Posts

Showing posts from August, 2023

५)महादजी शिंदे सरकार यांचे मराठा साम्राज्या साठीचे योगदान

शिंदेशाही इतिहासाची साधने या पुस्तकाच्या सुरुवातीला देण्यात आलेलं महादजी शिंदेंच्या खासगी दरबाराचं चित्र इंग्रजांकडून 'द ग्रेट मराठा' अशी उपाधी मिळालेल्या सरदार महादजी शिंदे यांनी दिल्लीपर्यंत मुसंडी मारून आपला दबदबा निर्माण केला होता. महादजींनी 18व्या शतकाचा उत्तरार्ध गाजवला. त्यांच्या कारकीर्दीतली सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ही दिल्ली मोहीम महादजींच्या या दिल्ली मोहिमेविषयी बोलताना इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, "त्यावेळी राजस्थानमध्ये रजपूतांनी उठाव केला होता. मथुरा - भरतपूर भागात जाटांनी बंडखोरी केलेली होती. ती या सगळ्यांनी मोडून काढली. मग त्यांनी झाबेता खानवर (नजीबखान रोहिल्याचा मुलगा) हल्ला करायला दिल्लीकडे मोर्चा वळवला. दिल्लीचा बादशाह असणाऱ्या शाह आलम याने 1770च्या सुमारास दिल्लीतून पळ काढून बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता. रोहिल्ल्यांनी आपलं राज्य बळकावलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापना करावी अशी विनंती बादशाह शाह आलमने मराठ्यांना केली होती. महादजींनी इंग्रजांवर मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शाह आलमला स

२)महादजी शिंदे सरकार यांचे आध्यात्मिक कार्य

Image
२)महादजी शिंदे सरकार यांचे आध्यात्मिक  कार्य .. वडील राणोजींसोबत मोहिमांमध्येच त्यांना लष्करी प्रशिक्षण मिळालं. राणोजींसोबत माळवा आणि उत्तरेतल्या मोहिमांमध्ये महादजी सहभागी झाले होते. निजामासोबतच तळेगाव - उंबरीच्या लढाईनंतर महादजी नावारूपाला आले. औरंगाबाद (1751), साखरखेडले (1756), पंजाब (1759) या मोहीमांमध्ये महादजींचा सहभाग होता. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सहभागी झालेले महादजी जायबंदी झाले. पायाला झालेल्या जखमेने त्यांना काहीसं अधूपण आलं. हा काळ होता 1761 चा. नंतरच्या काळात महाराष्ट्रात पेशवे होते थोरले माधवराव. पेशवे थोरले माधवरावांनीच महादजींना 1768मध्ये सरदारकी दिली. 1771मध्ये महादजी दिल्लीला रवाना झाले. महादजी शिंदेंची दिल्ली मोहीम पानिपताच्या युद्धाने मराठ्यांची अतोनात हानी झाली होती. माणसं मारली गेली, पराभव तर झालाच पण तिजोरीलाही प्रचंड मोठा फटका बसला. पानिपताच्या या युद्धानंतर मराठ्यांच्या एकछत्री वर्चस्वाला कळा लागली. या पराभवाच्या आणि आप्तांना गमावण्याच्या धक्क्याने नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला. नानासाहेबांनंतर गादीवर आलेल्या थोरल्या माधवरावांनी पानिपताचं हे अपयश धुवून काढण

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३१ ऑगस्ट

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ ऑगस्ट १२००* महाराज जैतूगीदेव यांचे निधन जैतूगीदेव हे महाराज चक्रवर्ती सिंघणदेव यांचे वडिल जैतूगीदेव होते. तर आजोबासाहेब भिल्लमदेव हे चालुक्यांचे सामंत होते. महाराज भिल्लमदेव यांनी ११८७ मध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित करुन सेऊन साम्राज्याची स्थापना केली, त्यांनी ११८७ मध्ये देवगिरि येथे किल्ला बांधला आणि देवगिरिला आपली राजधानी बनवली, ११८८ मध्ये त्यांनी गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मदचा सेनापती महम्मद गोरी याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले होते. त्यांनी ११८७ - ११९१ पर्यंत महाराष्ट्रवर राज्य केले होते, ११८९ मध्ये त्यांनी सूरातूर येथे झालेल्या लढाईत होयसळ शासक बल्लालाचा पराभव केला होता, ११९१ मध्ये ते युद्धात बल्लाल सोबत लढता लढता विरगतित मरण पावले होते. त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र महाराज जैतूगीदेव हे राजे झाले, त्यांनी ११९१-१२०० पर्यंत राज्य केले होते. तिथे दुसरी कडे उत्तर भारतात मोहम्मद गोरीने घियथ अल-दीन मुहम्मद याच्या साठी ११९२ मध्ये निर्णायकपणे अजमेरचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला, मंग यानंतर त्याने क

