श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी येथील समाधी बद्दल आज्ञापत्र*

*श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी येथील समाधी बद्दल आज्ञापत्र*
"स्वस्तिश्री राज्याभिषेक शक 18 प्रजापती नाम संवत्सरे, भाद्रपद शुद्ध तृतीया, रवीवासरे, क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती यांनी, राजश्री बयाजी नारायण देशाधिकारी व लेखक प्रांत जुन्नर यांसी आज्ञा केली ऐसी जे:--- श्री ज्ञानेश्वर स्वामींची समाधी मौजे आळंदी, परगणे चाकण प्रांत मजकूर येथे आहे. या समाधी स्थळी पूजा पुनस्कार चालीला पाहिजे म्हणून, कैलासवासी महाराज व कैलासवासी मातोश्री जिजाऊ व कैलासवासी राजेसाहेब यात्रीवर्गाने आपलाले वेळेस नियत करून दिली. तेने प्रमाणे श्री स्वामींची पूजा सांग चालत आली. त्या उपरी तांब्राचे अवांतारा करिता भोगवटा तुटला आहे एसियासी पूर्वील मोईन प्रमाणे चालवावे व स्वामींनी आपलियाकडूनही विशेष * * स मोईन करून देऊन, येथासांग पूजा पुरस्कार चालावया(स) स्वामींनी आज्ञापत्र करून देवीले पाहिजे. म्हणून मोरो भास्कर कुलकर्णी, मौजे मजकूर यांनी चंदीचे मुक्कामी स्वामी सन्निध येऊन विनंती केली. त्यावरून मनात आणीता, श्री स्वामींचे सिद्धस्थान; या स्थळी बहुत साक्षात्कार आहे; तेथे पूजा पुनस्कार यथासांग चालले पाहिजेत. यानिमित्त पूर्वी कैलासवासी त्रिवर्ग साहेब पूजेस नियत करून दिधली आहे. तेणे प्रमाणे चालवावे. या वेगळे स्वामींनी आपल्याकडून मोईन पूजेस करून दिली आहे. पूर्वील हल्ली एकून मोईन बीतपशील:---
एकूण मोइन दररोजिना केली कोठी मापे एक पायली व वजनी टकबंदी साडेचार  शेर व नक्त रुके २४   सणगे, व आषाढी कार्तिकीस क्षिरब्दिस डाळ चानियाची केली कोटी मापे एक खंडी व गूळ वजन चार मन, येणेप्रमाणे पूजेस मोइन करून देऊन, मौजे आळंदी, परगणे चाकण, प्रांत मजकूर पैकी देवीले असे. इस्तकबिल सनद पैवस्ती पासून सदरहु मोईन प्रमाणे यथासांग पूजा पुनस्कार चालवणे. वर्ष प्रतीवर्षी नूतन पत्राची अपेक्षा न करणे. या पत्राच्या प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र सालाबाद ज्यापाशी द्यावयाचे असेल त्याजपाशी परतोन देणे जाणिजे निर्देश समक्ष."
 तेरीख १ जिल्हेज, सुरूसन इसन्ने.
**************** लेख व माहिती संकलन
योगेश चव्हाण( मोडी लिपी अभ्यासक) 
--------------------------------
सदर पत्र हे छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वतः जिंजी मुक्काम दिले आहे कारण यावेळी औरंगजेब महाराष्ट्रात असुन तमाम हिंदू धर्मस्थळे उध्वस्त करण्यासाठी व पूजा अर्चा बंद करण्यात आले होत्या तेव्हा मोरो भास्कर कुलकर्णी हे आळंदी येथील असून त्यांनी चंदी येथे जाऊन छत्रपती राजाराम महाराजांच्या कडे तक्रार केला की  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर पूजा अर्चा बंद करण्यात आले तेव्हा सदर समाधीवर छत्रपती राजश्री सरलष्कर शहाजीराजे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांनी छत्रपती घराण्याकडून नित्यक्रम पुजा व प्रसाद यासाठी वर्षासन होते ते पुन्हा देण्यात यावे म्हणून विनंती केला. 
तेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांनी सदर वर्षासन सुरू करून छत्रपती घराण्याची संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर वरील नित्यपूजा पुन्हा सुरू करण्यात आले सदर समाधीवर छत्रपती घराण्यातील श्रध्दा व भक्ती दिसून येते. तसेच सदर पत्रात छत्रपती राजाराम महाराज यांच्या उल्लेख क्षत्रिय कुलंवतस असे आहे यामुळे सदर पत्र महत्त्वाचे आहे. 
ज्यांना ज्यांना औरंगजेब यांचे उदोउदो करण्यात मोठेपण वाटते त्या सर्वाच्या कानाखाली........ चपराक आहे हे पत्र कारण प्रत्यक्ष हिंदुच्या देव व श्रध्दास्थान औरंगजेब यांनी जो अतिक्रमण केले यांचे पुरावा म्हणजे हे पत्र आहे
तसेच राजश्री सरलष्कर शहाजीराजे महाराज व जिजाऊ साहेब यांची कार्यकाळ हे सन १६२० नंतर सुरू होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरच्या पासून भोसले घराणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर सेवाकार्य करताना दिसत . छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती थोरले शाहू महाराजांनी अनेक वर्षे कायमस्वरूपी वर्षासन सुरू ठेवले यावर त्याच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई साहेब यांनी वर्षासन ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर सुरू ठेवले होते याबद्दल उल्लेख छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या दप्तर मधील अनेक पत्रात दिसून येते 
आपले संतोष झिपरे
(अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष)

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...