आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१८ जुलै १६६६*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जुलै १६६६*
हस्ब -उल- हुक्म प्रमाणे महाराजांनी मागीतलेले ६६००० रू. कुमार रामसिंगा कडून मिळाले. या आधी महाराजांनी अनेक अर्ज बादशहाकडे केले होते. मला जाऊ द्या, मी माझे किल्ले भांडून जिंकून बादशहास देतो. बादशहा अर्ज नकारत होता १८ जुलै च्या पत्रात अर्जाचा पुनर्विचार करण्यास रामसिंगास सांगत आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जुलै १६७२*
साल्हेर गड मोहीम
छत्रपती शिवरायांनी ठाकुरजी उर्फ पतंगराव जाधवरावांचा (जाधवरावांचा नसून मोगलांचा) पराभव करून "नाशिक" स्वराज्यात आणले.
इ.स.१६७२ साल्हेर गड मोहिमेसमयी दक्षिणेत  मोगल सुभेदार बहादुरखान हा होता व नाशिकचा ठाणेदार हे जाधवरावांच्या थोरल्या शाखेचै ठाकुरजी उर्फ पतंगराव जाधवराव हे लखुजीरावाचे जेष्ठ पुत्र दत्ताजीराव यांचे द्वितीय चिरंजिव हे होते व सिद्दी हीलाल हे वणी दींडोरीचे ठाणेदार होते...
छत्रपती शिवरायांच्या सैन्याचा या मोहिमैत ठाकुरजी जाधवराव व सिद्दी हीलाल यांनी पाहिजे तसा प्रतिकार केला नाही.. कारण हे दोघे शिवरायांशी संधान बांधुन होते... याकारणे ठाकुरजी आणी हीलाल यांचा सरसुभेदार बहादुरखान यांच्यात वाद झाला... पुढे जाधवराव छत्रपती शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जुलै १६८१*
१८ जुलै १६८१ रोजी पहाटे छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीचा कायमचा काटा काढण्यासाठी उंदेरीवर निर्णायक हल्ला केला. या युध्दात सिद्दीचे प्रचंड नुकसान झाले. पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जुलै १६८३*
शहाबुद्दीनखान आणि कासीमखान पावसाळा सुरू झाला तरी चिवटपणे किल्ले रामसेजला झुंजत होते. किल्ले रामसेजला वेढा अंदाजे १६८३ रोजी एप्रिल महिन्याच्या १६ तारखेपुर्वीच दिला असे वाटते. ११ जुलै इ.स.१६८३ त्यांनी किल्ले रामसेजला वेढा दिला. रामसेज किल्ल्याच्या दरवाज्याला सैनिक जाऊन भिडले. शहाबुद्दीनखान आणि बहादुरखान यांनी किल्ले रामसेजवर तुटून पडण्याचा जणू निर्धारच केला होता. हल्ला एवढ्या ताकदीचा होता की किल्ल्याच्या आत ४ माणसांना प्रवेश करता आला. दि. १८ जुलै इ.स.१६८३ जी माणसे किल्ल्याच्या आत शिरली, त्या सर्वांना मराठ्यांनी कंठस्नान घातले. येणारा प्रत्येक माणूस जखमी झाला. मराठ्यांपुढे मोगलांचे काही चालेना. अखेर शहाबुद्दीनखान याने आपला हात आखडता घेतला. त्यानंतर किल्ले रामसेजला छत्रपती संभाजी महाराजांकडून १ हजार सैन्याची कुमक आली. मुहंमद खलीलच्या तुकडीवर त्यांनी हल्ला केला. महासिंह करोदिया पण मराठ्यांवर तुटून पडला. मात्र शहाबुद्दीनखानाने पळ काढला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जुलै १७३३*
महाडिकांच्या पत्राला बाजीरावाचे उत्तरपत्र
साताऱ्याचे पंतप्रतिनिधी हे सुरुवातीपासूनच बाजीराव पेशव्यांचे अंतस्थ विरोधक. ते कायम बाजीरावांच्या मोहिमांमध्ये अडता घालण्याचा प्रयत्न करत असत. १६ जुलैला बालाजी नाईक महाडिक पेशव्यांना लिहितात, “जंजिरे सुवर्णदुर्गीहून अंजनवेलीचे कार्यभागास निघालो ते श्रीभार्गवस्थलावरून (चिपळूण) येता गोवलकोटची स्वारी (सिद्दी) श्रीस्थळी येऊन अनाचार करणार व ब्राह्मणाचे घरचा गला (पैसे) व घरे दग्ध करावयास स्वारी आली. हे वर्तमान मार्गी कलल्यानंतर श्रीस्थळी येऊनु गनिमाचे स्वारीचा दाखला घेऊनु युद्ध प्रसंग केला. त्याचा मोड करून सेपनास माणूस त्याचे मारले…”. या पत्राला बाजीरावांनी दि. १८ जुलै रोजी उत्तर दिलं त्यात ते म्हणतात, “आपले राजकारणात दुसरीयाचा पाय सिरू देऊ नये”. तोपर्यंत बकाजी महाडिक अंजनवेलीच्या मोर्चावर येऊन दाखल झाले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जुलै १७४८*
शिवाजी महाराजांच्या काळात १६७०- ७२ दरम्यान घरगड किल्ला स्वराज्यात दाखल झाला होता. १८ जुलै १७४८ घरगड उर्फ गडगडा किल्ला शंकराजी केशव सबनीस यांनी घेतल्याचें समजते. इ.स. १८१८ मध्ये कॅप्टन ब्रिग्सने हा किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी गडाला दोन दरवाजे असल्याचा उल्लेख येतो.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जुलै १९४७*
ब्रिटीश पार्लमेंटने 'इंडिया इनडिपेंडन्स अॅक्ट १९४७' मंजूर केला ज्याद्वारे भारत आणि पाकिस्तान ही दोन नवीन राष्ट्रे जन्माला आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जुलै १९६९*
अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी
(जन्म - १ ऑगस्ट १९२०)
प्रतिकुल परिस्थितीत हि जातीभेद,भांडवलदार,अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरुद्ध आपली लेखणी उगरणारे,लेखणीच्या जोरावर परिवर्तनाच्या चळवळीस ताकत देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी.
|| कडकडे डफावर थाप ||
|| तू शोषीतांचा मायबाप ||

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४