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३० आॅगस्ट १६१५*बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० आॅगस्ट १६१५* बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी शिंद, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० आॅगस्ट १६५८* छत्रपती शिवरायांनी आपले वकील "सोनोपंत डबीर" यांना दिल्लीच्या औरंगजेब बादशहाकडे पत्र घेऊन पाठवले. ३० ऑगस्ट १६५८ ला सोनाजीपंत दिल्लीला जायला निघाले व तिथे पोहोचल्यावर औरंगजेबला शिवाजीराजेंच्याकडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी शिवाजी राजेंनी  पाठवलेले पत्र आज उपलब्ध नाही पण त्यावर औरंगजेबचे उत्तर उपलब्ध आहे. शिवाजी राजेंनी त्याच्या पत्रात काही सवलती मागितल्या होत्या पण ते

फलटण संस्थानचे अधिपती महापराक्रमी, परंप्रतापी बारा वजीरांचा काळ श्रीमंत राजे वणंगपाळ तथा श्रीमंत राजे वणगोजी नाईक निंबाळकर यांचे तैली चित्र...🚩

Image
फलटण संस्थानचे अधिपती महापराक्रमी, परंप्रतापी बारा वजीरांचा काळ श्रीमंत राजे वणंगपाळ तथा श्रीमंत राजे वणगोजी नाईक निंबाळकर यांचे तैली चित्र...🚩 शिवाजी महाराजांच्या पूर्वजांना नाईक-निंबाळकर घराण्याने सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भोसले घराण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या संबंधातील हकिगत अशी १५७० ते १६३० या काळात जगपाळराव ऊर्फ राजे वणगोजी दुसरे हे फलटणच्या गादीचे अधिपती होते... ―――――――――――― चित्रकार : विश्वनाथ खिल्लारी ♥️🔥

*२७ आॅगस्ट १६५६*जावळी प्रांत जिंकून घेऊन महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली. जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता. महाराजानी रायरीला वेढा दिला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ ऑगस्ट १५३४* इस्माईल आदिलशहाचा मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा. आदिलशाहीत १४९० पासून १६८६ पर्यंत ९ सुलतान होऊन गेले. आदिलशाहीचा संस्थापक युसुफ शहानंतर १५१० मध्ये त्याचा वारस इस्माईल हा विजापूरचा सुलतान बनला. याने १५१० ते १५३४ अशी २४ वर्षे कारभार पहिला. याचीबहुतांश कारकीर्द इतर सुलतानाशी लढायांत गेली. इस्माईल आदिलशहा मृत्यू पावला ती तारीख होती २७ ऑगस्ट १५३४. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ आॅगस्ट १६५६* जावळी प्रांत जिंकून घेऊन महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली. जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता. महाराजानी रायरीला वेढा दिला. एका महिन्याने शिळीमकरांच्या मध्यस्तीने रायरी उर्फ रायगड महाराजांच्या ताब्यात आला. महाराजानी मोरेंना घोडा, शिरपाव देऊन सन्मान केला व मोरेंच्याकडील पराक्रमी वीर म्हणजे मुरारबाजी देशपांडे व त्यांचे चार बंधू (त्रिंबकजी, शंकराजी, संभाजी व महादजी) यांना आपल्याकडे मागून घेतले. चंद्ररावना मात्र महाराजानी कैदेत ठेवले. महराज

२४ आॅगस्ट १६७७*"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी आज "उत्तर कर्नाटक" जिंकले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ आॅगस्ट १६०८* ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ आॅगस्ट १६५७* औरंगजेबने जर संपूर्ण आदिलशाही बुडवली तर तो अधिक प्रबळ बनेल व "शाहजहान" नंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून "दारा शुकोह"ने शाहजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला. त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या.  दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ आॅगस्ट १६६१* छत्रपती शिवरायांच्या राणीसाहेब "सकवारबाई" यांना कमळाबाई नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. 🏇

वाठार निंबाळकर हे गाव किल्ले वजा ऐतिहासिक वाड्याचा उदंड वारसा जपलेले गाव.

