आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳२३ऑगस्ट

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ ऑगस्ट १६३८*
दुर्गादास राठोड याचा जन्म
(मृत्यू - २२ नोव्हेंबर १७१८)
औरंगजेबकालीन एक स्वामिनिष्ठ व स्वदेशाभिमानी राजपूत. जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचा मंत्री अजकर्ण याचा मुलगा. वडिलांप्रमाणे त्याने जसवंतसिंगाची प्रामाणिकपणे नोकरी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ आॅगस्ट १६५७*
विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब" शहाजीराजे भोसले" यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना "किल्ले सिंहगड" आदिलशहाला द्यावा लागला होता. तोच "किल्ले सिंहगड" आज मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ आॅगस्ट १६६६*
औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे "कुंवर रामसिंग" हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले.
"कुंवर रामसिंग" हे मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" यांचे पुत्र होते तसेच छत्रपती शिवरायांची पुर्ण देखरेख ठेवण्याची जबाबदारी कुंवर रामसिंगावर होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ आॅगस्ट १७९५*
महाराणी अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी
दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. (जन्म: ३१ मे १७२५)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४