आषाढी एकादशी व कथा

आषाढी एकादशी 

फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी, प्रजेची काळजी घेणारा होता. सुख समृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली. परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले. त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. राजाने हे व्रत मनोभावे केले. त्यायोगे वरुणराजाने कृपा केली. योग्यवेळी हवी तशीच पर्जन्यवृष्टी झाली. मांधात्याच्या राज्याला पुन्हा सुख समृद्धीचे, आनंदाचे दिवस प्राप्त झाले.

मांधाता राजावर जशी कृपादृष्टी झाली, तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आनंदाने, समाधानाने न्हाऊन टाकावे अशी प्रार्थना करूया. 

प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात. अधिक मास असल्यास त्या दोन एकादशी जास्त असतात. पण त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी व त्यापेक्षा आषाढी एकादशीचे महत्व अधिक मानण्यात येते. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे नामस्मरण करून आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...