आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ ऑगस्ट १६४९*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ ऑगस्ट १६४९*
सिंहगड किल्ला आदिलशहाकडे
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली....
शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला....

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ आॅगस्ट १६५७*
मराठ्यांनी कोकणातील "दंडाराजपुरी" जिंकली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ आॅगस्ट १६५७*
"किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.
या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ ऑगस्ट १६६०*
'चाकण उर्फ़ संग्रामदुर्ग' अखेर महत् प्रयासाने मुघलांनी जिंकला.
शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्राम दुर्गावर. राजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेद्यात होते. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मात्र अवघ्या ३५०च्या फौजेनिशी किल्ला ५५ दिवस लढवला. अखेर १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले. शेवटी फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला.
किल्ला हातातून गेला तरी पराक्रमावर खुश होउन शिवाजी राजांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ ऑगस्ट १६६६*
शिवाजीराजांची 'मिठाई'
तिथीने त्या दिवशी श्रावण वद्य नवमी होती. श्रीकृष्णजन्मोत्सव चालुच होता. त्यानिमित्ताने शिवाजीराजांनी ते जिथे कैद होते तिथुनच मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. आग्र्यामधील प्रतिष्ठित लोकांना ही मिठाई जाऊ लागली. एवढेच काय तर बादशाही वजीरांनाही ही मिठाई जाऊ लागली. मात्र त्याआधी अर्थातच बादशहा औरंगजेबाची परवानगी मिळवावी लागली. बादशहाने पहार्यावरच्या दरोग्याला विचारले 'सीवा मिठाई कशाबद्दल वाटणार आहे?' त्यावर उत्तर मिळाले की,'सीवाचे पुर्वीपासुनच व्रत चालु आहे. अटकेत असला तरी तो ते व्रत पाळतो. बादशहांनी परवानगी दिली तर ठीक नाहीतर तो ते व्रत नाही पाळणार'.
औरंगजेबाला काय वाटले कोण जाणे पण, त्याने ही परवानगी लगेच दिली. 'शुभश्च: शिघ्रम' लगेच पेटारे बाहेर जायला सुरूवात झाली. एक माणुस आत सहज बसु शकेल इतके ते पेटारे मोठे होते आणि ते उचलायला दोन माणसे असायची. पहिल्या दिवशी पेटारे बाहेर जाताना पहार्यावरच्या लोकांनी एक दोन पेटारे उघडुन पाहिले. त्यात खरच मिठाई होती म्हणून ते पुढे जाऊ दिले. १७ तारखेपर्यंत असे किती वेळा मिठाईचे पेटारे तिथुन बाहेर गेले हे नेमक समजत नाही पण, पहारेकरी फक्त पहिले एक दोनच पेटारे उघडून पहायचे. थोडक्यात पेटार्यांकडे मुघलांचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शिवाजीराजांचे मात्र या पेटार्यांकडे बारीक 'लक्ष' होते. ९ वर्षांचे संभाजीराजे रामसिंगसोबत रोज दरबारात जातच होते. 
ही खाल्लेली मिठाई मुघलांना आत्ता जरी गोड लागत असली तरी, लवकरच ती त्यांना 'बाधणार' होती. काहींना तर ती न खाताच बाधणार होती.
याच सुमारास महाराजांनी त्यांच्याजवळ असलेले जडजवाहीर व मौल्यवान वस्तू आग्र्यामधीलच मूलचंद सावकाराच्या लोकांसोबत इकडे राजगडावर रवाना केले. त्याकाळी असे व्यवहार देशभर होयचे. तसेच, शिवाजीराजांनी कवींन्द्र परमानंद यांच्याबरोबर काही हत्ती, घोडे, पालख्या पाठवुन दिल्या. याच परमानंदांनी पुढे 'शिवभारत' हा ग्रंथ लिहिला ज्याच्यातुन आपल्याला शिवचरित्राची महत्वाची माहिती मिळते. 
औरंगजेब हे सगळ होऊ देत होता कारण जितके महाराज व संभाजी एकटे पडतील तितके त्याच काम सोप होणार होत.
महाराजांची आता तयारी चालु झाली होती. 'मुहुर्तघटिका' जवळ आली होती. आता फक्त नियोजन कस करणार यावरच, शिवाजीराजे, संभााजीराजे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ ऑगस्ट १६७९*
खांदेरी किल्ला बांधकामास सुरुवात
जंजिऱ्याचा सिद्दी आणि इस्ट इंडिया कंपनीचे मराठ्यांविरोधात कायमच सख्य असे. या दोन रिपु सत्तांमध्ये पाचर मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १४ ऑगस्ट १६७९ रोजी खांदेरी वर किल्ला बांधयास सुरुवात केली. यावरून मराठे आणि इस्ट इंडिया कंपनीमध्ये नाविक युद्ध भडकले. 
हे युद्ध जानेवारी १६८० पर्यंत चालू होते. सिद्दी व इंग्रज या दोन्ही आरमाराना तोंड देत देत अखेर मराठ्यांनी खांदेरी बेट जिंकलेच व तिथे किल्ला बांधला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...