२० जूनला शेरखान मराठ्यांवर चालून आला, त्याला अडवायला राजे स्वतः गेले. खानाला पळता भुई थोडी झाली. पुढे त्याचा पाठलाग ही केला. शेरखान राजांना शरण आला. त्याची व्हालौर, टेजपठण, भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० जून १६७७*
विजापुरचा सुरमा म्हणून अब्दुल्लाखानाची ओळख होती. हा किल्ले वेल्लोरचा किल्लेदार. राजांनी हा किल्ला घेण्यासाठी जोराची तयारी केली होती. पुढे मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्लाखान किल्ला शर्थीने लढवत होता. तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या २ टेकड्यांवर २ किल्ले बांधले, त्यांची नावे साजरा आणि गोजरा. तोफांचा मारा सुरु झाला. वेल्लोरचा किल्ला रेंगळणार असे दिसताच राजांनी नरहरी रुद्र या सरदारास २ हजार स्वार आणि ५ हजार पायदळ देऊन वेढ्याजवल ठेवले. त्यातच, दि. २० जूनला शेरखान मराठ्यांवर चालून आला, त्याला अडवायला राजे स्वतः गेले. खानाला पळता भुई थोडी झाली. पुढे त्याचा पाठलाग ही केला. शेरखान राजांना शरण आला. त्याची व्हालौर, टेजपठण, भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० जून १६८२*
औरंगजेबपुत्र अकबराने छत्रपती संभाजी महाराजांकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघाविरुध्द हालचाली सुरु झाल्या होत्या, औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बुर्हानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे छत्रपती संभाजी महाराजांविरुध्द सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले, पुढे सहा महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० जून १७३३*
छत्रपती शाहुंचे रायगड संरक्षणासाठीचे पत्र
रायगड हा मराठ्यांचा तख्ताचा गड ता.८ जून १७३३ ला मराठ्यांना पुन्हा हस्तगत झाला.....
रायगड राजधानी हस्तगत झाल्याचे वर्तमान ऐकून शाहूने ता.२० जून १७३३ स्वहस्ताने पत्र लिहिले त्यात हा मजकूर आहे, घेतल्या स्थळाचे संरक्षण होय ते करणे. आम्ही ईश्वरी इच्छा आहे तर श्रावणात रायरी व बाजे किल्ला पहावयास येऊ. रा. शिवाजीमहाराज व रा. आबासाहेब संभाजीमहाराज व काकासाहेब (राजाराम महाराज) व मातुश्री ताराबाई साहेब यास कोणास न जाहले ते कार्य चि.फत्तेसिंगबाबा व रा. प्रधान यांनी केले ही कीर्त जगत्रयी व निजाम उल मुल्क व दिल्ली पावेतो जाहली. हा लौकिक जेणेकरून कायम राहील ते करणे. अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् । जे सांगणे ते जाते समयी सांगितलेच आहे.....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० जून १७९०*
महादजी शिंदे याचा युरोपिअन सेनापती - डी बॉईन
सन १७९० च्या आरंभीं डी बॉइनेच्या हाताखाली सात सातशें शिपायांची एक पलटण अशा आठ पलटणींचें एक ब्रिगेड होतें. त्यांत महादजीनें हळू हळू भर घालून शेवटीं त्या तीन ब्रिगेड केल्या. त्याचा तोफखानाहि वाढतां वाढतां शेवटीं एकंदर दोनशेंवर तोफा झाल्या होत्या. यांतील ६० तोफा सँग्स्टरनें आपल्या कारखान्यांतच ओंतून तयार केल्या होत्या. डी बॉइनेच्या प्रत्येक पलटणीबरोबर सहा पौंड वजनाचा गोळा फेंकणार्या दोन, तीन पौंड वजनाचा गोळा फेंकणार्या दोन व एक हॉविट्झर एवढा सरंजाम असून प्रत्येक ब्रिगेडला ५०० घोडस्वारांचें एक एक पथक जोडलेलें होतें. डी बॉइनेचा पगार शेवटी दरमहा १०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यांत आला होता. याशिवाय त्याच्या पायदळाच्या व तोफखान्याच्या खर्चाकरितां कांहीं जमिनी लावून दिल्या असून त्यांच्या ऐन वसुलावर शेंकडा दोन टक्के नफा घेण्याची परवानगी देण्यांत आली होती. खड्या सैन्याशिवाय डी बॉइनेजवळ कांही निवडक हंगामी पायदळहि असें. यांतील शिपायांजवळ तोड्याच्या बंदुका असत; पण डी बॉइनेनें त्यांनां संगीनी लावण्याची युक्ति काढून या पायदळाची उपयुक्तता बरींच वाढविली होती. इस्मायलबेगशीं झालेल्या पाटणच्या लढाईंत (२० जून १७९०) महादजी शिंद्याचा जो विजय झाला तो मुख्यत: डी बॉइनच्या पलटणीमुळेंच.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩
Comments
Post a Comment