२६ जून
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जून १६६४*
सुरतच्या इंग्रजांचे कारवारच्या इंग्रजांना पत्र.
पत्राद्वारे त्यांनी छत्रपती शिवरायांपासून सावध राहण्याचा इशारा दिला.
पत्रातील मजकूर हा मराठ्यांचा राजा शिवाजी याविषयी होता. राजांचे फारच कल्पनातीत असे वर्णन त्यात केले होते व त्या आधीच्या पाच वर्षातल्या प्रमुख घटना पाहिल्या तर ते सत्य वाटण्याइतपत स्वाभाविक होते. खरेच, इसवी सन १६५९ ते इसवी सन १६६४ या कालावधीत शिवाजी राजांनी बलाढ्य अफझलखानास मारले होते, सिद्दी जौहर च्या वेढ्यातून राजे निसटले होते, कारतलबखनास उंबरखिंडीत पराभूत केले होते, तळकोकण जिंकले होते आणि इंग्रजांवर वचक बसवला होता, शाहिस्तेखानाची महालात घुसून बोटे तोडली होती, कुडाळ मोहीम करून डच व पोर्तुगीजांवर वचक बसवला होता आणि मोगलांची सुरत 'बदसूरत' करून टाकली होती. याचाच परिपाक म्हणून सुरतकर कारवारकराना लिहीत होते ते असे "त्याचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट होतो. त्याला हर्क्युलीसचे सामर्थ्य आहे." इत्यादी...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जून १६७१*
पुणे परगण्याच्या नीरथडी तरफेतील परिंचे या गावच्या पाटिलकीविषयी शिवाजी महाराजांनी नीरथडी तरफेचा हवालदार तानाजी जनार्दन यांना पाठवलेले २६ जून १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रातही "वैकुंठवासी साहेबांचे (म्हणजे शाहजी महाराजांचे) व दादाजी पंतांचे कारकीर्दीत चालिले आहे ते करार आहे तेणेप्रमाणे चालवणे, नवा कथला करू न देणे" असे म्हटले आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जून १६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
दक्षिणेतील "तिरूवाडी" येथे छत्रपती शिवराय मुक्कामी.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जून १६८०*
२६ जून १६८० रोजी संभाजीराजांनी येसाजी कंक आणि रायगडाचे किल्लेदार चांगोजी काटकर यांच्या मदतीने रायगड आपल्या ताब्यात घेतला आणि कारभार सुरू केला.
वास्तविक पाहता शिवाजी महाराजांनी शेवटच्या क्षणी आपल्या पुत्राला क्षमाच केली होती तरीही बहुतेकांच्या मनात अजूनही संदेह होताच. रायगडावर कारभार सुरू झाल्यानंतर श्री समर्थ रामदासस्वामी यांनी शंभूराजांना त्यांच्या थोर पित्याची आठवण करून देत राज्यकारभार नेमका कसा करावा याकरिता एक विस्तृत पत्रच पाठवले. २६ जूनच्या राजापूरहून सुरतेस गेलेल्या इंग्रजी पत्रांतही छत्रपती संभाजी महाराज रायगडावर गेल्याचा निर्देश आहे [पसासं २२६५]. ऑमर्स म्हणतो की रायगडावर येत असता छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ फक्त पाच हजार घोडेस्वार होते. त्यांची व राजाराम महाराजांची गडावर भेट झाली; त्या भेटीत द्वेष नसून प्रेम होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जून १६८०*
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीचे वर्णन करणारे हे २ संदर्भ . दोन्ही पत्र टोपीकर ब्रिटिशांच्या कागदपत्रात आढळतात. पहिले पत्र (२६ जून १६८०) ब्रिटिशांच्या राजापूर वखारीतून सुरतच्या वखारीला पाठवलेले आहे तर दुसरा संदर्भ (२४ ऑगस्ट १६८०) कोलंबो मधल्या ब्रिटिशांच्या दस्तऐवजा मधील आहे.
इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पत्रातून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वभावाच्या अनेक पैलूंचे वर्णन केले आहे - हे वर्णन समकालीन असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे.
राजापूरचे सुरतेला पत्र...
बक्षिसाच्या मागणीबद्दल संभाजी राजास आम्ही पुन्हा एकदा लिहित आहोत कारण आता तो रायरीला गेल्याचे कळले आहे. आता त्याला आमच्या विनंतीकडे लक्ष देण्यासाठी थोडी उसंत मिळेल असे वाटते कारण बहुतांश राज्यावर आता त्याने अधिकार बसवला आहे. त्यामुळे तो कंपनीचे बक्षिस चालू ठेवण्याचा आदेश देईल किंवा आम्हाला काहीतरी उत्तर मिळेल असे वाटते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जून १८१८*
२६ जून १८१८ रोजी एल्फिन्स्टनने कलकत्त्याला गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलला एक खास पत्र पाठवून कोरेगावच्या युद्धात कामी आलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ कोरेगावातच स्मारक बांधायची परवानगी मागितली होती. १९ सप्टेंबर १८१८ रोजी गव्हर्नर जनरलच्या सचिवाकडून त्याला परवानगीचे पत्र पाठवण्यात आले. एल्फिन्स्टनला ह्या स्मारकाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यासाठी सांगण्यात आले. त्याला अशीही सूचना आली की ह्या स्मारकावर कोरेगावच्या लढाईत कामी आलेल्या सगळ्या सैनिकांची नावे इंग्रजीत, फारसीत, आणि मराठीत लिहिलेली असावीत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जून १८७४†
"लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांचा कागल(कोल्हापूर) येथे जन्म."
मुळ नाव - "यशवंतराव जयसिंगराव घाटगे".
१७ मार्च १८८४ रोजी त्यांना कोल्हापूर संस्थानात दत्तक घेतले आणि पुढे ते करवीर संस्थानाचे अधिपती झाले.
करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली....
महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता... ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते... म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले...
१८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते...,
‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते.... असे महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाले... अशा थोर लोकराजा राजर्षी शाहु महाराजांना जयंती निमित्त अभिवादन.... मानाचा मुजरा......
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩
Comments
Post a Comment