महाबळेश्‍वर येथील दुर्लक्षित राहिलेले श्रीकृष्णामाईचे देवालय

महाबळेश्‍वर येथील दुर्लक्षित राहिलेले श्रीकृष्णामाईचे देवालय
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण, तसेच पर्यटनस्थळ आहे. तेथील जुने महाबळेश्‍वर हे क्षेत्र महाबळेश्‍वर या नावानेही ओळखले जाते. क्षेत्र महाबळेश्‍वर येथे अति प्राचीन असे श्री महाबळेश्‍वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. महाबळेश्‍वराला पर्यटनासाठी येणारा प्रत्येक हिंदू श्री महाबळेश्‍वर, श्री पंचगंगा देवालयाला भेट देतात; परंतु श्री महाबळेश्‍वर देवालयाच्या मागच्या भागात असलेल्या श्रीकृष्णामाईच्या देवालयात मात्र अल्प प्रमाणात भाविक /पर्यटक जातात. तेथे काही अंतर पायी गेल्यावर पोहोचता येते. कामानिमित्ताने महाबळेश्‍वर येथे जाण्याचा योग आला असता श्री कृष्णामाईच्या दर्शनास गेल्यावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

देवालयाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

१. श्री कृष्णामाईचे देवालय म्हणजे कृष्णानदीचे उगमस्थान आहे. हे देवालय पवित्र आणि चैतन्यमय असून ते एकप्रकारे जागृत तीर्थस्थानही आहे. जवळजवळ पाच सहस्र वर्षांपूर्वी पांडवांनी या देवालयाची निर्मिती केली आहे. संपूर्ण देवालय दगडांपासून निर्मित केलेले आहे.

२. तेथील गर्भगृहात भव्य शिवलिंग आहे. त्याच्या खालून पाण्याची सतत धार चालू असते. येथूनच कृष्णेचा उगम झाला आहे.

३. या ठिकाणी नामजप अथवा ध्यान करणार्‍या साधकाला येथील चैतन्याची अनुभूती सहजपणे येते. मोठ्याने ॐकाराचा जप केल्यास त्याची कंपने सहजतेने अनुभवायला येतात.

४. गर्भगृहासमोर एक कुंड आहे. त्या कुंडात गोमुखातून अखंडितपणे पाण्याची धार वाहत असते. तीच पुढे नदीरूपाने वाहत जाते. गोमुखातून वाहणारे हे पाणी म्हणजे चैतन्यमय तीर्थ आहे.

५. या देवालयासमोर मनमोहक असा नैसर्गिक देखावा आहे.

हे देवालय सद्यस्थितीत भारतीय पुरातत्व खात्याने अधिग्रहित केलेले आहे, तसेच पुरातत्व खात्याद्वारे हे अत्यंत दुर्लक्षित झाले आहे, असे लक्षात येते. या देवालयाच्या मागच्या बाजूने कळस आणि भिंतीच्या भागाची पडझड झालेली असून येथे कुठलीही सुधारणा वा दुरुस्ती केलेली आढळून येत नाही.🛕🛕🛕🛕

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४