आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१७ आॅगस्ट १६६०*
सिद्दी जौहरने किल्ले पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून "छत्रपती शिवराय" निसटल्यामुळे सिद्दी जौहरवर गद्दारीच्या संशयाने विजापूरचा आदिलशहा हा "सिद्दी जौहर" आणि छत्रपती शिवरायांचा नायनाट करण्यासाठी किल्ले पन्हाळ्याच्या दिशेने मोठे सैन्य घेऊन निघाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१७ ऑगस्ट १६६६*
"छत्रपती शिवराय" हे ९ वर्षाच्या बाळ शंभूराजेंना घेऊन तब्बल २,६०,००० मुघल सैनिकांच्या अजगर विळख्यातून वेशांतर करून आग्र्याच्या कैदेतून पसार झाले. शिवाजी महाराजांबरोबर संभाजी राजांची आग्र्याहून सुटका (औरंगजेबाच्या मगरमिठीतून बाहेर )
मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली.
ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१७ ऑगस्ट १६९६*
खेम सावंताने कुडाळचा किल्ला घेतल्याचे व्हिसेरेइला कळले, तेव्हा त्याने दि. १७ ऑगस्ट १६९६ रोजी पत्र पाठवून त्याचे अभिनंदन केले. १६९६ साली खेम सावंताने मोगलांच्या ताब्यात असलेल्या धारगडच्या किल्ल्यावर हल्ला केला. त्याचा उल्लेख फोंड्याचा मोगल सुभेदार रफीखान याने गोव्याच्या व्हिसेरेइला पाठविलेल्या पत्रात आढळतो. रफीखानाने प्रस्तुतच्या पत्रात आपण सावंताविरुद्ध लष्करी मोहीम सुरु करणार असल्याचे म्हटले आहे व पोर्तुगीजानी दारूची पिंपे आणि तोफांचे गोळे पाठविल्याबद्दल आभार मानले आहेत. खेम सावंताने मोगलांच्या ताब्यात असलेले साखळी आणि डिचोली हे दोन किल्ले घेतले व फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. फोंड्याच्या नबाबाने पोर्तुगीजांकडे दारुगोळ्याची मदत मागितली व त्या मदतीबद्दल त्याना बार्देशच्या हद्दीवरील काही मुलुख देण्याचे कबूल केले. आपल्या राज्याच्या हद्दीला लागून असलेले सत्ताधारी आपल्याहून वरचढ होऊ द्यायचे नाहीत, हे पोर्तुगीजांचे धोरण असल्याने खेम सावंताविरुद्ध त्यानी फोंड्याच्या नबाबास दारू गोळ्याची मदत केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१७ आॅगस्ट १९०९*
१७ ऑगस्ट १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा यांना फासावर लटकवण्यात आले. हातात गीता आणि ओठात रामकृष्णाचे नाव घेऊन देशप्रेमाने भरलेला तो देशभक्त हसत हसत फाशी गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...