३० जून १६६५*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० जून १६६५* सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने छत्रपती शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० जून १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठयांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मुगलांना माघार घ्यावी लागली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० जून १६७७* दक्षिण हिंदुस्तानात मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "देवेनापट्टण" जिंकले……. (राज्याभिषेकानंतर महाराजांची हि शेवटची एकमेव मोहीम होती.) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० जून १६९३* मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेऊन कोंढाणा (सिंहगड) चढु लागले. अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यावर मोगलांची गस्त सुरु होती आणि पहांरेकरी सावध होते, त्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला... तेंव्हा किल्ल्य़ावरच्या गस्तवाल्यान्ची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आ