आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२१ ऑगस्ट
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ ऑगस्ट १६३८*
अफजलखान आधी रणदौलाखानकडे नोकरीत होता. २१ ऑगस्ट १६३८ च्या एका पत्रावर 'परवानगी अफजलखान' असा एक शेरा आहे. म्हणजे पाहा छत्रपती शिवाजीराजे ८ वर्षाचे होते, तेव्हापासून हा अफजलखान राजनीतीचे डाव खेळत होता. त्याचा स्वभाव मूलतः क्रूर आणि कपटी होता हे त्याच्या अनेक कृत्यांतून आणि पत्रांतून दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी भले भले उध्वस्त केले. आपल्या जहागिरीत पेरणीला उशीर झाला म्हणून त्याला कारणीभूत असणाऱ्या लिंगशेट्टीला दम भरताना अफजलखान लिहितो - "रयत आमचे पोंगडे (मित्र) आहेती" असेही तो म्हणतो तर पुढे "यैसे न करिता बाहीर बसून राहिलीयामध्ये तुझी खैरियत नाही. जेथे असशील व जेथे जासील तेथुणु खोदुणु काढूणु जो असिरा देवूणु ठेवूणु घेईल त्यास जनोबासमेत कातुणु घाणीयात घाळूणु पिलोन हे तुम्ही येकीन व तहकिक जाणणे."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ ऑगस्ट १६६१*
छत्रपती शिवाजी राजांनी सामराजपंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांना पेशवाई तर अनाजी दत्तो यांना वाकनिशी दिली. मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ ऑगस्ट १६८१*
औरंगजेबाने आपला दुसरा मुलगा आज्जम याला “शहा” हि पदवी देवून दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ आॅगस्ट १६८२*
"किल्ले रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने कील्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
*२१ ऑगस्ट १७११*
चंद्रसेन जाधवरावांच्या ह्या उघड बंडाने महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण केली. ताराबाईनी चंद्रसेन जाधवांचे सहर्ष स्वागत केले. छत्रपती शाहू राजांची बाजू यावेळी फारच कमकुवत होती. चंद्रसेन जाधवरावांच्या अगोदर सावंतवाडीचे सावंत, आंग्रे, खंडेराव दाभाडे अशी मातबर मंडळी ताराबाईना मिळाली होतीच. चंद्रसेन जाधवांनी हैबतराव निंबाळकरास चिथावून त्यास ताराबाईंच्या पक्षास आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा वेळी परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर हे दोन सरदार शाहू राजांच्या बाजूचे राहिले, पण ते खानदेशकडे होते. शाहू राजांचा पक्ष फारच कमकुवत झाला होता. मोठी दुरावस्था प्राप्त झाली होती. तरी शाहू महाराज राजे डगमगले नाहीत. बाळाजी विश्वनाथांनी यावेळी पुढे सरसावून शाहू राजांची बाजू सावरून धरली. बाळाजींनी पिलाजी जाधव, पुरंदरे यांच्या सहाय्याने सावकारांकडून कर्ज काढले. फौज उभी केली. हीच फौज पुढे “हुजूर फौज”, “हुजूर पागा” म्हणून प्रसिद्ध पावली. सावकारांच्या कर्जास तारण पाहिजे म्हणून शाहू राजांकडून बाळाजींनी पंचवीस लाखाचा सरंजाम करून घेतला (२१ ऑगस्ट १७११).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ ऑगस्ट १७३३*
रोजी विश्वासराव बाजीराव पेशव्यांना लिहितात, “अंजनवेलीत अडकलेला सिद्दीसात पुन्हा जंजीऱ्यात न्यावा आणि अंजनवेलीत संबूळला ठेवावं असा व विचार झाला आहे” (पेशवे दफ्तर ३ लेखांक ६९). मध्यंतरी सेखोजी आंग्रे यांचा मृत्यू झाल्याने अंजनवेलच्या कामात थोडा ढिलेपणा आला. याचा फायदा प्रतिनिधींनी घेतला आणि त्यांनी आपली माणसं अंजनवेलच्या मोर्चावर बसवली. त्यात प्रतिनिधींनी साताऱ्यात शाहू महाराजांना लिहिलं की, “अंजनवेली घेऊन तरीच उठोन, अन्यथा उठतो ऐसे नाही”, आणि म्हणूनच महाराज प्रतिनिधींवर खुश होते. यानंतर अचानक प्रतिनिधींनी आपला मुक्काम चिपळूणच्या प्रदेशातून हलवला, बाजीरावांना स्वतःलाही उत्तरेच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करावं लागलं आणि मोहीम जवळपास स्थगित झाल्यासारखी झाली. इ.स. १७३५ मध्ये चिमाजीअप्पा, नारोराम मंत्री वगैरे लोक पुन्हा फौजेनिशी कोकणात उतरल्यावर मोहिमेला पुन्हा तरतरी आली. एप्रिल १७३६ मध्ये खास जंजिरेकर सिद्दी सात हा मारला गेला. हि खबर साताऱ्यात शाहू महाराजांना मिळाल्यानंतर त्यांनी तोफा उडवण्याची आणि नौबत वाजवण्याची आज्ञा दिली, म्हणाले, “सिद्दीसातासारिखा गनीम मारिला, हे कर्म सामान्य न केले” (पेशवे दफ्तर ३ लेखांक १८२). अप्पांना वस्त्रं, तलवार आणि बहुमान तसेच मानाजी आंग्रे यांनाही वस्त्रं आणि पदक पाठवलं. बाजीरावही म्हणतात, “राजश्री स्वामींचे (शाहू महाराज) प्रतापे व कैलासवासी नानाचे (बाळाजी विश्वनाथ) आशीर्वादे व स्वामींचे (ब्रह्मेंद्र) आशीर्वादे राजश्री आपास यश थोर आले” (पेशवे दफ्तर ३ लेखांक १९८).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
*२१ ऑगस्ट १८५७*
१८५७ चे स्वातंत्र्य युध्द
२१ ऑगस्ट १८५७ रोजी जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली. त्या सैनिकात बहुसंख्य राजपूत सैनिक होते. "चलो दिल्ली - मारो फिरंगी" अशा घोषणा देत सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला. तेथिल ठाकूर कुशलासिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्विकारले. आसोप, गुलर आणिआलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारापर्यंत झाली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment