कै.गणपतराव देशमुख (आबा)राजकारनातील भीष्म म्हूणन त्याना सबोधलं जात.सलग ११ वेळा सांगोला मतदार संघाचे आमदार स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन"🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
भाई गणपतराव देशमुख (आबा) १० ऑगस्ट १९२७ रोजी पिंपरी तालुका मोहोळ येथे जन्म झाला. बी.ए. एल एल. बी. चे शिक्षण घेतलेल्या गणपतरावांनी सांगोला कोर्टात वकिलीला सुरूवात केली. १९६२ सालच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली आणि तेंव्हापासून सलग ११ वेळा सांगोला मतदार संघाचे नेतृत्व केले. १९७८ ते १९८० या काळात पुलोद सरकारमध्ये कृषी व ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री तर अघाडी सरकारच्या काळात सन १९९९ ते २००२ वन व रोजगार हमी मंत्री म्हणून मंत्रीपदे भूषविली पण अखेरपर्यंत ते शेकाप पक्षातच राहिले. असा हा गिनीज बुक मध्ये नोंद झालेला एकमेव आमदार गणपतराव देशमुखांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. "भाई गणपतराव देशमुख (बी.ए. एल एल. बी.) यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन" 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