आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२७ जून

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ जून १६६२*
छत्रपती शिवाजी महाराजांचे बाजी सर्जेराव जेधेंना पत्र
शाहिस्तेखान स्वराज्यात येऊन 2 वर्षे झाली होती. स्वराज्यात येताच मुघल सैन्याने लुटालूट आरंभली होती. शाहिस्तेखानाने चाकण, पुणे प्रांत ताब्यात घेऊन लालमहालात तळ ठोकला होता. मोगली सैन्याने शिरवळ भागातही गुरेढोरे व धान्याची पेवे लुटून न्यायला सुरू केले होते. आक्रमक बनलेल्या मोगलांनी भोर, रोहीडा भागातही हालचाली सुरू केल्या होत्या. कान्होजी जेधेंच्या मृत्यूनंतर या भागाची देशमुखी बाजी सर्जेराव जेधे सांभाळत होते. मुघल सैन्याच्या दबावामुळे जेधेंचे सैन्य व नोकर आपला मुलुख सोडून शिवाजी महाराजांच्याकडे नोकरीसाठी जाऊ लागले. त्यामुळे बाजी जेधेनी महाराजाना पत्र पाठवून आपले लोक येतील त्यांना नोकरीवर ठेऊन घेऊ नये अशी विनंती केली होती. यावेळी महाराजांनीही बाजी जेधेंच्या पत्राला लागलीच उत्तर पाठवून दिलासा दिला होता. त्यात महाराज म्हणतात, "तुमचे लोक हुजूर येतील त्यास साहेब ठेवणार नाहीत. तुमचे तुम्हापासी फिराउनु पाठवितील." बाजी सर्जेराव जेधेना दिलासा देण्यासाठी पाठवलेल्या या पत्राची तारिख होती आषाढ वद्य ६ शके १५८४ म्हणजे शुक्रवार दि. २७ जून १६६२

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ जून १६७०*
कोकणातील रायगड जिल्ह्यातील "कुर्डूगड उर्फ मंदारगड" मराठ्यांनी जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ जून १६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
मराठ्यांनी पळवून लावलेल्या मुघल सरदार शेरखानाच्या ठिकाण्यावर छापा घालून मराठ्यांनी जड-जवाहीर, किंमती वस्तू, दागिने आदी मोठा ऐवज स्वराज्यात आणला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ जून १६८०*
छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या तृतीय पत्नी सकलसौभाग्यसंपन्न "पुतळाबाई राणीसाहेब" सती गेल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ जून १७०८*
सेनापती धनाजी जाधव यांची पुण्यतिथि (जन्म : १६५०)
शिवकाळामध्ये धनाजी जाधव यांनी सेनापती प्रतापराव गुजर आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पराक्रम केला.
यामध्ये उंबरखिंडीची लढाई (१६६१), उमराणीचे युध्द (१६७२), नेसरीचे युद्ध (१६७४), कोपल बहादुरविंडा तसेच सावनूरची लढाई अशा अनेक मोहिमांमध्ये धनजीरावांनी पराक्रमाची शर्त केली आणि स्वतःची मुद्रा (शिक्का) तयार करून शिवचरणी तत्पर 'धनजी जाधव किंकर' असा बहुमान प्राप्त केला. या मुद्रेमध्ये त्यांनी स्वतःला किंकर म्हणजेच सेवक अगर चाकर असे म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यानंतरच्या प्रतिकूल काळात स्वराज्याचे रक्षण करणारे सेनापती म्हणून धनाजी जाधव यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या सेनापतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी समकालीन संदर्भातून धनाजी जाधव यांनी अतुलनीय कामगिरी करत सेनापतीपद सांभाळले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ जून १८६३*
बायजाबाई शिंदे यांचा मृत्यू 
राणोजी शिंदे यांच्यापासून सुरु झालेली शिंदे घराण्याची पायाभरणी उत्तरोत्तर, कर्तुत्वरुपी इमारतीच्या कळसाच्या रूपानेचं उंचावत गेली. आजमितीला कण्हेर खेड इथले शिंदे मध्यप्रदेशमध्ये सिंधिया या नावानं शासन करत आहे., एकसे बढकर एक कर्तुत्ववान योध्यांची खाण असणाऱ्या शिंदे घराण्यातील स्त्रियांचे कर्तुत्व देखील वाखाणण्याजोगं होतं परंतु., काळाच्या ओघात काही इतिहासाची पानं 
निसटली किंवा काही तशीचं सोडून देण्यात आली., त्यातीलचं एक नाव म्हणजे "बायजाबाई शिंदे" दौलतराव शिंदेंची पत्नी  
बायजाबाई म्हणजे ग्वाल्हेरच्या महाराणी. त्यांचा जन्म इ.स.१७८४ मध्ये झाला. यांच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव. बायजाबाई लहानपणी फार बाळसेदार व देखण्या होत्या, त्या घोडयावर बसण्यांत पटाईत अशा निपजल्या. बायजाबाई शिंदे यांस कित्येक इतिहासकारांनी 'दक्षिणची सौंदर्यलतिका' अशी संज्ञा दिली आहे. राजस्थानांतील कृष्णकुमारी इत्यादि लोकप्रसिध्द लावण्यवतींच्या 
बायजाबाई या नेहमी लष्कराबरोबर असे, व लष्कराच्या सर्व राजकारणामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असे. 
१८५७ चे स्वातंत्र्यसमर फसले पण या बायजाबाई राणीसाहेबांचा दबदबा चोहीकडे पसरला होता. ता. २७ जून इ.स. १८६३ रोजी, ह्या राजकारस्थानी व शहाण्या स्त्री कैलासवासी झाल्या. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४