आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ सप्टेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ सप्टेंबर १६७८*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
कर्नाटक, तमिळनाडू येथे दीर्घकाळ चाललेली दक्षिण दिग्विजय मोहीम आटोपून परतीच्या प्रवासात छत्रपती शिवराय "नागापट्टण" येथे मुक्कामी.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ सप्टेंबर १७६१*
पानिपतच्या पराजयामुळे मराठ्यांच्या राज्यात चोहोकडे दंगेखोर संस्थानिक प्रबळ होऊन बखेडे करू लागले. त्यांत इंग्रजांनीही आपला भाग उचलला. सन १७६१ मध्ये निजामअल्ली पुण्यावर चालून येत आहे असे पाहून रघुनाथरावाने मुंबईकरांकडून दारूगोळा व सैनिक कुमक मागितली. मुंबईकर इंग्रजांनी ही चालून आलेली संधी न दवडता १४ सप्टेंबर १७६१ रोजी मराठ्यांशी एक व्यापारी करार केला. त्यात सहा कलमे असून व्यापाऱ्यास व जहाजास मराठ्यांच्या मुलखात त्रास होता कामा नये; जे मराठे अधिकारी इंग्रजी व्यापाऱ्यास त्रास देतील त्यांना शिक्षा व्हावी; मराठ्यांकडे जे युरोपियन सैनिक असतील त्यास त्यांनी इंग्रजांच्या स्वाधीन करावे; मराठे सैनिक फितूर होऊन इंग्रजांच्या आश्रयास गेले असतील त्यांना इंग्रजांनी मराठ्यांच्या स्वाधीन करावे; रामजीपंताने सिद्दीचा घेतलेला मुलुख त्यास परत करावा; एकमेकांच्या ताब्यात असलेले
कैदी ज्याचे त्यास परत करावे; उंदेरीचा किल्ला इंग्रजांचे स्वाधीन करावा. ह्या कराराने इंग्रजाने मराठ्यांकडून खूप सवलती मिळविल्या. मात्र सैनिकी मदत केली नाही. हा करार झाल्यावर माधवराव पेशव्यांनी इंग्रजांकडे अति त्वरने मदत मागितली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ सप्टेंबर १७९७*
होळकर घराण्यातील एक थोर शूर पुरुष यशवंतराव हे महादजी शिंदे यांच्या खालोखाल मराठे सरदारांतील एक कर्तबगार वीरपुरुष होते. यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते. त्यांना विठोजीराव हे सख्खे, तर काशीराव व मल्हारराव हे सावत्रभाऊ होते. तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला. शिंदे यांच्याकडून दुसरे मल्हारराव यशवंतराव होळकर भांबुर्ड्याच्या लढाईत मारले गेल्यानंतर यशवंतराव व विठोजीराव उत्तरेकडे निघुन गेले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ सप्टेंबर १८५८*
इंग्रज शीख आणि पठाणांच्या मदतीने दिल्लीत घुसले
मे महिन्यात १८५७ चा उठाव सुरू झाला. मेरठ वरून ३०० सैनिक दिल्लीत आले आणि दिसतील त्या ख्रिश्चनांना मारायला, कापायला सुरवात केली. या बंडखोर सैनिकांनी मुघल बादशाह बहादूरशाह जफर याला आपला नेता बनवला. अगदी सुरवातीपासूनच हा उठाव यशस्वी होऊ शकत नाही हे माहीत असून सुद्धा बहादूरशाह जफरने ब्रिटिशांच्या त्रासाला कंटाळून उठावाचे नेतृत्व स्वीकारले. मुघलांची राजधानी असलेल्या दिल्लीचे पुन्हा एकदा रणांगणात रूपांतर झाले. उपस्थित असलेल्या ३०० बंडखोर सैनिकांच्या मदतीला इतर कोणत्याही देशाचे, राज्याचे सैन्य नव्हते. म्हणावा तसा पैसा नव्हता, दारुगोळा नव्हता. पुढे काही दिवसातच दिल्लीत उपासमार सुरू झाली. असे खचलेले सैन्य ब्रिटिशांच्या बलाढ्य सैन्यापुढे किती दिवस टिकेल? १४ सप्टेंबर १८५८ रोजी ब्रिटिश सैन्य शीख आणि पठाणांच्या मदतीने दिल्लीत घुसले. लूटमार सुरू झाली. कापाकापी सुरू झाली. दिल्लीच्या एका मोहल्यामधेच १४०० नागरिकांचे प्राण गेले.

एडवर्ड व्हायबर्ट नावाचा १९ वर्षाचा ब्रिटिश अधिकारी तिथे उपस्थित होता. हो ह्या हत्याकांडाचं वर्णन करतो की,
>"it was literally murder... I have seen many bloody and awful sights lately but such a one as witnessed yesterday, I pray I never see again."
म्हणजेच, हे अक्षरशः खून होते... मी हल्ली बरीच रक्तरंजित आणि भयानक दृश्ये पाहिली आहेत पण काल जे मी पाहिले आहे ते मला पुन्हा कधीच पहायला मिळू नये अशी मी प्रार्थना करतो.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ सप्टेंबर १९४८*
दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४