सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, ता.खटाव येथील, अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिहार येथे वास्तव्यास आहे. दरम्यान शनिवारी मध्यरात्री २ वाजता त्यांच्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चार लोक मोठ्याप्रमाणात भाजले.आणि

सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, ता.खटाव येथील, अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिहार येथे वास्तव्यास आहे.


शनिवारी मध्यरात्री २ वाजता त्यांच्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चार लोक मोठ्याप्रमाणात भाजले. त्यांना तात्काळ पाटणा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि एअर अँब्युलन्स (Air Ambulance) मिळवी यासाठी प्रयत्न सुरू केले.

त्यावेळी एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांचे मार्फत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ, शासकीय एअर अँब्युलन्स मिळण्यासाठी विनंती केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय एअर अँब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही.

ताबडतोब मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वखर्चातून २ Air Ambulance बुक केल्या आणि त्या कुटुंबाला दिवस उजाडण्याचा आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यास दिले. दिवस उजेडण्याच्या सुमारास पाहिले विमान दाखल झाले. जखमीपैकी ११ वर्षाच्या मुलास घेऊन आज सकाळी ६ वाजता विशेष विमान (Air ambulance) पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमी पैकी दुसऱ्या १२ वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान (Air Ambulabce) सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना, शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून, येथे जखमींवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यामुळे वेळेवर मदत मिळाल्याने रुग्णाचे नातेवाईक विमानतळावर अश्रू ढाळत होते. आमच्याकडे शब्द नाहीत, माणसांत देव असतो, हे आज आम्हाला समजल्याची भावना जखमींच्या कुटुंबियांकडून व्यक्त केली जात आहे.





Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...