महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी अशा मानाच्या बैलगाडा स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळणारा काटे-पाटलांचा ‘बनश्या’ गुरुवारी देवाघरी गेला. प्राणीमात्रांवर दया करा…प्रेम करा ’’ असा केवळ संदेश दिलाच पण , प्रत्यक्ष आयुष्य जगणारी पिपळे सौदागर अश्या काटे-पाटलांसारखी अनेक कुटुंब आहेत.
पिपळे सौदागर ची शान बनश्या गुरुवारी काळाच्या पडद्या आड गेला.नगर, पुणे जिल्ह्यात शेकडो बैलगाडा अनेक शर्यती गजवलेल्या काटे पाटील याच्या बनश्याने पिपंरी चिंचवड उदयोग नागरी च नाव दूरवर नेले.पिपंरी चिंचवड शहराने अतिशय खेडे गावे ते आधुनिक शहर असा प्रवास पिपळे सौदागरचा अलीकडच्या 27वर्षात बनश्या बैलाने पहिला होता.
महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी अशा मानाच्या बैलगाडा स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळणारा काटे-पाटलांचा ‘बनश्या’ गुरुवारी देवाघरी गेला. आणि वाऱ्या सारखी बातमी पिपंरी चिंचवड तसेच संपूर्ण जिल्हात पसरली आहे.
गोठ्यातला बैलांशी जिव्हाळा निर्माण करणारी आपली भारतीय संस्कृती आहे.महाराष्ट्रात पोटच्या मुलांसारखं बैल जपणारी लोक अखंड महाराष्ट्रात आज हीं जुन्या पिढीतील आहेत. जनु हीच शिकवण आलेली तरुण पुढी शहरातील दिमाखता पुढे घेउं जात आहे.तळहातावरील फोडाप्रमाणे बैलांचं संगोपण होत असायच. हया बनाश्याच.
‘बनश्या’ला अखेरचा निरोप देताना काटे- पाटील कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू पाहिल्यानंतर गहिवरुन आले होते. त्याचे व्हिडीओ सोशल मीडिया वर हजारो लोकांनी पहिले आहेत.
‘‘प्राणीमात्रांवर दया करा…प्रेम करा ’’ असा केवळ संदेश दिलाच पण , प्रत्यक्ष आयुष्य जगणारी खेडे गाव ते आधुनिकरनाकडे वाटचाल मध्ये उच्चभू सोसायट्या असणारे पिपळे सौदागर मध्ये काटे-पाटलांसारखी अनेक कुटुंब आहेत.महाराष्ट्रात असतील किंबहुना अशीच अनेक विडिओ सोशल मीडिया वर आपण पाहत असतो.
बनश्याच्या अंत्यविधीनंतर या कुटुंबाने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बनश्या बैलाचा समाधी पुतळा बसवला आहे. आणि मोठी समाधी बांधली आहे.
हीच आपल्या मातीची श्रीमंती आहे. लाडक्या बनश्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
शेती- माती आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध असणारा महाराष्ट्र . !
लेखन :-नितीन घाडगे
Comments
Post a Comment