*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*६ सप्टेंबर १६७५*छत्रपती शिवाजी महाराज

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ सप्टेंबर १६७५*
छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" किल्ले रायगडवर हजर.
राज्याभिषेक समारंभ आटोपताच डिसेंबर १६७४ मध्ये औरंगाबाद परिसरात आले आणि मुघली मुलखात लूट करण्याबरोबरच त्यांनी इंग्रजांच्या डूमगावच्या वखारीवर हल्ला केला आणि ती लुटून १० हजारांची लूट मिळवली. मुघल आणि आदिलशाही मुलखातील आपल्या वखारी सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्याने इंग्रजानी सॅम्युअल ऑस्टिन याला आपल्या वखारीना कौल मागण्यासाठी शिवाजी महाराजांच्याकडे पाठवायचे ठरवले. याप्रमाणे महाराजांसाठी ५०० रुपयांचा नजराणा घेऊन ऑस्टिन आपला सहकारी रॉबर्ट हार्बीनसह रायगडाकडे निघाला. या भेटीत त्याने महाराजाना भेट देण्यासाठी लहान पितळी तोफ, मोरोपांत व आण्णाजीपंत यांच्यासाठी स्कारलेट कापड, १ आरसा, १ तोळा कस्तुरी, चिटणीस व सेनापती ना देण्यासाठी ३ यार्ड कापड व इतर भेटवस्तू सोबत घेतल्या. ऑस्टिन २ सप्टेंबरला निजामपूर येथे पोहोचला. तिथे त्याची भेट मोरोपंत व अण्णाजीपंतांशी झाली. पण ते पुढे जुन्नरला जाणार असल्याने त्यांच्याकडून महाराजांसाठी पत्रे घेऊन ऑस्टिन रायगडावर गेला. इंग्रज वकील सॅम्युअल ऑस्टिन शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी रायगडावर आला ती तारीख होती ६ सप्टेंबर १६७५

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ सप्टेंबर १६७९*
६ सप्टेंबर १६७९ च्या दरम्यान मराठ्यांचे ४०० बांधकामाचे कामगार खांदेरी बेटावर आले. बेटावर चढण्यासाठी जागा होत्या त्या सर्व बंद करून घेण्यासाठी १ यार्ड उंचीची तटबंदी मराठ्यांनी सुमारे ४७० मजूर लावून व अहोरात्र काम करून बांधून घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ सप्टेंबर १६८२*
छत्रपती संभाजीराजे "संगमनेर" मध्ये दाखल.
यावेळेस संगमनेरचा मुघल सरदार होता "नारोजी".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ सप्टेंबर १७५७*
रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर हे उत्तरेत होते. १७५७ ला रघुनाथराव पेशवे यास नजीबखान रोहिला सरदार हा जिवंत सापडला. "त्यास गर्दन मारावी, जिवंत राहिल्यास नाश करील" अशी सूचना पुष्कळांनी रघुनाथराव पेशव्यांना केली. नाहीतरी नजीबखान हा उत्तरेत मराठयांना मोठा अडथळाच होता.
नजीबखानान आपल्या वकील अंतस्थपणे मल्हारराव यांच्याकडे पाठवून कळविले, "मी तुमचा धर्मपुत्र आहे.
त्यावरून मल्हाररावांनी दादासाहेबांना भीड घातली की
याचा आपणास पुढे आपल्याकामी उपयोग होईल, यास अपाय करू नये. मल्हाररावांच्या मुळे दादासाहेबांनी ही विनंती मान्य केली. म्हणून नजीबखानाचा पक्का बंदोबस्त करता आला नाही.
नजीबखाननं रघुनाथरावांस नाइलाजास्तव लेखी लिहून दिली, की राजधानीतील सर्वाधिकार सोडतो आणि अंतर्वेदीतील ठाणी सोडून स्वस्थळी निघून जातो, पुनः दिल्लीच्या भानगडीत पडणार नाही. हा करार करून नजीबखान ता.६ सप्टेंबर रोजी दिल्ली सोडून गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ सप्टेंबर १९६५*
पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ’ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली. या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४