*२९ जून १६६२*छत्रपती शिवरायांनी "बाजी सर्जेराव जेधे" यांस पत्र पाठवले.कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते.पुण्यापासून दक्षिणेस सुमारे पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुख,कान्होजी जेधे होते.🏇🚩🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२९ जून १६६२*
छत्रपती शिवरायांनी "बाजी सर्जेराव जेधे" यांस पत्र पाठवले.
कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते.पुण्यापासून दक्षिणेस सुमारे पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुख,कान्होजी जेधे होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२९ जून १६८६*
सुरतकर इंग्रजांनी सेंट जॉर्ज किल्ल्याला पाठवलेले पत्र २९ जून १६८६ रोजी....,

“औरंगजेब अद्यापपावेतो तेथुन हललेला नाही अशी वंदता आहे की संभाजीराजे आणि सुलतान अकबर यांच्या विरुध्द केलेले युध्द आपल्या उमरावांवर सोपवून तो माघारी दिल्लीला जाण्याच्या विचारात आहे तो अतिशय चिडखोर बनला असून मनात अस्थिर झालेला आहे त्याचे उमरावही असमाधानी झालेले आहेत जर त्याचे आयुष्य संपुष्टात आले नाही तर कटकटी वाढतील आणि आपल्याला सतत भीतीच्या वातावरणात दिवस काढावे लागतील....”
दिल्लीच्या सम्राटाच्या मनाची अस्थिरता वाढवणारे हे “महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज”...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२९ जून १९०९*
थोर क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायली याचा वधचा कट आखला
कर्झन वायली याचा वध करण्यापूर्वी मदनलाल धिंग्रा यांनी लॉर्ड कर्झन याचाही वध करण्याचा प्रयत्न केला होता. कर्झन हा अतिशय उर्मट व्हॉईसराय होता. तो दोनदा मदनलाल यांच्या हल्ल्यातून वाचला. मदनलाल यांनी बंगालचा माजी गव्हर्नर ब्रॅमफील्ड फुल्लर याचाही काटा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तो उपस्थित असलेल्या बैठकीला मदनलाल उशिरा पोहोचले व सगळा डावच फसला. त्यानंतर मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली याला ठार मारण्याचे ठरविले.
२९ जून १९०९ रोजी त्यांनी कर्झन वायलीच्या वधाचा कट आखला. सावरकरांची भेट घेतली त्यावेळी बिपीनचंद्र पाल उपस्थित होते. वायलीच्या वधानंतर काय सांगायचे हे सावरकरांनी मदनलाल यांना सांगितले होते. निरंजन पाल यांनी मदनलाल यांना सावरकरांनी वायलीच्या खुनानंतर करायच्या निवेदनाची एक प्रत दिली. सावरकरांनी त्याचवेळी मदनलाल यांच्या हाती बेल्जियन बनावटीचे ब्राऊनिंग पिस्तूल ठेवले व नंतर मदनलाल यांनी प्रेमाने त्यांचा निरोप घेतला. पण निघताना ते भावविवश झाले. सावरकर मात्र कणखरपणे म्हणाले, जर तू या मोहिमेत अपयशी ठरलास तर मला परत तोंड दाखवायला येऊ नकोस. मदनलाल यांनी तसे घडणार नाही असा शब्द सावरकरांना दिला. ३० जूनला मदनलाल परत सावरकरांना भेटायला गेले होते पण त्यावेळी त्यांची भेट होऊ शकली नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...