ श्रुध
४ सोमवारि संपुर्ण
शके १५८० विलंबी संवत्सर कार्तिक शुद्ध १२ म्हणजे २७ नोव्हेंबर १६५८ वार बुधवार या दिवशी देवालयाच्या बांधकामास आरंभ आणि (शके १५८१) विकारी संवत्सर आषाढ शुद्ध ४ सोमवार म्हणजे १३ जून १६५९ या दिवशी देवालयाचे बांधकाम संपूर्ण.
श्री क्षेत्र चिंचवड येथे पवनेच्या काठी श्री मोरया गोसावी यांची संजीवन समाधी आहे. समाधीवर श्रीगणपतीची मूर्ती स्थापन करून हे देवालय बांधले तेव्हा तेथे हा शिलालेख देवनागरीत कोरलेला आहे. समाधीसमोर तोंड करून उभे राहिले असता गाभाऱ्याच्या बाहेरील दगडी मंडपात उजव्या बाजूस एक मोठे शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर म्हणजेच गाभाऱ्याच्या उजव्या भिंतीत या लेखाची सुमारे दोन फूट लांबी रुंदीची शिला मध्यावर बसविलेली आहे. शिलालेख पाच ओळींचा आहे. हा शिलालेख सुस्थितीत आहे.
या शिलालेखामुळे श्री मोरया गोसावींचे हे संजीवन समाधी मंदिर २७ नोव्हेंबर १६५८ ते १३ जून १६५९ या काळात बांधलेले आहे हे समजते.
संकलन :- सिध्देश दादासो पवार
@gad_durgancha_dharkari_007
#गड_दुर्गांचा_धारकरी_००७
#maharashtra #महार
Comments
Post a Comment