*२४ जून १६७०*बारा मावळाची सुरुवात जिथून होते त्या रोहिडे खोर्‍यातील "रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड" मराठ्यांनी जिंकला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ जून १५६४*
गोंडवानाची महाराणी राणी दुर्गावतीचे बलिदान
मोगल सम्राट अकबर संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता वाढवू पाहत होता. त्यावेळच्या सर्व राजा-महाराजांना त्याने, एकतर मोगल साम्राज्याचे सेवक व्हा किंवा युद्धाला तयार रहा असा प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये बरेच राजपूत मोगलांचा हा प्रस्ताव स्वीकारून मोगलांचे  मांडलिकत्व पत्करले होते.
या प्रस्तावाला धुडकावून लावणारी मंडळी सुद्धा होती ज्यामध्ये आपणास महाराणा प्रताप ये नाव माहीतच आहे. परंतु या मध्ये एक महाराणी होती जिने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि मोगलांशी लढली.
या राणीचे नाव आहे "महाराणी दुर्गावती" !!
१५४२ साली तिचे लग्न दलपत शाहशी झाला. दलपत शाह गोंड (गढ़मंडला) राजा संग्राम शाह यांचे ज्येष्ठ पुत्र होते. लग्ना नंतर फक्त चार वर्षातच दलपत शाह मरण पावला आणि राज्यकारभार दुर्गावती राणीकडे आला. 
ती गोंड (गोंडवाना) राज्याची पहिली राणी झाली, अकबराच्या दबावाला बळी न पडता तीने लढा दिला आणि त्यात तीने स्वतचा जीव दिला.
गोंडवाना राज्यावर मोगल सम्राट अकरबरा शिवाय बाज बहाद्दरने सुद्धा अनेकवेळा आक्रमण केले होते परंतु त्याला नेहमी अपयश आले. गोंडवाना राज्यामध्ये धन संपत्तींची कमी नव्हती त्यामुळे यावर अकबर बादशहाचा डोळा होता. त्यामध्ये एका राणीने प्रस्ताव धुडकावून लावल्याने अकबर जास्तच चिडला होता आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत हे राज्य संपवायचे होते. 
२३ जून १५६४ साली मोगलांनी सेनापती आसफखांच्या (मूळ नाव सुभेदार ख्वाजा अब्दुल मजीद खां)  नेतृत्वाखाली गोंड राज्यावर मोहीम काढली ( या अगोदर १५६२ रोजी सुद्धा आसफखांने गोंडवर आक्रमण केले होते परंतु राणीने त्याला पराजित केले होते. या युद्धामध्ये मोगलांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि एका स्त्री कडून पराजय होणे हे आसफखांला खूप टोचले होते)  जबलपूरच्या आसपास मोठे युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचे जवळपास तीन हजाराहून जास्त सैन्य मारले गेले. राणीचेही मोठे नुकसान झाले. 
दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ जून १५६४ रोजी पुन्हा मोगलांनी हल्ला चढवला परंतु यावेळी गोंडच्या सैन्याची वाताहात झाली, प्रचंड सैन्य मारले गेले. राणीला सुद्धा एक खांद्यावर आणि दुसरा डोळ्यावर असे दोन बाण लागले होते. अतिशय गंभीर जखमी अवस्थेत सुद्धा ती लढत होती पण ज्यावेळी लढणे असह्य झाले त्यावेळी तिने तिचा सेनापती आधार सिंह याला हुकूम दिला की "मला मोगलांचा गुलाम बनायचं नाही, तू माझे डोके उडव आणि मला मारून टाक".... पण हा राणीचा हुकूम आधार सिंहने मानला नाही, हे त्याच्यासाठी अशक्य होते. 
शेवटी राणीने स्वतःजवळची कट्यार स्वताच्या छातीत खुपसून घेवून स्वतःचा जीव दिला
हे एक भयंकर युद्ध होते. एक स्त्री मोगलांशी एवढ्या जोमाने लढत आहे याचे आश्चर्य खुद्द बादशहा अकबराला सुद्धा झाले होते. परंतु सैन्य संख्या मोगलांच्या तुलनेत फारच कमी असल्याने तिचा मोगलांच्या सैन्यापुढे टिकाव लागला नाही. 
अशा या महान लढवय्या महाराणीला विनम्र अभिवादन 🙏

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ जून १६७०*
बारा मावळाची सुरुवात जिथून होते त्या रोहिडे खोर्‍यातील "रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड" मराठ्यांनी जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...