आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२६ जुलै १६८०*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जुलै १६८०*
कारवारला "बजाजी पंडीत" हा मराठ्यांच्या वतीने इंग्रजांकडून तहात ठरल्याप्रमाणे आगाऊ "होन" वसूल करायचा. पण इंग्रजांनी ते आता नाकारल्यावर "बजाजी पंडीत" यांनी हि गोष्ट "छत्रपती संभाजी महाराज" यांच्या कानावर घातली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जुलै १६८३*
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यकाळात काझी हैदर मुघलांना जाऊन मिळाला. मआसीर –ए –आलमगिरी यातील नोंदीनुसार गुरुवार २६ जुलै १६८३ साली “ सीवाचा मुनशी काझी हैदर बादशाहाकडे सेवेच्या इच्छेने आला. त्याला एक अंगरखा, दहा हजार रुपये व दोन हजारी अशी मनसब दिली गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जुलै १९१८*
कुळकर्णी वतन खारीज केल्यानंतर २६ जुलै १९१८ रोजी छत्रपती शाहू महाराजांनी एक अनोखी भेट समाजाला दिली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२६ जुलै १९९९*
भारत आणि पाकीस्तान यांच्यात झालेल्या "कारगिल" युद्धामध्ये भारताने पाकीस्तानवर विजय प्राप्त केला व "कारगिल" ताब्यात घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment