आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१६ आॅगस्ट १६६२*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१६ आॅगस्ट १६६२*
"अण्णाजी दत्तो प्रभूणीकर" हे वाकनिशी करत होते, त्यांना छत्रपती शिवरायांनी सुरनिशीचा हुद्दा सांगितला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१६ ऑगस्ट १७००*
आपल्या राजाला म्हणजेच छत्रपती संभाजीराजेंना हाल हाल करून मारले म्हणून मराठ्यांना जास्तच चिड आली.
सभोवतालच्या मुघल प्रदेशावर घिरट्या घालून मराठ्यांनी उच्छाद मांडला.
आजच्या दिवशी "हनुमंतराव निंबाळकर" यांनी सातारा मधील "खटाव" हे ठाणे काबीज केले व मुघलांकडून लढणाऱ्या मराठी सरदाराला ठार केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१६ आॅगस्ट १८३१*
वीरांगना महाराणी अवंतीबाई लोधी यांचा जन्म
(मृत्यू -२० मार्च १८५८)
स्वतःच्या कर्तृत्वाने इंग्रजांना घाम फोडण्यात व सळो की पळो करण्यात ती यशस्वी झाली.ती वीरांगना होती महाराणी अवंतीबाई लोधी. ब्रिटिश राजवटीशी अवंतीबाईंनी केलेला प्रखर संघर्ष,त्यांनी सोसलेले हाल त्यात त्यांना आलेलं वीरमरण याचा सर्व इतिहास अंगावर नक्कीच शहारे आणणारा आहे.
अवंतीबाईंचा जन्म एका जमीनदार कुटुंबात झाला. त्या बालपणापासूनच स्वतंत्र आणि शूर होत्या. त्यांना सर्व प्रकारचे लष्करी प्रशिक्षण घेतले होते. त्या राजकीय मुत्सुद्देगिरीपासून ते लष्करी प्रशिक्षणा पर्यंतच्या सर्व गोष्टींशी अवगत होत्या.
तलवारबाजी आणि घोडेस्वारीमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं होतं.
त्यांच्यात असलेल्या राजकीय चातुर्यामुळे व लढाऊ बाण्यामुळे एक साम्राज्ञी होण्यासाठी त्या संपूर्णपणे योग्य होत्या. त्यांच्या या वीरतेचे आणि सुंदरतेचे चर्चे संपूर्ण नर्मदा खोऱ्यात होते.
यामुळे सन १८४९ साली त्यांचा विवाह मध्य प्रदेश मधील रामगडचे महाराज विक्रमादित्य लोधी यांच्यासोबत झाला.त्यांना दोन अपत्ये होती.
काही कालांतराने महाराज विक्रमादित्य यांचा अकाली म्रुत्यु झाला.त्यानंतर त्यांची मुले लहान असल्याचे कारण सांगून इंग्रज सरकारने शेख मेहमूद नामक अत्याचारी अधिकाऱ्याची रामगडचा प्रभारी म्हणून नेमणूक केली. हे अवंतीबाईंना रुचले नाही.शेख मेहमूदने हा रामगडच्या प्रजेवर अनन्वित अत्याचार व जुलूम करीत असे. हे बघून अवंतीबाईंनी या विरोधात आवाज मजबूत करायाला सुरुवात केली.
१८५७च्या मे महिन्यापर्यंत बंडाचा वणवा हा मीरत आणि दिल्लीपासून देशभरात पसरायला सुरुवात झाली. काडतूस बनवण्यात केलेला डुकराच्या आणि गाईच्या चरबीचा वापर याने मंगल पांडे यांच्या नेतृत्वात एका मोठा जन आंदोलनाला चालना दिली.
पुढे यातूनच १८५७ चा उठाव आकारास येऊ लागला.
या संपूर्ण लढ्यात अवंतीबाई मागे नव्हत्या, त्यांनी देखील १८५७ च्या उठवात मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला.
त्यांनी बांगड्या आणि पत्र आसपासच्या राजवटींना पाठवून या उठावात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं.
अवंतीबाईंनी आपलं सैन्य मंडला जवळच्या खेरी या गावी एकत्र केले. ब्रिटिशांना या युद्धात सहज विजय मिळणार होता पण त्यांचा अत्यंत दारुण पराभव अवंतीबाईंच्या सैन्याने केला. इतकंच काय तर डिसेंबर १८५७ ते फेब्रुवारी १८५८ या तीन महिन्याचा काळात तिने मंडलावर राज्य केले.
पुढे जाऊन ब्रिटिशांनी याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली त्या परिस्थितीतही अवंतीबाईंनी हार मानली नाही, त्यांनी आपला संघर्ष चालूच ठेवला.
त्यांनी छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन गनिमी काव्याच्या पद्धतीने ब्रिटिश जनरल वेडिंग्टनचा कॅम्प उध्वस्त केला होता. पण त्यांच्या लहान- मोठ्या कारवायांनी ब्रिटिशांचं फार नुकसान झालं नाही.
थोड्याच दिवसात ब्रिटिशांनी प्रचंड सैन्यानिशी अवंतीबाईंच्या फौजेवर अचानक हल्ला करून चारी बाजूने घेरले त्यामुळे अवंतीबाईंच्या समोर दोनच पर्याय होते. एकतर शरणागती किंवा आत्मदहन, परंतु अवंतीबाईंनी शेवटपर्यंत शरणागती पत्करली नाही.
त्यांनी स्वतःची तलवार पोटात घालून प्राणत्याग केला. मरताना त्यांच्या तोंडी शेवटचे शब्द होते,
‘‘हमारी दुर्गावती ने जीते जी वैरी के हाथ से अंग न छुए जाने का प्रण लिया था इसे न भूलनाबडों’’.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment