भारतीय नौदलाच्या नव्या चिन्हाची प्रेरणा महाराजांच्या राजमुद्रेतून घेण्यात आली त्याचा आज सार्थ अभिमान प्रत्येक मराठी माणसाला वाटायला हवा.

मराठा साम्राज्याचे जनक आणि भारतीय आरमाराचे जनक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी मानवंदना.
मराठा आरामारची मुहूर्तमेड 1657 साली कोकण जिंकण्यासाठी जहाज निर्मिती करून केली.
24 ऑक्टोंबर 1657 दिवशी छत्रपती महाराजांनी कल्याण भिवंडी पासून ते कर्नाटक येथील बासुर पर्यत असा सागरी पाट्यावरील मोहीम हाती घेतली.
त्यामुळेच 24 ऑक्टोबरला मराठा आरामार दिवस साजरा केला जातो.
जलदुर्ग बांधताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी शत्रू च जाहजे बुडवण्यासाठी किनार पट्टीवर मोठी भिंत बांधली जायची. भिंतीचा वापर असा केला जायचा. त्यावेळी पोर्तुगीजांनी इंग्रजांची जाहजे मोठी असत. त्यामानाने मराठ्यांची जहाजे लहान होती.त्यामुळे त्याना आवरण सोपं जायचं परंतु मोठी जाहजे सरळ विजय दुर्गा च्या मोठ्या भीतीवर आपटे आणि मोडकळीस येत.त्यामुळे युद्ध जिकायला मराठयानी सोपं होई.

त्यामुळे च मराठा आरामारात मोठया पेक्षा लहान जाहजे वापरली जायची.

मादागास्करचा राजा मराठ्यांचा मंडलिक होता.

 मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या या किनारपट्टीवर दहशती खूप मोठे होत्या.  त्यांच्या एका शब्दावरती  मांडलिक असणारे राजे  आपल्या जहाजाचे तुकडी  मराठ्यांना वापरायला देत असत.

 सरखेल कानोजी आंग्रे यांनी त्यांच्या काराकिर्दीमध्ये  समुद्रातील तेरा किल्ले. 27 जमिनीवरचे किल्ले. आणि त्यातला 36 लाखाचा मुलुख मराठा साम्राज्याला जोडून दिला जिंकून दिला. मुळे आग्रहांच्या समुद्रातील पराक्रमामुळे जगभरातील नामांकित त्या काळातील  खलाशी सरखेल कानोजांग्रे यांच्या आश्रयाला येत.

 किनारपट्टीच्या रक्षणासाठी थेट मराठ्यांनी किल्ल्यांची साखळीच बांधली होती.
किनारपट्टीच्या रक्षणासाठी थेट मराठ्यांनी किल्ल्यांची साखळीच बांधली होती. सरासरी 20 किलोमीटरच्या अंतरावर एक किल्ला असेच.
 एक किल्ल्याच्या टप्प्यातून दुसऱ्या किल्ल्याच्या टप्प्यात जहाज गेल्यानंतर लक्ष ठेवण्यास सोपं जायचं. परिणामी धोका झाल्यास लगेच अटॅक करणे सोपं जात होतं.
 मराठ्यांनी थेट  अंदमान बेटावरती  नागरिक स्थळ बनवला होता.

 खांदेरीच्या युद्धामध्ये मराठ्यांनी इंग्रजांचा एक  जहाज ताब्यात घेतलं होतं.
 सरखेल कान्होजी आंग्रे यांना रोखण्यासाठी  ब्रिटिश सरकार दरवर्षी 50 हजारात पौड खर्च करत होते.
 जोपर्यंत अरबी समुद्रामध्ये मराठा आरमार होतं तोपर्यंत इंग्रजांना  पश्चिम किनारपट्टी कधीच जिंकता आलेली नाही. हा इतिहास आहे.
 परंतु दुर्दैवाने मराठा साम्राज्याची आरमाराचा शेवट झाला तेव्हा तेव्हा मात्र इंग्रजांच्या ताब्यात पश्चिम किनारपट्टी गेली. आणि भारत पारतंत्र्यात बुडाला.

 भारतीय नौदलाच्या नव्या चिन्हाची प्रेरणा महाराजांच्या राजमुद्रेतून घेण्यात आली त्याचा आज सार्थ अभिमान वाटतो.

तमाम भारतीय आणि मराठी जनांच्या अभिमानाचा क्षण आहे.


नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४