आम्ही वीर झुंझार । करू जमदाढे मार । थापटिले भार । मोड झाला दोषांचा ।।१।।जाला हाहाकार । आले अंकित झुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठी हार तुळसीचे ।।२।।रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाण । गरूडटके पताका ।।३।।तुका म्हणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हां आमुचा ।।४।।
आम्ही वीर झुंझार । करू जमदाढे मार ।
थापटिले भार । मोड झाला दोषांचा ।।१।।
जाला हाहाकार । आले अंकित झुंझार ।
शंखचक्रांचे शृंगार । कंठी हार तुळसीचे ।।२।।
रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन ।
झळकती निशाण । गरूडटके पताका ।।३।।
तुका म्हणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ ।
पावला सकळ । भोग आम्हां आमुचा ।।४।।
अर्थ -
आम्ही वैष्णव अत्यंत झुंजार असे वीर आहोत. आम्ही यमाशी झुंज घेऊन त्याचे दात पाडू. आम्ही दोषांचे (पापांचे) समूदाय झोडपून काढले आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे. ।।१।।
पापाचा पराभव झाल्याने सगळीकडे एकच हाहाकार उडाला आहे. शंखचक्रांचे शृंगार आणि गळ्यात तुळशीमाळा धारण केलेले सगळे लढवय्ये वीर येथे (पंढरपूरात) एकत्र जमले आहेत. ।।२।।
ह्या सर्व वीरांनी हातात रामनामाचे बाण धारण केले आहेत, कपाळी गोपीचंदन लावला आहे तसेच त्यांच्या हातात गरूडाचे चिन्ह असलेल्या पताका झळकत आहेत. ।।३।।
तुकोबा म्हणतात, आम्ही काळाला जिंकून आता निश्चल झालो आहोत. त्यामुळे आम्हाला आत्मानंदाचे सर्व ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. ।।४।।
।राम कृष्ण हरी।
#तुका_म्हणे
#वारकरी_संप्रदाय
Comments
Post a Comment