आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जून १६६४*
छत्रपती शिवरायांनी कोंढाणा (सिंहगड)
किल्ला लढवलेल्या शुर मावळ्यांचा मानसन्मान केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जून १६६५*
किल्ले पुरंदरची माची व पाच बुरुज मुघलांच्या ताब्यात गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जून १७६०*
पानिपतचा महासंग्राम
२ जून रोजी मराठे ग्वालीयरला पोहोचले. पुढे मराठे धवळपुरा, मथुरा असे अंतर पार करत, मराठे दिल्लीला पोहोचले. गारदयांच्या तोफांमूळे दिल्ली सहजरीत्या मराठ्यांच्या ताब्यात आली. दिल्ली सहज मराठयांनी जिंकल्यामुळे अब्दालीही हबकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जून १७६१*
पुरंदरच्या जानू भिंताडेंचा सत्कार
पार्वतीबाईच्या (सदाशिवभाऊंची दुसरी पत्नी) रक्षणासाठी होळकरांनी विसाजी जोगदेव याची नेमणूक केली होती. पण तो इमानाला जागला नाही. तेव्हा जानू भिंताडा याने घोड्यावर स्वत:मागे बांधून सुखरूप घेऊन आला. त्याकामी वीरसिंगराव बारावकर व पिराजी राऊत यांनी मदत केली. जानू भिंताडा याचं मूळ गाव भिवडी, तालुका पुरंदर. बाईस वाचवून आणल्याबद्दल २ जून १७६१ रोजी १००० रुपये रोख व एक गाव बक्षिस म्हणून लावून दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...