तंजावरचे राजे सरकोजी महाराज राजेभोसले याचा अपरिचित इतिहास.ग्रंथालय, विद्वानांकडून संस्कृत ग्रंथ, काव्ये, नाटके, टीका वगैरे लिहून घेणारे प्राचीन ताम्रपट, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींचा मोठा संग्रह करणारे .छापखाना, दवाखाने, आयुर्वेदिक नवनवीन प्रयोग करणारे,लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्याला त्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्व देऊन केला (१८२८). हा दुर्मिळ मान मिळविणारा सरफोजी हा पहिला भारतीय व संस्थानिक राजा.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजेंनी कर्नाटक मधील तंजावर येथे स्वतंत्र राज्य निर्माण केला होत. त्याच तंजावरच्या घराण्यामध्ये सरकुजीराजांचा जन्म झाला.


 सरकोजी राजांची पार्श्वभूमी 

 1777 साली तंजावरच्या राजगदीचे वारस तुळजाजी राजे भोसले वारस नसल्यामुळे. त्यांनी गादीवर दत्तक घेण्याची ठरवले. त्यामुळे सरकोजी राजांना त्यानी अगदी लहान वयामध्ये दत्तक घेतलं. आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सी. एफ. श्वार्ट्‌स नावाच्या एका अधीकारी गृहस्थाकडे त्याने सोपविलली . सी. एफ्. श्वार्ट्‌सने त्यास राजपुत्रास उचित असे शिक्षण देऊन इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन इ. पाश्चात्त्य तसेच मराठी, तेलुगू, हिंदी, उर्दू इ. भारतीय भाषा शिकविल्या.

 सरकोजी राजे गादिवरआले.

सी. एफ. श्वार्ट्‌स हाच्याकडून त्याना राजकारभारचे धडे मिळाले.सरकोजी राजे याचा राज्याभिषेक होऊन ते गादीवर आले.परंतु सुरुवातीला सावत्र भाऊ अमरसिंग  यांनी मोठं बड करून रडकोजी ला गाडीवरून बाजूला केल. आणि त्याचा सत्ता संगर्ष चालू झाला.तेव्हा घात पात होण्याची शक्यता होती त्यामुळे त्यानी मद्रास येथे आश्रय घेतला. आणि तेथून लढाई चालू ठेवली आणि सी. एफ्. श्वार्ट्‌स आणि इंग्रज याच्या मदतीने ते पुन्हा सत्तेत आले.अमरसिंहाच्या कारकीदींत (1787-1797)होती.श्वार्ट्‌स याने पुन्हा दत्तक-प्रकरण धसास लावून ईस्ट इंडिया कंपनीला असे दाखवून दिले, की सरफोजी हाच खरा वारस आहे. तेव्हा कंपनीने अमरसिंहाला गादीवरुनं बाजूला करून सरफोजीला राज्याभिषेक केला गेला.(1798)

त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने सरफोजीशी एक पंधरा कलमी करार केला.

 परंतु पुढील वर्षींच लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नर जनरलने अर्काटबरोबरच तंजावर संस्थान खालसा केले.

 त्या वेळी सरफोजीच्या ताब्यात खासगी मालमत्ता, तंजावरचा किल्ला आणि भोवतालचा काही भाग देण्यात आला आणि सालिना साडेतीन लाख रुपये तनखा मंजूर करण्यात आला.

 नामधारी राजा हा किताब नाममात्र राहिला तरी प्रत्यक्षात राज्यकारभाराची सत्ता हातात नव्हती. अशा परिस्थितीत त्याने तंजावरच्या सांस्कृतिक विकासाकडे आपले लक्ष केंद्रित केले.


सरफोजी हा ग्रंथ  आणि कलेचा चाहते होते.

 श्वार्ट्‌सच्या मार्गदर्शनाखाली त्याने विविध भाषा आत्मसात करून इंग्रजी साहित्य आणि अद्ययावत पाश्चात्त्य ज्ञान यांचा अभ्यास केला होत्या.

👉शिवाय आपला व्यासंग व छन्द वाढविण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसा पैसा आणि भरपूर वेळही होता.


विद्याव्यासंग आणि लोककल्याणाची कामे करण्यात त्याने उर्वरित आयुष्य व्यतीत केले आणि इंग्रजांकडून ‘हिज हायनेस’ हा बहुमानदर्शक किताब राज्य खालसा झाले असतानाही मिळविला.

भारतातील सर्वात मोठं ग्रंथालय व संग्रहालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.


 दरबारातील विद्वानांच्या मदतीने त्याने तंजावरमधील सरस्वती महाल हे ग्रंथालय समृद्ध केले. विद्वानांकडून संस्कृत ग्रंथ, काव्ये, नाटके, टीका वगैरे लिहून घेतल्या तसेच प्राचीन ताम्रपट, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींचा मोठा संग्रह केला.


