आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१६ सप्टेंबर १६६८

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ सप्टेंबर १६६८*
१६ सप्टेंबर १६६८ अदिलशहाने सोलापूर किल्ला व त्या खालील १८० लक्ष होनांचा मुलुख मोगलांना देऊन त्यांच्याशी तह केला. लवकरच विजापुरकरांनी महाराजांशी ही पुन्हा नव्याने तह केला. पश्चिम किनाऱ्याची सुभेदारी महाराजांना प्राप्त झाली. मोबदल्यात त्यांनी ६ सहा लक्ष रुपये खंडणी अदिलशहास द्यावी असे ठरले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


*१६ सप्टेंबर १६८१*
औरंगजेबचा बंडखोर मुलगा अकबर आपल्या दुर्गादास नावाच्या सल्लागाराला घेऊन संभाजी राजांकडे  जून १६८१ मध्ये सुधागड पाली येथे आश्रयासाठी आला. संभाजी राजांनी अकबरच्या खिदमती साठी अण्णाजी दत्तो, बालाजी आवजी व हिरोजी फर्जंद ह्या ज्येष्ठ सहकार्यांना ठेवले होते. याचा गैरफायदा घेऊन ह्या मंडळींनी अकबरच्या मदतीने संभाजी राजांना पदच्युत करून पुन्हा राजाराम महाराजांना नियुक्त करण्याचा कट रचला. पण दुर्गादास ने अकबरला संभाजी राजे ह्या मंडळीन मार्फत आपली परीक्षा पाहत असावे, असे सांगितले व कटाची संपूर्ण बातमी त्यांनी संभाजी राजांना दिली.
एकदा माफ करून पण कटातील सूत्रधार सुधारले नसल्याचे ध्यानात आल्याने संभाजी राजांनी १६ सप्टेंबर १६८१ रोजी बाळाजी आवजी, त्यांचा भाऊ शामजी आवजी, मुलगा आवजी बल्लाळ, अण्णाजी दत्तो, त्यांचा भाऊ सोमाजी दत्तो आणि हिरोजी फर्जंद ह्यांना चाबकाने फोडून व हत्तीच्या पायांखाली तुडवून देहांत प्रायश्चित दिले. हि दूर  घटना रायगड जिल्ह्यातील खोपोली-पाली रस्त्यावर परळी गावाजवळ घडली!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ सप्टेंबर १६८१*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कर्नाटक प्रांताचा सुभेदार असणाऱ्या रघुनाथ नारायण हणमंते यांना संभाजीराजेच्या विरोधातील कटात हात असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. कर्नाटक प्रांतासारख्या विस्तीर्ण आणि दूरच्या प्रदेशावर विश्वासू माणूस असणे आवश्यक होते. दूरदर्शी संभाजीराजेंनी या प्रदेशावर आपले मेव्हणे हरजीराजे महाडिक यांची नेमणूक केली. राजेंच्या आज्ञेवरून हरजीराजे, श्यामजी नाईक पुंडे, जैताजी काटकर व दादाजी काकडे हे सरदार मार्च १६८१ ला कर्नाटकात रवाना झाले. स्वराज्यवारील मुघलांच्याबरोबच सिद्दी, इंग्रज व पोर्तुगीजांच्या विरोधातील संभाव्य लढ्याला तोंड देत त्यांना रोखण्यासाठी शंभुराजेंना महाराष्ट्रात राहणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी "हरजीराजेना कर्नाटक प्रांताचे सर्वाधीकार आणि कर्नाटकातील सर्व गड किल्ल्यांचा अधिकार सोपविला होता. याबरोबरच राजांनी तेथील सर्व सुभेदार व इतर अधिकाऱ्यांना हरजीराजेच्या आज्ञेत राहण्याची सूचना केली होती. "पोर्टो नोव्होचे हवालदार गोपाळ दादाजी यांनी इंग्रजांच्या सेंट जॉर्जच्या वखारीला पाठवलेल्या या पत्राची तारीख होती १६ सप्टेंबर १६८१.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ सप्टेंबर १६८२*
