आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*८ जुलै १४९७*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जुलै १४९७*
१४८४ साली पोर्तुगालचा राजा जॉन याला भारताबद्दल माहिती (विशेषत: त्यातील संपत्ती विषयी) कळाल्यावर या देशाचा शोध घेण्यासाठी त्याने तीन जहाजे तयार करायची आज्ञा दिली. दुर्दैवाने ती तयार व्हायच्या आतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नंतर गादीवर आलेल्या डॉम मॅन्युएलने वास्को-द-गामाच्या व त्याचा भाऊ पाउलो यांच्या नेतृत्वाखाली ही तीन जहाजे ८ जूलै १४९७ या दिवशी रवाना केली.
जात्याच दर्यावर्दी असणार्‍या या खलाशांनी केप ऑफ गूड होपला वळसा घातला व ते २६ ऑगस्ट १४९८ ला कालिकतच्या जवळ पोहोचले. या भेटीदरम्यान त्यांना भारतात शिरकाव करता आला नाही. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जुलै १६६१*
छत्रपती शिवरायांनी व्याघ्रगड (वासोटा किल्ला), सोनगड जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जुलै १७५१*
मारवाडचा (जोधपूर) राणा अभयसिंग दिनांक २१ जून १७४९ रोजी वारला. आणि त्याचा मुलगा रामसिंग गादीवर बसला. पण अभयसिंगाचा भाऊ बख्तसिंग याने बादशाही फौजेचे साहाय्य मिळवून रामसिंगास घालवून दिले आणि दिनांक ८ जुलै १७५१ रोजी जोधपूरचे राज्य मिळविले. तेव्हां रामसिंग स्वसंरक्षणार्थ जयपुरास पळाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८  जुलै १७८९*
जेम्स कनिंगहॅम ग्रॅन्ट डफ हे मराठ्यांचे आद्य इतिहासकार म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा जन्मदिवस.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जुलै १८०४*
भारत देशाच्या लढ्यात असे कितीतरी क्रांतिकारी होऊन गेले. त्यांनी देशाची सेवा केली. या इंग्रजांच्या क्रूर शासनातून स्वराज्याला मुक्त करण्यासाठी आपले प्राण पणाला लावले. यशवंतराव होळकर हे अशा शूर योद्ध्याचे नाव आहे.  यशवंतराव होळकर यांचा जन्म १७७६ साली ईंदोर (मध्यप्रदेश) येथे झाला. त्यांच्या पित्याचे नाव तुकोजीराव होळकर होते. त्यावेळी होळकरांचा मध्यप्रदेश येथील  स्वराज्यावर खूप प्रभाव होता. त्यांचे कर्तृत्व व समृद्धी काही लोकांच्या डोळ्यात खुपत होती. म्हणून यशवंतरावांच्या मोठ्या भावाला म्हणजेच मल्हारराव होळकर यांच्या हत्येचा कट रचून त्यांना ठार केले. यशवंतरावांच्या जीवनात संकटाची काही कमी नव्हती. जुन्या मतभेदापायी  ऐन वेळी सहकार्यांनी त्यांची  साथ सोडली. यशवंतराव एकटेच राहिले.
अखेर त्यांनी स्वतःच इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानभर आपल्या कवा यती  फौजांचा  टेंभा मिरवणाऱ्या इंग्रजांचा नक्षा फक्त यशवंतरावांनीच उतरवला होता. अखेरपर्यंत इंग्रजांची तैनाती फौज न स्विकारणारे फक्त यशवंतरावच होते. मराठेशाहीच्या अखेरच्या काळात आपले स्वातंत्र्य मरेपर्यंत आबादित राखणारे ते एक पुरुषोत्तम होते. इंग्रजांना ते किती सलत होते हे कल्पनेनेही समजण्यासारखे आहे.यशवंतरावांची बदनामी करण्याची एकही संधी इंग्रजांनी सोडली नाही. त्यांच्या चारित्र्यावर वाटेल ते शिंतोडे त्यांनी उठवले उडवले होते.तरी कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्यांनी इंग्रजांना  हद्दपार करण्याचा जणू विडाच उचलला होता. ८ जुन १८०४ रोजी त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी सैन्याला पराभूत केले व ८ जुलै १८०४ साली त्यांनी इंग्रजांना आपल्या राज्यातून हद्दपार केले.

🏇🚩🏇🚩🏇🏇🚩🏇

*८ जुलै १८१२*
जहागिरदारांशी कोणताही करार परभारे करण्यास इंग्रज सरकार मुखत्यार आहे. हा मसुदा घेऊन एल्फिन्स्टन बाजीरावास (दुसरे) आषाढ मासी पंढरपुरास भेटला. बरोबर पटवर्धन आदि जहागिरदार मंडळी होती. पंढरपूर क्षेत्री वरील करार एल्फिन्स्टनने बाजीरावाकडून पुरा करून घेतला. ( ८ जुलै १८१२) ह्या करारानंतर दक्षिण सरदारांनी जो पेशव्यांचा मुलूख बळकावला होता तो त्यांस परत देण्यास इंग्रजांनी भाग पाडले. बाजीरावास मात्र आपली दक्षिण जहागिरदारांवरील सत्ता इंग्रजानी काढून घेतली यामुळे इंग्रजाबद्दल द्वेष वाटू लागला आणि आपले बळ वाढवण्याच्या मागे तो लागला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जुलै १९१०*
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मार्सेलिस बंदरातुन आजच्याच दिवशी म्हणजे ८ जुलै रोजी पलायन करण्याचा प्रयत्न केला होता ज्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.

🏇🚩🏇🚩🏇🏇🚩🏇

*८ जुलै १९४५*
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट,"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४