आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२५ जून १६७०*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२५ जून १६७०*
तत्कालिन कोकण प्रांतातील आणि सध्याच्या "पालघर" जिल्ह्यातील "किल्ले कोहोज" मराठ्यांनी जिंकला
*२५ जून १६७७*
"छत्रपती शिवराय" दक्षिण दिग्विजय मोहीमेत भुवनगिरी पट्टन येथे शेरखानाचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२५ जून १६९३*
"किल्ले सिंहगड मोहीम"
स्वराज्य निष्ठ "नावजी बलकवडे" व "विठोजी कारके" यांनी निवडक मावळे सोबत घेतले आणि ते लोणावळा जवळच्या "किल्ले राजमाची" वरून निघाले.
पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत "किल्ले सिंहगड" च्या जंगलात येऊन पोचले व गडावरच्या गनिमावर हल्ला करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत ५ दिवस दबा धरून बसले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२५ जून १७३१*
१७३१ साली कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांनी संताजी घोरपडे ह्यांचे नातू राणोजी घोरपडे ह्यांना सरंजाम दिल्याप्रसंगी आलेली हकीकत. ३ गोष्टीचे ह्यात वर्णन केले आहे
१. संभाजी महाराजांना अटक केल्याचा प्रसंग व त्या वेळी झालेली झटापट
२. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणल्याची घटना
३. संताजी घोरपडे ह्यांची सरनोबतपदी नियुक्ती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२५ जून १७४०*
नानासाहेबांस पेश्वाईची वस्त्रे मिळाली
नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली.
थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले.
सातारा आणि करवीर गाद्या एकत्रीकरणाचा प्रयत्न नानासाहेब पेशव्यांनी त्यांना पेशवेपद मिळाल्या नंतर केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२५ जून १८००*
२५ जून रोजी मध्यरात्री बाजीरावांनी नारोपंत चक्रदेव, बजाबा शिराळेकर, राघोपंत गोडबोले व आणखी दोघे अशा पाच जणांस रायगड व प्रतापगडकडे प्रतिबंधांत ठेवण्यासाठी पाठवून दिले. बाळाजीपंत पटवर्धन आपली एक व बाळोजी कुंजीराची एक अशा दोन पागा घेऊन हे कैदी पोहोचविण्यास गेले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩
Comments
Post a Comment