१९ जुलै १७४५*शिंदे घराण्यांचे संस्थापक राणोजी शिंदेची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
१९ जुलै १७४५*
शिंदे घराण्यांचे संस्थापक राणोजी शिंदेची पुण्यतिथी 19जुलै 1745 मराठेशाहीच्या इतिहासात शिंदे घराणे पराक्रमी व एकनिष्ठ म्हणून प्रसिद्ध .
साता-याजवळ २० कि.मी. अंतरावरचे कोरेगाव तालुक्यातील कण्हेर - खेड हे शिंदे पाटलांचे मूळ गाव आहे.
याच घराण्यातील राणोजी शिंदे हे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पदरी नोकरी करीत लागले .
पुढे रानोजीं याचा उत्कर्ष हा थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला.
जुने जाणते लोक आपल्या गणितात बसणार नाही. त्यामुळे आपल्या बरोबर तरुण कर्तबगार शूर लोकांचा भरणा असावा. हा बाजीरावांचा विचार होता. त्यामुळे अगदी सामान्य कुटुंबातील शिंदे व होळकर यांना बाजीरावांनी आपल्या बरोबर घेतले.
बाजीरावांची निवड सार्थ ठरवून शिंदे व होळकरांनी उत्तरेत अनेक पराक्रम गाजवले.
त्यांतील शिंदे घराण्यातील राणोजींनी आपल्या पराक्रमाने उत्तरेतील माळव्याची सुभेदारी मिळवली. बाजीरावांशी राणोजी नेहमी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले. त्यांनी मध्यप्रदेशातील उज्जनी येथे आपले बस्तान बसवले. पुढे शिंदेनी ग्वाल्हेर हे आपले वास्तव्य स्थान मिळवले. थोरले बाजीरावाच्या कर्नाटक मोहिमेपासून राणोजी सदैव बरोबर असत. थोरल्या बाजीरावांनी १७३७ मध्ये निजामाचा भोपाळ येथे दारुण पराभव केला. त्या युद्धात राणोजी शिंदे यांनी अतुल पराक्रम गाजवला. माळव्यांची मोहिम तसेच राजपुतांनात चौथाई - सरदेशमुखी वसूल करण्याचे काम राणोजींनी मल्हारराव होळकरांबरोबर धडाडीने केले. १७३५ मुघल बादशहा महमंद रंगीला याने खानदुरान आणि वजीर कमरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली दोन लाख सैन्यानिशी दोन मोहिमा मराठ्यांविरुध्द पाठविल्या. त्याप्रसंगी मुघलांची रसद तोडण्याचे महत्त्वाचे काम राणोजींनी केले. त्यामुळे मुघलांच्या दोन्ही मोहिमा अयशस्वी ठरल्या . थोरले बाजीरावांच्या उत्तरेच्या राजकारणात राणोजी शिंदे यांनी नेहामी सहकार्य केले. एवढेच नव्हे चिमाजी आप्पा यांच्या वसईच्या मोहिमेत सुध्दा राणोंजी शिंदेनी पराक्रम गाजवला होता. २८ एप्रिल १७४० मध्ये थोरले बाजीरावांचे मध्यप्रदेशातील रावरखेडी येथे निधन झाले. त्यावेळी राणोजी शिंदे यांनी थोरले बाजीरावांची समाधी बांधण्याचे काम पेशवे नानासाहेब पेशव्यांच्या इच्छेनूसार हाती घेतले. रावरखेडी येथील बाजीरावांची खणखणीत समाधी राणोंजीनी आपलेपणाने केली. आज त्या समाधीनी अवस्था बिकट झाली आहे. त्यांची दुरुस्थी झाली पाहिजेत . मात्र त्यात पक्ष कोणताही असो त्यांची राजकीय इच्छा शक्ती कमी पडते. राणोंजी शिंदे यांनी अगदी कण्हेर खेडच्या पाटीलकीपासून उज्जनी व माळव्याचे अधिकारापर्यत आपला उत्कर्ष पराक्रम व प्रामाणिकपणामुळे केला. राणोजी हे शूर शिंदे घराण्यांचे संस्थापक होते. त्यांना जयप्पा, दत्ताजी, ज्योतिबा, तुकोजी व महादजी असे शूर पुत्र होते. त्यांनी आपल्या शौर्याने मराठ्यांच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. अशा या पराक्रमी राणोजींचे निधन १९ जुलै १७४५ मध्ये झाले.
Comments
Post a Comment