३० जून १६६५*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३० जून १६६५*
सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने छत्रपती शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० जून १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठयांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मुगलांना माघार घ्यावी लागली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३० जून १६७७*
दक्षिण हिंदुस्तानात मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "देवेनापट्टण" जिंकले…….
(राज्याभिषेकानंतर महाराजांची हि शेवटची एकमेव मोहीम होती.)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३० जून १६९३*
मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेऊन कोंढाणा (सिंहगड) चढु लागले. अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यावर मोगलांची गस्त सुरु होती आणि पहांरेकरी सावध होते, त्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला...
तेंव्हा किल्ल्य़ावरच्या गस्तवाल्यान्ची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.. मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फ़ार हानी झाली. मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता. पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते.
पावसाळ्यतल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते. नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले.
आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते..
हर हर महादेव च्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३० जून १७५४*
मारवाडच्या लढाईची पार्श्वभूमी :
मारवाड प्रांती जोधपूरचा राजा अभयसिंग १७५४ मध्ये मरण पावला. तेंव्हा त्याचा पुत्र बिजयसिंग व त्याचा पुतण्या रामसिंग या दोघात जोधपूरच्या गादीसाठी कलह पेटला. पूर्वी रामसिंगचा बाप ज्यावेळी मरण पावला होता, त्यावेळी त्याचा पुत्र हा रामसिंग यास गादी प्राप्त व्हायची, पण तो दुर्व्यसनी होता. त्यामुळे त्याचा चुलता अभयसिंग हा जोधपूरची गादी बळकावून बसला होता. त्यामुळे अभयसिंग मरण पावताच आपले हक्काचे राज्य आपणास परत मिळावे अशी रामसिंगास ईच्छा उत्पन्न होऊन त्याने पेशव्यांचा उत्तर हिंदुस्थानातील शूर मुत्सद्दी सरदार जयाप्पा शिंदे याची मदत मागितली. त्यामुळे जयाप्पाने कुंभेरी येथील आपली कामगिरी आटोपताच ३० जून १७५४ रोजी मारवाडकडे आपले मोर्चे वळवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩
Comments
Post a Comment