श्री क्षेत्र खरसूंडी प्राचीन इतिहास आणि कुळदेव सिद्धनाथ मंदिर

महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र आणि अजून भारत भर असणाऱ्या भविकांचे कुलदेव व श्रद्धा ठिकाण असणारे भक्त सिद्धनाथ देवाचं आहेत.
माणदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे खरसुंडीचा सिद्धनाथ. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिध्दाचे सुमारे ११२५ वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे.

आज आपण याच खरसूंडीचा राजा सिद्धनाथ याची माहिती पाहू.
आजच्या भक्ती मय प्रवासाला सुरवात करूया.
खरसूंडी हे सिद्धनाथ देवाचे शेवटचे ठाणे आहे.

पूर्वीच्या काळी भारत वर्षा मध्ये प्रचडासुरु नावाचा राजा होऊन गेला.त्याने हाहाकार माजवला होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी.काळभैरव देव निघाले होते.घनघोर युद्धात प्रचंडासुरु व त्याच्या मुलाचा म्हजे सुवर्ण सुराचा वध केला.पुढे त्यानी दक्षिण भारतात जाऊन अनेका वटणीवर आणले.आणि पुढे ते मान देशातील म्हसवड येथे आले.त्याचा मोठा भक्त नयाबा नावाचा भक्त दूरहुन म्हसवड येथे येऊन  पूजा करत होता.

त्याच्यावर प्रसन्न होऊन नयाबा ला सप्नात दृष्टांत  दिला.च्या एक देशी गायी कधीच वेली नव्हती. तिला अचानक कसेतून खरवजाच्या धरा वाहू लागल्या आणि थरावर थर साठून दोन शिव पिंडी तयार झाल्या.त्या वरूनच या क्षेत्रास खरवस पीडी असे लोक ओळखू लागले. पुढे आपभ्रश होऊन खरंसुडी म्हूणन नाव उदयास आले.


मंदिराची रचना हेमाडपंथी


श्री सिध्दनाथांचे मंदीर दक्षिणाभिमुख, पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे याठिकाणी पहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपावर पूर्वीचे पत्र्याचे छत आहे.









खारसुड सिद्धाची आख्यायिका

औंध संस्थानाचे अधिपती बाळासाहेब महाराज यांच्या सूचनेवरून प्रसिध्द कारखानदार किर्लोस्कर यांनी हा मंडप बांधला आहे. गाभार्‍यात पन्नास किलो चांदीने मढवलेल्या मखरामध्ये श्री सिध्दनाथ व बाळाईदेवीची मूर्ती आहे. शंकराच्या देवालयात नंदी असतो असा प्रघात आहे. परंतु या देवापुढे ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून ‘खारसुड सिद्ध’ तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी पितळी प्रतिमा आहे.

या ग्रामदेवतेची आख्यायिकाही अतिशय मनोरंजक आहे. मायाप्पा गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिध्दनाथाच्या कृपेने त्याच्या खिलारीतील एका कालवडीच्या स्तनातून दुधाची धार सुरू झाली. या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंग तयार झाली. म्हणून या स्थानास खरसुंडी सिध्द-खरवस, शुंड सिध्द असे नांव प्राप्त झाले. या देवाची चैत्र वद्य द्वादशीला भरणारी चैत्र यात्रा वर्षतील महत्वाची यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक मधून देखील भाविक येतात. या यात्रेत सासनकाठ्या मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासासारखा असतो.

श्रींची विशेष कापडीपूजा आणि पत्रीपूजा

गाभार्‍यावर सुमारे १५० फूट उंचीचे शिखर आहे.शिखरावर भक्तगणांनी अर्पण केलेला सुवर्णकलश असून त्याची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली. श्री सिद्धनाथ मंदिराचा दिवस नित्य पहाटे चार वाजता सनई-चौघडा वादनाने सुरू होतो. त्यानंतर मूर्तीस अभिषेक घालून पत्रीपूजा बांधण्यात येते.

पत्रीपूजेनंतर ’श्रीं’ची कापडी पूजा बांधण्यात येते. संपूर्णपणे कापडाचा वापर करुन विविध रूपात बांधण्यात येणारी पूजा हे येथील प्रमुख वैशिष्टय आहे. नवरात्र उत्सवामध्ये देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधली जाते. खरसुंडी गावातील पुजारी मंडळींकडून सिद्धनाथांची विविध स्वरुपात पूजा बांधली जाते. भल्या पाहाटे श्रींच्या मूर्तीस गरम पाण्याने स्नान घालण्यात येते. देवांना कौल लावला जातो. त्यानंतर श्रींची सुंदर अशी पूजा बांधण्यात येते.

दररोज श्रींची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा करण्यात येते. पूजेसाठी विविध प्रकारचे प्राणी वापरतात. त्यामध्ये घोडा,हाती,नाग,सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात. या पूजा अशा प्रकारे बांधल्या जातात की बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते.


माघ पौर्णिमेस परशुराम लोणारी या भक्ताची आठवण म्हणून “ सशाची पारध ” वाटली जाते. मोठ्या उत्सवात पालखी सोहळा रंगतो. त्यास 'पारधी पौर्णिमा उत्सव' असे म्हणतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. सशाचे मांस तसेच मीठ व गुलाल यांच्या मिश्रणापासून ही पारध बनवली जाते.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४