आपल्या बापविरोधात बंड करून दक्षिणेत संभाजीराजेच्या आश्रयाला आलेला मुघल राजपुत्र शहजादा अकबराने पाली येथे शंभुराजेंची भेट घेतली. या भेटीत राजेंनी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ऑगस्ट १६८२ मध्ये या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. या भेटीत शंभुराजेंनी अकबराला आपल्या मुलखातुन समुद्रमार्गे राठोडांच्या मुलखात पाठवायचे ठरवले. ही बातमी औरंगजेबाला कळताच त्याने त्या मार्गातील आपल्या सुभेदारांना हुकूम पाठवला की अकबर दिसताच त्याची वाट अडवावी व त्याला कैद करावे. शंभुराजेंच्या बरोबर झालेल्या या भेटीनंतर शहजादा अकबर तिकोना येथे थांबला. पण उत्तरेत मुघली ऐशोआरामात राहणाऱ्या अकबराला तेथील हवा मानवली नाही. त्यामुळे त्याला जैतापूर येथे ठेवण्यात आले. तेथील हवाही अकबराला मानवली नाही. अकबरासोबत आलेले त्याचे नातेवाईकही आजरी पडले. शहजादा अकबराच्या अवस्थेचे वर्णन असलेली मुघल दरबारच्या आखबारातील या नोंदीची तारीख होती १६ सप्टेंबर १६८२.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ सप्टेंबर १७२७*
निजामाने दक्षिणेतील स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून स्वराज्यात  बंडाळ्या उभ्या करण्याचा खेळ आरंभला. निजामाने थेट पुण्यावर चाल केली. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी दिनांक १६ सप्टेंबर  सन १७२७ रोजी निजामा विरूध्द मोहीम सुरू केली. निजाम पुण्यावर आहे पाहून बाजीराव निजामाची राजधानी हैदराबादेवरच चालून निघाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ सप्टेंबर १९६५*
लेफ्टनंट कर्नल तारापोर शहिद दिन
( जन्म - १८ ऑगस्ट १९२३)
पाकच्या सरहद्दीत घुसून  पाकच्याच भूमीवर भारतीय लष्कराने केलेला रणगाड्यांचा हा रणसंग्राम, "बॅटल ऑफ चविन्डा" म्हणून इतिहासात नोंदला गेला. लेफ्ट. कर्नल तारापोर स्वतः जखमी झाले असतानाही  त्यांनी आपला मोर्चा वझीरअली या गावाच्या दिशेला वळवला. तिथे त्यांना शत्रूशी निकराची झुंज द्यावी लागली. अंततः शत्रूसैन्याची तिथूनही पीछेहाट होऊ लागली तेव्हढ्यात  शत्रूचा एक तोफगोळा  लेफ्ट. कर्नल तारापोर यांच्या रणगाड्याच्या नेमका आतच येऊन पडला आणि बघताबघता अक्ख्या रणगाड्याने पेट घेतला. ते दृश्य बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच लेफ्ट. कर्नल तारापोर यांचा आत्मा त्या अग्निशिखांवर आरूढ होऊन अनंतात विलीन झाला ! तो दिवस होता, १६ सप्टेंबर १९६५. लेफ्ट. कर्नल तारापोर यांच्या पार्थिवावर, त्यांच्याच इच्छेनुसार, त्याच जागी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सातच दिवसांनी  संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार शस्त्रसंधी झाली आणि युद्ध थांबले.
१९६६ च्या प्रजासत्ताकदिनी त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देण्याचे जाहीर झाले आणि  त्याच वर्षी महामहीम राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते ते तारापोर यांच्या एक्केचाळीस वर्षांच्या पत्नी पेरीन यांच्याकडे  सन्मानपूर्वक सुपूर्द  करण्यात आले त्यावेळी तारापोर यांची सोळा वर्षांची कन्या झरीन आणि  बारा वर्षांचा पुत्र झेर्सेस  हे दोघेही उपस्थित होते. आपल्या पुत्राने भारतीय सेनेतच दाखल व्हावे अशी  इच्छा  लेफ्ट. कर्नल तारापोर यांनी  युध्दभूमीवर लढत असताना आपल्या सहकाऱ्यांजवळ व्यक्त केली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४