आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇२१जून
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जून १६६०*
चाकणच्या संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याला शाईस्तेखानाचा वेढा पडला.
अवघे मराठे झुंजले !! शिर तळहातावरती घेऊन !!!
हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. तोफा बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शाईस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली. आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते. ३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० रोजी मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली. पूर्वेच्या कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे मराठेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जून १६७४*
श्रीशिवराजभूषण काव्य पूर्ण.
इन्द्र जिमि जंभ पर, वाडव सुअंभ पर ।
रावन सदंभ पर, रघुकुल राज है ॥१॥
पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर, राम व्दिजराज है ॥२॥
दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुण्ड पर, जैसे मृगराज है ॥३॥
तेजतम अंस पर, कान्ह जिमि कंस पर ।
त्यों म्लेच्छ बंस पर, शेर सिवराज है ॥४॥
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जून १७००*
परळीपासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते. भूषणगड परळीपासून रस्त्याने ४५ मैल अंतरावर. परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात २१ जून १७०० ला कूच केले. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळवला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जून १८५८*
इंग्रजांनी झांशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या टोपे झांशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेले; परंतु ह्यू रोझ पुढे त्याचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे ते सर्व ग्वाल्हेरला गेले. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्याने यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी तात्याने लढाया जिंकल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩
Comments
Post a Comment