Image
वाठार निंबाळकर वाठार निंबाळकर हे गाव किल्ले वजा ऐतिहासिक वाड्याचा उदंड वारसा जपलेले गाव.   या सुंदर वारसा निर्मितीचे शिल्पकार कुशाजीराजे निंबाळकर आहेत.  कुशाजी निंबाळकर यांना नऊ  मुले होती. १ व्यंकटराव  २ धारराव              ३ हैबतराव ४ आनंदराव ५ चिटकोजीराव ६ बापुजीराव                ७ आपाजीराव ८  निळकंठराव            ९ पिराजीराव या नवु मुलांसाठी वाठार गावात कुशाजी नाईक निंबाळकर यांनी आपल्या मुलांसाठी नवु वाडे बांधले होते. हे सर्व  पुत्र श्रीमंत शिंदे सरकार यांच्या पदरी होते. हे वाडे इतके टोलेजंग आहेत की त्यांना वाडे म्हणावे की किल्ले हेच समजत नाही. येथील( वेस) महादरवाजा भव्य असून या दरवाजाची उंची जवळपास ५० ते ६० फुट  आहे. या दरवाज्याला भव्य लाकडी कवाडे असुन त्यावर हत्तीच्या धडकेपासून बचावासाठी मजबूत आणि मोठे खिळे लावलेले असून आजही सुस्थितीत आहेत. या दरवाजाच्या आत गेल्यावर समोरच एक खूपच भव्य राजवाडा/ किल्ला आहे. या राजवाड्याची भव्य

आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना " मिसाईल वुमन " म्हणून ओळखतात. टेसी थोमस " भारतीय अंतराळ संशोधन संस्थे " ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमद्धे त्या कार्यरत आहेत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने " अग्नी " क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थोमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला माझा त्रिवार सलाम !*

Image
*👆🏻दिसायला काकूबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत. अफाट आणि अचाट कर्तुत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॊमस, एक असे नाव जे तुम्ही कधीच ऐकले नसणार. कदाचित पुढेही कधी ऐकणार नाहीत. कारण मिडिया अशा लोकांना कधीच प्रसिद्धी देत नाही. त्यासाठी आपले क्रिकेटपटू आणि सिनेस्टार त्यांच्या दिमतीला आहेतच.* *🌹 डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण " मिसाईलमन " म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना " मिसाईल वुमन " म्हणून ओळखतात. टेसी थोमस " भारतीय अंतराळ संशोधन संस्थे " ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमद्धे त्या कार्यरत आहेत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने " अग्नी " क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२१ ऑगस्ट

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ ऑगस्ट १६३८* अफजलखान आधी रणदौलाखानकडे नोकरीत होता. २१ ऑगस्ट १६३८ च्या एका पत्रावर 'परवानगी अफजलखान' असा एक शेरा आहे. म्हणजे पाहा छत्रपती शिवाजीराजे ८ वर्षाचे होते, तेव्हापासून हा अफजलखान राजनीतीचे डाव खेळत होता. त्याचा स्वभाव मूलतः क्रूर आणि कपटी होता हे त्याच्या अनेक कृत्यांतून आणि पत्रांतून दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी भले भले उध्वस्त केले. आपल्या जहागिरीत पेरणीला उशीर झाला म्हणून त्याला कारणीभूत असणाऱ्या लिंगशेट्टीला दम भरताना अफजलखान लिहितो - "रयत आमचे पोंगडे (मित्र) आहेती" असेही तो म्हणतो तर पुढे "यैसे न करिता बाहीर बसून राहिलीयामध्ये तुझी खैरियत नाही. जेथे असशील व जेथे जासील तेथुणु खोदुणु काढूणु जो असिरा देवूणु ठेवूणु घेईल त्यास जनोबासमेत कातुणु घाणीयात घाळूणु पिलोन हे तुम्ही येकीन व तहकिक जाणणे." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ ऑगस्ट १६६१* छत्रपती शिवाजी राजांनी सामराजपंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांना पेशवाई तर अनाजी दत्तो यांना वाकनिशी दिली. मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩

राजीवरत्न गांधी (जन्म: २० ऑगस्ट १९४४ - मृत्यू: २१ मे १९९१)

Image
राजीवरत्न गांधी (जन्म: २० ऑगस्ट १९४४ - मृत्यू: २१ मे १९९१) राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने  १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. "भारत देशाचे सर्वात तरुण सातवे पंतप्रधान, पंचायत राज, दूरसंचार तसेच संगणक क्षेत्रातील क्रांतिचे जनक माननीय भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन" 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

