परमेश्वराची भक्ती का करावी?* 😊


🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂
😊 *परमेश्वराची भक्ती का करावी?* 😊
🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂
                                 
💫💫💫🏀🏀🏀✨✨✨                                                                                                                                                                                                                                                                                              

🚩 या जगात दोन प्रकारची माणसं आहेत. एक म्हणजे या चराचर सृष्टीच्या निर्मात्याला मानणारी अशी आस्तिक आणि दुसरी म्हणजे त्याच्या अस्तित्वाविषयी शंका घेणारी, किंवा त्याच्यावर विश्वास नसणारी अशी नास्तिक. हे दोन्ही प्रकार जगातल्या सर्व जातीधर्मात आढळतात. प्रस्तुत लेखात आपण फक्त आस्तिकांविषयी बोलणार आहोत. विशेषतः आस्तिक देवाला किंवा परमेश्वराला का मानतात याऐवजी आपण त्यांनी त्याला का मानावं, त्याची भक्ती का करावी याबद्दल मी माझं मत मांडणार आहे.

🚩 आस्तिक मानतात की ह्या सर्व सृष्टीवर परमेश्वराची सत्ता चालते. त्याच्या मर्जी किंवा इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. पंचमहाभूते त्याला वश आहेत. मग आपल्यासारख्या क्षुद्र माणसाची काय कथा?

🚩 पण त्याचबरोबर एक मतप्रवाह असाही आहे की, प्रत्येकाचं नशीब हे ठरलेलं आहे, आणि ब्रम्हदेवही त्यात काही बदल करू शकत नाही. मग त्याची भक्ती कशाला करायची? एका दृष्टिकोनातून बघता हे म्हणणं काही अंशी खरं आहे. 

🚩 आता आपल्यासमोर दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ह्या जगाचा जो कोणी निर्माता किंवा परमेश्वर आहे, त्याच्या मर्जीनुसार सगळं घडतं आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाचं नशीब ठरलेलं आहे. मग असं असताना त्या विश्वनियंत्या परमेश्वराची भक्ती किंवा पूजा आपण का करायची? जे विधिलिखित  ठरलेलं आहे, तसच जर घडणार असेल तर, त्या देवांची ही इतकी देवळं माणसाने कशासाठी बांधली? 

🚩 तर माझ्या मते याची दोन उत्तरं आहेत. पहिलं म्हणजे परमेश्वराची भक्ती केल्याने, विधिलिखित जरी टाळता येणार नसेल तरी त्याची तीव्रता किंवा त्याचे परिणाम कमी जास्त होऊ शकतात. म्हणजे आनंदाची घटना घडणार असेल तर ती तुमच्या मनासारखी घडेल आणि जर दुःखाची घटना घडणार असेल तर ती कमी घडेल.

🚩 दुसरी गोष्ट म्हणजे देवाची भक्ती किंवा प्रार्थना केली तर आनंदाच्या किंवा यशाच्या प्रसंगी आपले पाय जमिनीवर रहातील आणि दुःखाच्या प्रसंगी त्या घटनेला सामोरं जाण्याचं धैर्य आपल्या अंगी येईल.

🚩 हे मी तुम्हाला काही उदाहरणे देऊन पटवून देतो. जर समजा तुमच्या गाडीला, किंवा वाहनाला काही अपघात होणार असेल, तर तो टळणार नाही. कारण ते विधिलिखित आहे. पण त्या अपघातात तुम्हाला जास्त दुखापत होणार नाही, किंवा झालीच तर तुम्हाला ताबडतोब कुणाची तरी मदत मिळेल आणि तुम्ही त्यातून लवकर बरे व्हाल. 

🚩 तुमच्या घरी चोरी होणार असेल तर ती टळणार नाही. पण त्यात तुमचं जास्त नुकसान होणार नाही. ती चोरी पकडली जाईल आणि तुम्हाला तुमचा मुद्देमाल थोड्या दिवसांनी परत मिळेल. 

🚩 एखाद्या परीक्षेत कोणी नापास होणार असेल तर ते टळणार नाही. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याला / तिला चांगलं यश मिळेल. 

🚩 तुमची नोकरी जाणार असेल तर ती जाईलच. पण थोड्या दिवसात तुम्हाला दुसरी चांगली नोकरी मिळेल. किंवा एखादा उद्योगधंदा करण्याचं सुचेल, आणि त्यात तुमचा चांगला जम बसेल. 

🚩 अशी अनेक उदा. देता येतील. अश्या प्रकारच्या प्रसंगात, जर तुमची देवावर श्रद्धा असेल, तर तुम्ही आशावादी राहाल. निराशेने ग्रासून तुमच्याकडून एखादं चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही. तुम्ही मानसिक दृष्ट्या खंबीर राहाल आणि लवकर सावरले जाल. 

🚩 मी वर उल्लेख केलेल्या उदा. पैकी एखाद दुसरी घटना तुमच्याही आयुष्यात घडली असेल. ती आठवून तुम्ही यावर विचार केलात, तर तुम्हाला माझं म्हणणं नक्कीच पटेल.

🚩 ही सगळी उदा. वाईट प्रसंगाची झाली. आता आनंदी प्रसंगाचे उदा. द्यायचे झाले तर, एखाद्या परीक्षेत तुम्ही उत्तम गुणांनी पास झालात तरीही त्याची हवा तुमच्या डोक्यात जाणार नाही. त्या गुणामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. किंवा आणखी पुढे शिकण्याची संधी मिळेल. 

🚩 तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर इतरांना मदत करण्याची तुम्हाला इच्छा होईल. त्याचे मार्ग सापडतील. आणि त्यात तुम्हाला समाधान मिळेल.

🚩 असं म्हणतात की संकटं ही एकेकटी येत नाही, आली की त्यांची मालिकाच सुरु होते. तसच सुखाचं. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस आलटून पालटून येतच असतात. कारण परिवर्तन हा जगाचा नियम आहे. आणि तो प्रत्येक गोष्टीला लागू पडतो. 

🚩 परमेश्वराची भक्ती करण्याने नुकसान काहीच होत नाही. वाईट घडणार असेल तर ते टळणार नाही, पण त्याची तीव्रता कमी असेल, त्यातून तुम्ही लवकर बाहेर याल आणि चांगलं घडलं तर त्याचा आनंद इतरांना बरोबर घेऊन साजरा करण्याची तुम्हाला बुद्धी होईल. तुमचं अधिक भलं होईल. 

🚩 थोर बंगाली साहित्यकार रवींद्रनाथ टागोर हे एका कवितेत म्हणतात, "हे परमेश्वरा, तू माझ्यावर संकटं आणू नकोस किंवा त्यातून माझं रक्षण कर असं माझं अजिबात मागणं नाही. तू फक्त मला त्या संकटांची भीती वाटू देऊ नकोस. त्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती दे."

🚩 म्हणूनच ह्या सर्व शक्तिमान परमेश्वराची भक्ती करणं कधीही सोडू नका. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. संत, महात्मे नाही. आपली काही नित्यकर्म आहेत, संसाराची जबाबदारी आहे. ते सर्व सोडून आपण परमेश्वराची भक्ती करु शकत नाही हे मान्य. तरीही त्यात जमेल तेवढं सातत्य राखा. तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या भक्तीचा टाळ सतत वाजता ठेवा. आणि त्याच्यावरील श्रद्धेच्या निरांजनाची ज्योत सतत तुमच्या हृदयात तेवती ठेवा.  मग तो तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही.

  

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...