बर्नेल नावाच्या विद्वानाने सरफोजीच्या संग्रहातील ग्रंथांची बृहद्‍सूची तयार केली आहे. सरफोजीने सोळा भिन्न खाती पाडून प्रत्येक खात्यावर एक दमित (प्रमुख) नेमला होता. तो स्वतः कवी होता आणि भरतनाट्यम् व संगीतकला यांना त्याने उत्तेजन दिले.


 भारतीय वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाठी त्यानी खूप प्रयत्न केली.

 चित्रकला, शिल्पकला व संगीत यांचाही त्याना छन्द होता.

राजमहालातील दिवाणखाना त्याने उत्कृष्ट भित्तिचित्रांनी सुशोभित केला. याशिवाय मद्रास येथील संग्रहालय आणि इतर वाड्यांमधूनही त्याने अशा प्रकारची चित्रे काढून घेतली. सेतुभवसत्रम् व पुदुकोट्टई येथे चुनाविटांचे दोन स्तंभ उभारण्यास प्रारंभ केला होता.

👉छापखाना सुरु करून देवनागरी लिपीतील खिळे तयार करवून घेतले

 तंजावरमध्ये त्याने छापखाना सुरु करून देवनागरी लिपीतील खिळे तयार करवून घेतले.

👉त्याचे गुरु श्वार्ट्‌सच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ त्याने पुतळा उभारला.


👉राजे सरकोजी हे संशोधक होते. ते चागल्या प्रकारे अनेक शस्त्रक्रिया करत होते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठी  पावले उचलेली दिसतात.

पवनचक्की, विद्युत्‌यंत्र, मनुष्याचा हस्तिदंती सांगाडा, राजमहालात उघडलेली वेधशाळा अशा विविध कृतींच्या द्वारे त्याची संशोधक व मर्मज्ञ दृष्टी दिसून येते.

सरफोजीराजेनी अनेकसंकलन करून प्रकाशित केली 

सरफोजीने अनेक प्रकाशित ग्रंथ आणि हस्तलिखिते गोळा केली होती.

 👉भारतातील सर्वात मोठा शिलालेख  त्यानी तयार केला.

👉 महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने सरफोजीची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात इ. स. १८०३ मध्ये कोरून घेतलेला भोसले घराण्याचा इतिहास हा होय. भारतात एवढा मोठा शिलालेख कुठेही नाही. पुस्तकरूपाने हा शिलालेख प्रसिद्ध झाला, तेव्हा त्याची ५० पृष्ठे भरली.


याशिवाय सरफोजीने अनेक अरबी व फार्सी ऐतिहासिक ग्रंथांची भाषांतरे करवून घेतली. त्यात इब्न बतूताचे अरबी भाषेतील ग्रंथ व शाहनामा हे फार्सी काव्य इ. महत्त्वाचे ग्रंथ होत.


👉सरफोजीने आपल्या चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत तंजावर व सभोवतालच्या प्रदेशात अनेक धार्मिक आणि शिक्षणविषयक मौलिक सुधारणा केल्या.

 त्याने बृहदीश्वर मंदिराच्या देखभालीसाठी देणग्या दिल्या त्याचप्रमाणे इतर धर्मांच्या लोकांनाही समान वागणूक दिली. त्याच्या मार्गदर्शनाखाली तंजावर हे विद्येचे आणि केलेचे केंद्र बनले.


👉लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्याला त्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्व देऊन केला (१८२८). हा दुर्मिळ मान मिळविणारा सरफोजी हा पहिला भारतीय व संस्थानिक होता.

या त्याच्या कार्याचा उचित गौरव लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्याला त्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्व देऊन केला (१८२८). हा दुर्मिळ मान मिळविणारा सरफोजी हा पहिला भारतीय व संस्थानिक होता.


👉सरफोजीविषयी तत्कालीन पाश्चात्त्य प्रवाशांनी काढलेल्या प्रशंसोदगारांवरून त्याची योग्यता कळते.



👉सरफोजीला मुक्तंबाबाई व अहिल्याबाई ह्या दोन पत्न्या होत्या.मुक्तंबाबाई अकाली मरण पावली.

👉 अहिल्याबाईपासून त्यास तीन मुली आणि एक मुलगा झाला.

 तोच पुढे शिवाजी म्हणून सरफोजीच्या मृत्यूनंतर तंजावरच्या गादीवर आले.

माहिती संकलन 


संदर्भ : 1. Rao, V. D. Ed. Studies in Indian History, Kolhapur, 1968.

२. पारसनीस, द. ब. तंजावरचे राजघराणे, मुंबई, १९१२.

३. वाकसकर, वि. स, तंजावरचे मराठे राजे, मुंबई, १९३३.

कुलकर्णी, गो. त्र्यं.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४