पणदरे गावच्या जगताप पाटलांचा (वाडा)
पणदरे गावच्या जगताप पाटलांचा (वाडा)
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पणदरे हे छ. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडे असणारी जहांगीर भीमथडी इंदापूरच्या प्रसिद्ध सुपा परगाणा याच सुपा परगाण्यातील एक इतिहासकालीन पणदरे गाव आणि मोठे गाव राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे गाव या गावांमध्ये जगताप पाटील आणि कोकरे पाटील दोन घराणे.
जगताप पणदरेकर हे शिवपूर्वकालीन पाटील घराणे
पणदराचे कोकरे व जगताप यांचे छत्रपती शाहू महाराज व पेशवाई निम पाटीलकी राहिली
त्यातील म्हणजे जगताप घराण्याचे ७ बेटे आहेत बेटे म्हणजे घराणी-वाड्याचा समूह त्यातील एक बेट म्हणजे आत्ताच्या घडीला जगताप वस्ती या नावाने ओळखले जाते या बेटांमध्ये पाटलांचे वाडे म्हणून ओळखले जाते.
या बेटातील असणारी जगताप कुटुंबाकडे वंशवेलेप्रमाणे जगतापांचा मुळ शिवकालीन वाडा बारामती कडून येताना गावच्याकमानीतून प्रवेश करताच १००मी.अंतरावर पहिल्या चौकात शिवकालीन वाडा लागतो या वाड्यामध्ये वंशवेलेचे मूळ पुरुष कान्होजीनंतर तीन पिढ्यानंतर दोन भाग झाले पहिला भाग या मूळ शिवकालीन वाड्यामध्ये राहिला.
तर दुसरा भागांनी भैरवनाथ मंदिरासमोर वाडे घरे बांधली. वंशवेलीत दुसऱ्या भागातील आत्ताचे रंगराव (पाटलाचा) वाडा, के.रामचंद्र(रामभाऊपाटील) के.महादेव (एम एन दादा) वाडा
तर यांच्यातीलच पांडुरंग कोंडीबा जगताप पाटील नानासो कोंडीबा जगताप पाटील पाटलांचा वाडा म्हणून असणार हा वाडा भक्कमरित्या असून इ स १८२० मध्ये वाड्याचे बांधकाम झाले.खाली दगडी बांधकाम आणी वर पेशवेकालीन चपट्या विटा वाड्याचे प्रवेशद्वार
१०-१५ फुट उंच आहेत प्रवेशद्वारावर देवड्या आहेत वर नक्षिकाम आहे आणि महाराज आहेत सागवानी खांबावर वाडा उभा आहे वाड्यात आत गेल्यावर दोन चौक आहे वाड्याच्या चौकात तुळशी वृंदावन आहे वाड्याच्या तटबंदीवर् जाण्यासाठी पायरीमार्ग् आहे. पूर्वी वाड्यामध्ये गावचे पाटीलकी असल्यामुळे वाड्याच्या दरवाजावर पाटील आहेत नाहीत असे आहे याचे कारण म्हणजे पूर्वी गावातील व्यक्ती वाड्यावर आल्यावर पाटील वाड्यात आहे का नाही हे त्या दरवाजावर असलेले पाटील आहेत नाहीत त्याच्यावरून ओळखत असे. वाड्याच्या समोर गावाचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर आहे. सध्या पांडुरंग पाटलाचे ज्येष्ठ पुत्र रामचंद्र पांडुरंग जगताप (रामभाऊपाटील) वाड्यामध्ये राहतात
या वाड्यातील पांडुरंग पाटील यांनी ३० वर्षे पोलीस पाटील की संभाळली पुढे त्यांनी चिचबन बेटातील दादासाहेब माधवराव जगताप पाटील यांना पोलीस पाटीलकी दिली त्यांनी ती पोलीस पाटीलकी ३ वर्षे सांभाळली पुढे दादासाहेब पाटील यांनी मानाप्पावस्ती बेटातील सदाशिव (पाटील) जगताप यांना पोलीस पाटील दिली त्यांनी पोलीस पाटीलकी २ वर्षे सांभाळली पुढे काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसने पोलीस पाटीलकी पद रद्द केले.तर चिचबन बेटामध्ये आत्ताचे बाळासाहेब पाटील नाना पाटील या वाड्यामध्ये गाव मुलखी पाटीलकी गेली होती.पोस्ट :- Prithviraj Mane
Comments
Post a Comment