वाठार निंबाळकर हे गाव किल्ले वजा ऐतिहासिक वाड्याचा उदंड वारसा जपलेले गाव.
वाठार निंबाळकर
वाठार निंबाळकर हे गाव किल्ले वजा ऐतिहासिक वाड्याचा उदंड वारसा जपलेले गाव.
या सुंदर वारसा निर्मितीचे शिल्पकार कुशाजीराजे निंबाळकर आहेत.
कुशाजी निंबाळकर यांना नऊ मुले होती. १ व्यंकटराव २ धारराव ३ हैबतराव ४ आनंदराव ५ चिटकोजीराव ६ बापुजीराव ७ आपाजीराव ८ निळकंठराव ९ पिराजीराव या नवु मुलांसाठी वाठार गावात कुशाजी नाईक निंबाळकर यांनी आपल्या मुलांसाठी नवु वाडे बांधले होते. हे सर्व पुत्र श्रीमंत शिंदे सरकार यांच्या पदरी होते. हे वाडे इतके टोलेजंग आहेत की त्यांना वाडे म्हणावे की किल्ले हेच समजत नाही. येथील( वेस) महादरवाजा भव्य असून या दरवाजाची उंची जवळपास ५० ते ६० फुट आहे. या दरवाज्याला भव्य लाकडी कवाडे असुन त्यावर हत्तीच्या धडकेपासून बचावासाठी मजबूत आणि मोठे खिळे लावलेले असून आजही सुस्थितीत आहेत. या दरवाजाच्या आत गेल्यावर समोरच एक खूपच भव्य राजवाडा/ किल्ला आहे. या राजवाड्याची भव्य तटबंदी आणि दरवाजाही महादरवाजा प्रमाणे भव्य आणि सुस्थितीत असल्याचे दिसते. आतील जवळपास सर्वच बांधकाम काळाच्या ओघात नष्ट झाले आहे. आत एक खूपच सुंदर आणि सुस्थितीत पायरी विहीर आहे. विहिरीच्या बाजूला तळघर असल्याचे अवषेश वरुन जानवते .तटबंदीवर जाण्यासाठी भक्कम पायर्या आहेत. या वाड्यस नवु बुरुज आहेत. एका बुरुजावर अलीकडच्या काळात एक मजार सदृश कट्टा बांधलेला दिसतो आहे . या तटबंदीची रुंदी बारा ते पंधरा फूट असावी. या तटबंदीवरुन आजूबाजूचा परिसर आणि इतर वाडे आणि वाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्याची तटबंदी खूपच मजबूत असून संपूर्ण तटबंदी सुस्थितीत आहे. हा राजवाडा सर्वात भव्य आहे.
महादरवाजाच्या उजव्या बाजूला तटबंदी असलेले राम मंदिर आहे. या मंदिरात राम ,लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मुर्ती आहेत. राम मंदिर समोरच दोन समाधी सदृश मंदिर असून यात पादुका आणि शिवलिंग आहेत. मंदिराच्या बाजूला एक सुंदर असी गोल पायरी विहीर आहे. मंदिर खूपच सुंदर असून मंदिराच्या बाजूच्या वाड्याची पडझड झाल्यामुळे बहुतेक दरवाजा बंद केला आहे. महादरवाजाच्या डाव्या बाजूला दोन भव्य वाड्याचे अवशेष आहेत.
पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक भव्य आणि सुस्थितीत वाडा असून या वाड्यात आजही जितेंद्रराजे निंबाळकर सपरिवार वास्तव्यास आहेत. या वाड्याचे नुतनीकरण झाले आहे पण मुळ ढाचा तसाच ठेवून पुर्वी सारखेच ऐतिहासिक सदृश्य नुतनीकरण केले आहे. खूपच सुंदर आहे. या वाड्याचा मुख्य दरवाजा खूप सुंदर असून लक्ष वेधून घेतो. या वाड्याचे बाजूला दोन समाधी मंदिर असून बहुतेक ती कुशाजीराव निंबाळकर आणि त्यांच्या पत्नीची असावी असे सांगितले जाते. या वाड्याच्या पुढे गेल्यावर एक सुंदर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे.या मंदीरा समोर खूपच सुंदर लाकडी सभामंडप आहे.
या मंदिराच्या पुढे गेल्यावर बर्या पैकी तटबंदी शिल्लक आसलेला भव्य सुस्थितीत प्रवेशद्वार असलेल्या वाडा आहे. या वाड्याचे समोर अनखी एका वाड्याचे अवशेष आणि भिंत शिल्लक आहे. या वाड्याच्या बाजूलाच संपूर्ण खंडहर झालेल्या वाड्याचे खूप सारे अवशेष आहेत. या वाड्याच्या पाठीमागील बाजूस दोन समाधी मंदिर असून एकात शिवलिंग आणि एकात पादुका आहेत . हा संपूर्ण परिसर पहावयास कमीतकमी दोन तास लागतात.
खरच कुशाजीराजे यांच्या काळात येथे किती शानदार वैभव नांदत असेल. हा वरसा पाहून मन इतिहासात हरवुन जाते.
Comments
Post a Comment