जेव्हा मराठे पानिपतचा खतरनाक बदला घेतात.*

Image
🔶 *जेव्हा मराठे पानिपतचा खतरनाक बदला घेतात.* लिब्रांडू अभ्यासक्रमात पानिपतला मराठयांचा पराभव झाला हे आपल्याला शिकवले जाते परंतु मराठयांनी त्याचा बदला अगदी हिरिरीने घेतला हे मात्र शिकवले जात नाही त्याविषयी हा लेख. लाख मराठा सैन्य धारातीर्थी पडलेल्या पानिपतच्या युद्धातील पराभव मराठ्यांच्या जिव्हारी लागला होता.हिंदू नुपती छत्रपती शाहू महाराज यांच्या सल्याने माधवराव पेशव्यां मार्फत राजेंनी बदला घेण्यासाठी महादजी शिंदे, तुकोजी होळकर,  विसाजीपंत बिनीवाले, रामचंद्र कानडे यांच्या फौजा दिल्लीवर हल्ला करण्यासाठी रवाना केल्या. मराठ्यांच्या फौजा त्वेषाने दिल्लीत शिरल्या. मराठ्यांनी दिसेल त्या अफगाण सैन्याला कापायला सुरुवात केली. मराठा फौजांनी लाल किल्याला वेढा दिला. आक्रमक मराठ्यांच्या पुढे अफगाण सैनिकांनी शरणागती पत्करली. मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून नजिबखानाचा पुत्र झाबेदाखानला कैद केले. मराठा फौजा दिल्ली बादशहाच्या दरबारात शिरल्या. दिल्ली बादशहाच्या  सिंहासनाचे तख्त महादजी शिंदेंनी फोडले. मराठा फौजांनी शाहआलमला दिल्लीचा बादशहा बनवले. महादजी शिंदे ज्यांना पेशवे प्रेमाने पाट

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील शिलालेख

Image

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१७ आॅगस्ट १६६०* सिद्दी जौहरने किल्ले पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून "छत्रपती शिवराय" निसटल्यामुळे सिद्दी जौहरवर गद्दारीच्या संशयाने विजापूरचा आदिलशहा हा "सिद्दी जौहर" आणि छत्रपती शिवरायांचा नायनाट करण्यासाठी किल्ले पन्हाळ्याच्या दिशेने मोठे सैन्य घेऊन निघाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१७ ऑगस्ट १६६६* "छत्रपती शिवराय" हे ९ वर्षाच्या बाळ शंभूराजेंना घेऊन तब्बल २,६०,००० मुघल सैनिकांच्या अजगर विळख्यातून वेशांतर करून आग्र्याच्या कैदेतून पसार झाले. शिवाजी महाराजांबरोबर संभाजी राजांची आग्र्याहून सुटका (औरंगजेबाच्या मगरमिठीतून बाहेर ) मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाज

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१६ आॅगस्ट १६६२*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ आॅगस्ट १६६२* "अण्णाजी दत्तो प्रभूणीकर" हे वाकनिशी करत होते, त्यांना छत्रपती शिवरायांनी सुरनिशीचा हुद्दा सांगितला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ ऑगस्ट १७००* आपल्या राजाला म्हणजेच छत्रपती संभाजीराजेंना हाल हाल करून मारले म्हणून मराठ्यांना जास्तच चिड आली. सभोवतालच्या मुघल प्रदेशावर घिरट्या घालून मराठ्यांनी उच्छाद मांडला. आजच्या दिवशी "हनुमंतराव निंबाळकर" यांनी सातारा मधील "खटाव" हे ठाणे काबीज केले व मुघलांकडून लढणाऱ्या मराठी सरदाराला ठार केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ आॅगस्ट १८३१* वीरांगना महाराणी अवंतीबाई लोधी यांचा जन्म (मृत्यू -२० मार्च १८५८) स्वतःच्या कर्तृत्वाने इंग्रजांना घाम फोडण्यात व सळो की पळो करण्यात ती यशस्वी झाली.ती वीरांगना होती महाराणी अवंतीबाई लोधी. ब्रिटिश राजवटीशी अवंतीबाईंनी केलेला प्रखर संघर्ष,त्यांनी सोसलेले हाल त्यात त्यांना आलेलं वीरमरण याचा सर्व इतिहास अंगावर नक्कीच शहारे आणणारा आहे. अवंतीबाईंचा जन्म एका जमीनदार कुटुंबात झाला. त्या बालपणापासूनच स्वतंत्र आणि शूर होत्या. त्यांना सर

