रसिकांच्या सिंहासनावरचे अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच निळू फुले याचा आज स्मृती दिवस त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन❤️🙏




 4 एप्रिल 1930 रोजी निळू फुले यांचा जन्म. नीलकंठ कृष्णाजी फुले  हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभिनेते होते. कथा अकलेच्या कांद्याची नाट्य प्रयोगापासून त्यांनी नाट्य क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. कलाक्षेत्र बरोबरच त्यांनी सामाजिक  छत्रपती सुद्धा काम केले ते दिसते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्यांचे योगदान एकदम महत्वाच आहे.

 निळू फुले यांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्याच्या वडिलांना लोखंड व भाजी विकून मिळणाऱ्या रकमेमधून अतिशय हलकी चे जीवनामध्ये निर्वाह करत होते. निळू फुले यांना त्यांनी मॅट्रिक पर्यंत शिक्षण दिल. पुढे निळू भाऊची कारकीर्द चालू झाली. मॅट्रिक झाल्यानंतर  येड्या गबाळयाचे काम नाही हा वग लिहिला.आणि त्याची येथूनच नाट्य क्षेत्रामध्ये सुरुवात झाली. यानंतर पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या रंगो ची भूमिका त्यांना मिळाली . मात्र कथा आपली च्या कांद्याची या नाट्य अभिनयातूनच त्यांनी महाराष्ट्रभर ओळख मिळाली.
 पुढे सिनेमा व नाटकं मध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. नायक व खलनायक अशा दोन्ही भूमिकांमध्ये करत असताना ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण त्यांचे अतिशय अचूक होते.निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला.
नाट्य रसिक आणि सिने प्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळू भाऊ समाजवादी विचारधारेशी जोडलेले होते. निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केलेली आहे. ते समाजवादी विचारवंत नेते डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होते. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह, आंदोलनात सक्रीय सहभाग दिला आहे. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्या नंतरही पिढी घडविणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाचे सदस्य राहिलेले निळू फुले यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील कला पथकाचे नेतृत्व केले .

गाजलेली लोकनाट्ये
संपादन करा
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.

गाजलेले मराठी चित्रपट
संपादन करा
अजब तुझे सरकार

आई (नवीन)

आई उदे गं अंबाबाई

आघात

आयत्या बिळावर नागोबा

एक गाव बारा भानगडी

एक रात्र मंतरलेली

एक होता विदुषक

कडकलक्ष्मी

कळत नकळत

गणानं घुंगरू हरवलं

गल्ली ते दिल्ली

चटक चांदणी

चांडाळ चौकडी

चोरीचा मामला

जगावेगळी प्रेमकहाणी

जन्मठेप

जिद्द

जैत रे जैत

दिसतं तसं नसतं

दीड शहाणे

धरतीची लेकरं

नणंद भावजय

नाव मोठं लक्षण खोटं

पटली रे पटली

पदराच्या सावलीत

पायगुण

पिंजरा

पुत्रवती

पैज

पैजेचा विडा

प्रतिकार

फटाकडी

बन्याबापू

बायको असावी अशी

बिन कामाचा नवरा

भन्नाट भानू

भालू

भिंगरी

भुजंग

मानसा परीस मेंढरं बरी

मालमसाला

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी

राघुमैना

राणीने डाव जिंकला

रानपाखरं

रावसाहेब

रिक्षावाली

लाखात अशी देखणी

लाथ मारीन तिथं पाणी

वरात

वरात

शापित

सतीची पुण्याई

सर्वसाक्षी

सवत

सहकारसम्राट

सामना

सासुरवाशीण

सोबती

सोयरीक

सिंहासन

सेनानी साने गुरुजी

सोंगाड्या

हर्या नाऱ्या जिंदाबाद

हळदी कुंकू

हीच खरी दौलत

थापाड्या .

गाजलेले हिंदी चित्रपट
संपादन करा
कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के

गाजलेली नाटक

जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.

  • महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे - 1972,73,74 मध्ये पुरस्कार मिळाले आहेत.
  • राष्ट्रपतींच्या हस्ते     साहित्यसंगीत अकादमीचा  पुरस्कार (१९९१)
  • 'सूर्यास्त' या नाटकाकरिता   नाट्यदर्पण  हा पुरस्कार
  • जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार (२००८)
लेखन माहिती संकलन
नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४