२२ जून १६७०*मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.माहुलीवरील यशस्वी प्रयत्नानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्नाळ्याला गेले. दलदल व दाट जंगलाने वेढलेला हा किल्ला जिंकण्यास अवघड होता.
२२ जून १६७०*
मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.
माहुलीवरील यशस्वी प्रयत्नानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्नाळ्याला गेले. दलदल व दाट जंगलाने वेढलेला हा किल्ला जिंकण्यास अवघड होता. मराठ्यांनी लाकडी फळ्या वापरुन बचावाची तयारी केली. अशा रीतीने फळ्यांचा वापर करुन ते तटापर्यंत गेले व दोरी लावून आत प्रवेश केला. आतल्या सैन्याने चटकन हत्यारे टाकली व कर्नाळा किल्ला घेतला शिवाय पावसाळ्यापूर्वी कल्याण प्रांत ही काबीज केला.
Comments
Post a Comment