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ ऑगस्ट १६४९*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ ऑगस्ट १६४९* सिंहगड किल्ला आदिलशहाकडे पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.... शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला.... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ आॅगस्ट १६५७* मराठ्यांनी कोकणातील "दंडाराजपुरी" जिंकली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ आॅगस्ट १६५७* "किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ ऑगस्ट १६६०* 'चाकण उर्फ़ संग्रामदुर्ग' अखेर महत् प्रयासाने मुघलांनी जिंकला. शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्राम दुर्गावर. राजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेद्यात होते. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यां

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳२३ऑगस्ट

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ ऑगस्ट १६३८* दुर्गादास राठोड याचा जन्म (मृत्यू - २२ नोव्हेंबर १७१८) औरंगजेबकालीन एक स्वामिनिष्ठ व स्वदेशाभिमानी राजपूत. जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचा मंत्री अजकर्ण याचा मुलगा. वडिलांप्रमाणे त्याने जसवंतसिंगाची प्रामाणिकपणे नोकरी केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ आॅगस्ट १६५७* विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब" शहाजीराजे भोसले" यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना "किल्ले सिंहगड" आदिलशहाला द्यावा लागला होता. तोच "किल्ले सिंहगड" आज मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ आॅगस्ट १६६६* औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे "कुंवर रामसिंग" हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले. "कुंवर रामसिंग" हे मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" यांचे पुत्र होते तसेच छत्रपती शिवरायांची पुर्ण देखरेख ठेवण्याची जबाबदारी कुंवर रामसिंगावर होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ आॅगस्ट १७९५* महाराणी अहिल्याबाई हो

वयाच्या ३७ व्या वर्षी ४२ हजार कोटींची संपत्ती पुण्याच्या नेहा नारखेडे जगातील सर्वात श्रीमंत महिला फोर्ब्सने केला सन्मान *

Image
*वयाच्या ३७ व्या वर्षी ४२ हजार कोटींची संपत्ती पुण्याच्या नेहा नारखेडे जगातील सर्वात श्रीमंत महिला  फोर्ब्सने केला सन्मान * ________________________'__'____________________ सावदा ( जळगाव) च्या नेहा नारखेडे यांचा जगातील सर्वात मोठया श्रीमंत महिला म्हणुन फोर्ब्स मासिकाने सन्मान केला .मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या यशात भारतीयांचाही मोठा वाटा आहे.        नेहा नारखेडे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचा नुकताच जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांची स्थापना तसेच त्यांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांच्या यादीत सामावेश झाला आहे. नेहा या स्वबळावर यशस्वी बनलेल्या भारतातील सर्वात तरुण यशस्वी महिला उद्योजिका आहेत.         पुण्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या नेहा नारखेडे यांनी यश मिळवण्या साठी खूप मेहनत घेतली आहे. फोर्ब्सच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीतही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. नेहा यांनी सॉफ्टवेअर कंपनी कॉन्फ्लुएंट आणि फ्रॉड डिटेक्शन कंपनी ऑसिलेटरच्या सह-संस्थापक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.          नेहा याना २०२१ मध्य

११ आॅगस्ट १६७८*"दक्षिण दिग्विजय मोहीम"

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ आॅगस्ट १६७८* "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवरायांनी दक्षिण मोहीमेदरम्यान "तंजावर" येथे त्यांचे सावत्र बंधू "व्यंकोजी राजे" यांची एक वर्षानंतर पुन्हा भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ आॅगस्ट १९०८* खुदीराम बोस १८व्या वर्षी देशासाठी शहीद होणारे पहिले क्रांतिकारक ज्या वयात तरुण पिढी भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतात त्या वयात त्यांनी त्याचं पूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावलं. ते थोर क्रांतिकारक म्हणजे खुदीराम बोस. बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९साली बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील हबीबपूर गावात झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ ऑगस्टला १९४७* नवाबाने आपण पाकिस्तानात सामील होत असल्याचे जिना यांना कळवले, पण जुनागढ भारतात सामील सरत्या आठवडय़ात पाकिस्तानने नवा राजकीय नकाशा जारी करून जम्मू-काश्मीरबरोबरच गुजरातमधील जुनागड, माणावदर हेही पाकिस्तानच्या हद्दीत असल्याचे दाखविले आहे. नेपाळपाठोपाठ पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या या नवनकाशामागे चीनची फूस असली, तरी या नवीन नकाशास कोणीही गांभीर्याने घेणार नाही. परंतु या